‘म्हणे संस्कृतीवरचा घाला..’ या लेखात (२७ फेब्रुवारी) रवि आमले यांनी सभ्य- असभ्यतेच्या कल्पनांबाबत आपल्या प्राचीन वाङ्मयात कोणते संदर्भ आढळतात याची चर्चा केली होती. त्या लेखावरील प्रतिक्रिया-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘लोकप्रभा’ २७ फेब्रुवारीतील रवि आमले यांचा ‘म्हणे संस्कृतीवरचा घाला..’ हा लेख वाचला. परंतु अजिबात रुचला नाही, कारण त्यात धरलेली सर्व गृहीतके धादांत असत्य व तथ्यहीन आहेत, असे माझे मत आहे. आज उथळ विधाने करून हमखास टाळ्या मिळविण्याचे दिवस आले आहेत आणि त्यासाठी संस्कृतीसारखा प्राचीन व निरुपद्रवी विषय मिळाला. ज्याविषयी कोणतीही सखोल व मूलभूत माहिती न मिळवता केवळ उथळ विधाने होत राहिली तर ते नक्कीच त्रासदायक होते. इंग्रजीत एक वाक्प्रचार आहे, व्हॉट डू नॉट अंडस्टॅण्ड इज अ‍ॅब्सर्ड. एका तऱ्हेने हे सर्व विशफूल थिंकिंग आहे, असे म्हणता येईल! असो..
संस्कृती, प्राचीनतम ज्ञान अर्थात वेद आणि त्यातील प्रतिपाद्य प्रमुख विषय म्हणजे यज्ञ, याविषयी आज कमालीचे गैरसमज आहेत. संस्कृत भाषेतून जे मूलभूत ज्ञान दिले गेले, त्यालाच संस्कृती म्हणतात. अर्थातच वेद हीच विश्वमानवांची मूळ संस्कृती आहे. आज मात्र केवळ गैरसमजुतीतून वेद हे फक्त भारतभूमीवरचे वा फक्त हिंदूंचे असे समजले जाते. काळाच्या ओघात वेदांच्या अर्थाविषयी तर्कवितर्क लावले जाऊ लागले, त्यामागे केवळ स्वार्थ व अज्ञान एवढेच कारण आहे. म्हणूनच संत तुकारामांना उद्वेगाने म्हणावे लागले. ‘अर्थे लोपली पुराणे। अनर्थ केला शब्दाज्ञाने।’ त्या काळची अत्यंत विपरीत व उलटसुलट सामाजिक स्थिती पाहून संत तुकारामांनी परखड शब्दांत तेव्हाच्या तथाकथित दांभिक विद्वानांना बजावले, ‘वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा। येरांनी व्हावा भार माथा’ -‘वेदांचा अर्थ केवळ तपस्येनेच जाणला जाऊ शकेल’ असे स्वामी समर्थाच्या अधिकृत पीठावरील चौथे सिद्धयोगी गजानन महाराज यांनी स्पष्ट केले. ‘विश्वातील सर्व माणसे एकमेकांचे बांधव आहेत. सर्वाच्या नसांतून त्या एका ब्रह्माचे रक्त खेळत आहेत, सर्वाचा मूळ सत्यधर्म एकमेव अर्थात वेदधर्म आहे,’ असे ते म्हणत. भगवद्गीता जितक्या आस्थेने आम्ही वाचू, तितक्याच आस्थेने, पवित्र बायबल व पवित्र कुराणही आम्ही वाचू असे ते सांगत! वेद, त्यातील प्रतिपाद्य विषय अर्थात यज्ञांविषयी त्यांनी अनेक वेळा त्यातील विशुद्ध ज्ञान, उकल स्पष्ट केली. पशुबलीहत्या ही अत्यंत विकृत प्रथा ज्यांनी सुरू केली ते अनाचार, अधर्मी, उन्मत्त झाले होते. आमचे कोण काही वाकडे करू शकत नाही, अशा विचाराने ते निर्धास्त होते आणि त्या वेळचे पोटार्थी पुरोहित अर्थाचे अनर्थ करत ही परंपरा चालू ठेवत होते, जी विकृती पुढे पराकोटीला गेली. म्हणून या पशुबलीयुक्त विकृत यज्ञांविरोधी भगवान बुद्ध, भगवान महावीर यांनी निषेधाचा आवाज उठवत अहिंसातत्त्वाचा, उच्चनीचतेचा निषेध, समानतेचा व योग्य कर्माचा पुरस्कार केला. त्याच वेळी त्यांनी सात्त्विक यज्ञांचा पुरस्कार करत, अशा यज्ञास देवांची उपस्थिती असते, असे सांगितले. भगवान बुद्धांचे एक वचन आहे की पूर्वी माणसाला, ईर्षां, वृद्धत्व व वासना एवढे तीनच विकार होते. यज्ञात बलीप्रथा सुरू झाल्याने रोगांची संख्या वाढून ९८ झाली.’
यज्ञात पशूबळीप्रथा धूर्त व लबाडांनी सुरू केली, असे पं. सातवळेकरांनी लिहून ठेवले आहे. वातावरणशुद्धी (पर्यायाने पर्यावरणसंतुलन) हा ज्या यज्ञप्रक्रियांचा अभिप्रेत उद्देश असतो. ज्यात केवळ गोघृत, औषधी वनस्पती, धान्य, बीजे यांच्या आहुती समंत्रक देण्याची विशुद्ध परंपरा वेदांनी प्रतिपादन केली. त्याऐवजी रक्त-मांस अग्नीत टाकून उरलेला भाग प्रसाद म्हणून खाण्याने सर्व पर्यावरण अशुद्ध व प्रदूषित होऊ लागले, परिणामी जगभर हिंसा, अनाचार, युद्धे होत राहिलेली दिसतात. पेराल तेच उगवेल म्हणतात ते असे खरे झाले! त्याउलट आज नित्य यज्ञ अग्निहोत्राने वातावरण शुद्ध व पोषक होते, शेतात सकस धान्य निपजते, तणावमुक्ती, व्यसनमुक्ती मिळते, याचे अनुभव जगभर घेतले जात आहेत!
प्रचलित अर्थाने वेद हे वाङ्मय व त्याची भाषा संस्कृत ही वाङ्मयीन भाषा नाही. प्रगाढ ध्यान-चिंतनातून स्फुरलेले ज्ञान, अपौरुषेय ज्ञान- असे ज्ञान म्हणजे वेद, ज्यात सर्व जगातील सर्व विद्या-कला यांचे सूत्ररूपाने ज्ञान (Pithy Form) तर, यज्ञ, दान, तप, कर्म व स्वाध्याय अशी पंचसूत्री विश्वमानवाला आचरण करण्यासाठी दिलेली आहे. म्हणून जगातील सर्व धर्ममते, तत्त्वज्ञान यांचा पाया म्हणून या पंचसूत्रीकडे पाहिले जाते! तरीही वेदांचा भर प्रामुख्याने यज्ञावर आहे व प्रारंभी हे यज्ञ, याग, औपासन होम, गोम (जपानी), ऋतू, मख, यश्त (पार्शिया), कोर्बान (हिब्रु व अरबी), सॅक्रिफाईस (sacer facer= पवित्र कर्म) (लॅटीन व ग्रीको रोमन) भागात केले जात असत! पण पुढे पुढे यज्ञ व त्यातील शब्द यांचे अर्थ सोयीस्करपणे बदलले जाऊ लागले व तेही स्वार्थ, अज्ञान, आसुरी समाधान यासाठी-
आज सवंग-बाष्कळपणा वाढला आहे. दारू न पिणारा गावंढळ, मागास, बावळट समजला जातो, अतिशहाणपणामुळे दारूसेवनास सोमरसपान म्हणत म्हणत देवसुद्धा सोमरस पीत नव्हते काय, असे प्रश्न तोंडावर फेकले जातात. वास्तविक सोमवली ही अत्यंत दुर्मीळ व औषधी लता- रशिया, केरळसारख्या थोडय़ा भागातील डोंगराळ क्षेत्रात आढळते. चंद्राच्या कलांबरोबर वाढणारी ही वनस्पती रात्रीच्या अंधारात चमकते, असे वर्णन आहे. रशियन खेळाडूंना ही वनस्पती खायला दिल्यानंतर त्यांच्या खेळात कमालीची प्रगती दिसून आली. सोमयागासारख्या महायज्ञात या वनस्पतीचा रस गाईच्या दुधात मिसळून त्याचे अग्नीत समंत्रक हवन केल्याने, परिसरातील वातावरण व सजीव सृष्टीला त्याचा लाभ होतो. म्हणून घरोघरच्या नित्य अग्निहोत्र, हवनाव्यतिरिक्त असे महायज्ञही राजकृपेने समाजात होत असत! वर दिलेली सोमवल्ली हीच राम-रावण युद्धाचे वेळी लक्ष्मण बेशुद्ध पडला असता, ‘संजीवनी’ म्हणून आणण्यासाठी हनुमानाला सांगितले गेले होते, असे मानले जाते!
वेदांमध्ये इह-पर म्हणजे पृथ्वीपासून परमपिता परमात्मापर्यंत सर्व ज्ञान येते. इशावास्य उपनिषदानुसार सर्व चराचरात तो परमात्मा चैतन्यरूपाने व्यापून आहे. वेदांमध्ये भेदाभेद नाहीत! आर्य म्हणजे सुसंस्कारित तो वंशवाचक शब्द नाही जे असंस्कारित आहेत, त्या सर्वाना ‘कृण्वन्तो विश्वमार्यम्’ सुसंस्कारित करून घ्या, असे वेद सांगतात. तो परमात्मा अप्रतिम आहे. मग आजच्या मंदिरातील मूर्ती कोणाच्या? तर मानवी देहातच असलेले, परंतु स्वत:च्या अत्यंत विशुद्ध व निर्मळ वर्तनाने ते परमात्मासमान पूर्णावस्थेला पोचले! तो परमात्मा एक चैतन्य, एक शक्ती होय, कोणी स्त्री वा पुरुष वा गंडाताईत वा ग्रहतारे नव्हे! त्याने वेदांचे द्वारा ‘यज्ञ, दान, तप, कर्म आणि स्वाध्याय,’ या पंचसूत्रीद्वारे विश्वमानवाला परिपूर्णता साधण्याचा मार्ग खुला केला. सिनेमा, सिरियलमध्ये दिसतात तसे वेगवेगळे देव नसतात, एकच परमात्मशक्ती वेदांनी, ब्रह्मा, विष्णू, रुद्र, इंद्र, अग्नी, वायू, सूर्य, चंद्रमा यम-मातरिश्वा, इ. विविध गुणवाचक शब्दांनी गौरविली आहे. वेद हे परमात्मशक्ती शब्दरूप शरीर, तर सूर्य/अग्नी हे चैतन्यमय दृश्य शरीर होय. म्हणून अग्नी, सूर्य, प्रजापती हे सर्व परमात्मवाचक शब्द आहेत. इंद्र म्हणजे श्रेष्ठ, जसे नरेंद्र, इ. सनातन म्हणजे शाश्वत, जसे परमात्मा, वेद, जीव, इ. हे सनातन आहेत. वेद हे अग्नी व सूर्य यांचा परमपुरुष म्हणून उल्लेख करतात. परमात्मा तर निराकार, चैतन्य, मग त्याची अर्चना, उपासना कशी करावी? तर यज्ञद्वारे, सत्कर्माद्वारे, तपाद्वारे यज्ञ हे पृथ्वीचे दुसरे टोक किंवा नाभी समजले जाते, या नाभीवाटेच हवनाद्वारे विश्व, निसर्ग यांचे पोषण व संतुलन होते, म्हणून प्रत्येकासाठी अग्निहोत्र हा नित्याचा यज्ञ आवश्यक कर्म म्हणून वेदांनी आदेशिला! जलाने बाह्य़ शुद्धी होते, पण यज्ञाने आंतरिक शुद्धी होते, शांती, समाधान मिळते. यम म्हणजे विश्वनियामक म्हणजे परमात्मा! वेदांनी एकाच परमात्मशक्तीला पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी नावे योजून त्याची वारंवार स्तुती वा प्रार्थना केल्या आहेत. त्यातील मूळ संदर्भ हा जाणत्यांकडून समजावून घेण्याचा विषय आहे. मातरिश्व म्हणजे वायू.
मध्यंतरीच्या काळात पंचमकार म्हणजे मद्य, मांस, मीन, मुद्रा व मैथुन हे शब्द काहीजणांनी आपल्या ऐहिक वासना पुरविण्यासाठी हीन तऱ्हेने वापरले! वास्तविक यांचा खरा अर्थ यज्ञ, दान, तप, कर्म आणि स्वाध्याय- हा वैदिक पंचसाधनमार्ग होय, जो जीवन कृतार्थ बनविण्यासाठी दिला गेला आहे, आता वेदांनी कोणतीही अगदी प्रतीकात्मक हिंसाही मान्य नसल्याने यज्ञात पशुबळी व नंतर त्याचा प्रसाद, इ. सर्व गोष्टी निर्थक ठरतात, जसे पशू हा पाहणारा, परमात्मा, त्याचे स्वरूप अग्नी, सूर्य हे पाहणारे होते! स्वत:च्याच प्रजेला कापून अग्नीत हवन करावे, असे तो परमदयाळू परमात्मा कसे सांगेल? म्हणून वेदांतील शब्दांचे व मंत्रांचे अर्थ शब्दकोश समोर ठेवून केले जाऊ नयेत! अश्व= घोडा हे तेज, गती, सामर्थ्यांचे प्रतीक आहे, तर मेध, मख, क्रतु हे शब्द तसेच अश्वर (हिंसाविरहित पवित्र कर्म= यज्ञ) हे शब्द यज्ञाला उद्देशून आहेत. राष्ट्र, राजा, प्रजा यांना सामथ्र्य, गती, तेज प्राप्त व्हावे म्हणून विशिष्ट सात्त्विक, कसदार पदार्थाचे, गोधृताचे अग्नीत समंत्रक हवन करून वातावरण शुद्ध, पुष्ट शांतीदायक बनावे यासाठी अश्वमेध, नरमेध, पुरुषमेध, इ. यज्ञांची योजना आहे, अश्वमेध यज्ञात अश्व व राणी यांचे संबंध कोणातरी घृणास्पद, विकृत मानसिकतेतून निघाले! काही यज्ञीय मंत्रांमध्ये अग्नी, सूर्य यांनाच अश्व म्हणून संबोधले आहे. अश्वचा एक अर्थ सात असा होतो. अश्वमेध यज्ञाने सातही लोकांची किंवा सात भूमींची प्राप्ती होते, यातील सातवी भूमी यज्ञकर्त्यांला प्राप्त होते. शिवाय सूर्याच्या रथाला सात अश्व (सप्तकिरण) असतात. या मंत्रांना अधिदैविक वा आध्यात्मिक अर्थही आहेत. मुळात संपूर्ण वेद व त्यातील सर्व मार्ग हे उदात्त, मंगल व पवित्रच आहेत! त्याने हीन व सवंग अर्थ लावले जाऊ नयेत!
वेदांचा रोख प्रामुख्याने त्यागावर असला तरी ‘तेन व्यक्तेन भुंजिथा॥’ म्हणजे उपभोग घेऊ नका असे वेद सांगत नाहीत! उलट ‘दिवं च रोह। पृथिवीं च रोह, राष्ट्रं च रोह द्रविणंच रोह। प्रजां च रोह मृतं च रोह, रोहितेन तन्वं सं स्पृशस्व॥ अथर्ववेद १३.१३४- अर्थात आकाशावर चढाई कर, अखिल पृथ्वी आक्रमण कर, स्वत:चे राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न कर, शक्य तितकी संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न कर, योग्य तितकी प्रजा निर्माण कर आणि अखेर मोक्षदेखील प्राप्त करून घे, अमृतत्त्व, कैवल्यपदही प्राप्त कर, त्यावर आरूढ हो..’ अर्थात सर्व काही मिळव, पण त्याचा पाया त्याग असू दे. सर्व काही मिळवताना त्याच्या फळाची आशा करू नकोस! भक्ती, सांख्य, अष्टांग, संन्यास, इ. सर्व योग यात समाविष्ट आहेत!
२७ फेब्रुवारी २०१५च्या ‘लोकप्रभा’च्या अंकातील ‘संस्कृती’वरील लेख वाचून जरा सविस्तर खुलासा करावासा वाटला! कारण ‘वेद’ हे विश्वाचे, विश्वमानवाचे संस्कृतिवैभव आहे! आता असा काळ आला आहे की, पाश्चिमात्य देशांतील असंख्य माणसे पुन्हा वैदिक संस्कृतीकडे, त्याच्या आचारधर्माकडे आकर्षित होत आहेत, आजच्या जागतिक समस्यांची त्यांना उत्तम जाण आहे! आजचे चढते प्रदूषण, आजारी निसर्ग, बदलती ऋतुचक्रे, वैश्विक अशांती, वाढते तणाव व विकार, वाढती व्यसने या सर्वावर वैदिक आचारधर्म हा एकमेव उपाय आहे, ही त्यांना मनोमन खात्री आहे, व नित्य अग्निहोत्राचे विविध प्रकारे उपयोग ते करून घेत आहेत, यातील अनेकजण अनेक वैदिक महायज्ञात उपस्थित राहिलेले मी पाहिले आहेत. वेदांचे मूळ अर्थ प्रकाशत यावेत हाच या लेखा मागचा उद्देश आहे.
श्यामसुंदर गंधे