मी ‘लोकप्रभा’चा नियमित वाचक आहे. ‘लोकप्रभा’तून तुम्ही वेगवेगळे प्रश्न अतिशय सोप्या आणि सहज पद्धतीने हाताळता. त्यामुळे आम्हा सामान्य वाचकांना तो विषय समजणं सोपं जातं. स्वातंत्र्य दिन विशेषांक खरोखरच वैचारिक खाद्य पुरवणारा होता. या अंकातून जो सामाजिक संदेश दिला आहे, त्यासाठी तुमचं टीमवर्क, अंकाचं संपादन याचा कस लागलेला आहे हे जाणवतं.
आता थोडं स्वातंत्र्याबद्दल. आपण स्वतंत्र आहोत हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण स्वातंत्र्य असं म्हणताना आपण स्वत:च्या वैयक्तिक स्वातंत्र्याबद्दल बोलत असतो. फारच थोडे असे असतात की जे स्वातंत्र्य या संकल्पनेबरोबर देशाच्या स्वातंत्र्याचा विचार करतात. स्वातंत्र्याच्या अंकातून ‘लोकप्रभा’ने हाच संदेश खूप सहजपणे मांडला आहे. आपल्याला सगळ्यांना एक विकसित तसंच कल्याणकारी राष्ट्र उभं करायचं आहे. या चळवळीची सुरुवातच देश आणि आपले आदर्श समजून घेण्यापासून होते. या अंकातील संपादकीय विचार करायला प्रवृत्त करणारे होते. हृषीकेश जोशी यांची माझा देश ही कविता मन हेलावून गेली. या नितांतसुंदर अंकाबद्दल धन्यवाद.
जमीर मुल्ला, कोल्हापूर.
आपण हे केव्हा करणार?
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती देणारा ‘लोकप्रभा’चा पर्यटन विशेषांक हातात घेतला आणि एका दमात वाचून संपवला. फिरायला जाताना आपल्याला नेहमी ठरावीक तसंच लोकप्रिय ठिकाणांनाच भेट द्यायची सवय असते. आपण एरव्हीच्या रुटीनला एवढे कंटाळलेलो असतो, की जेवढा बदल मिळेल तेवढय़ावरच खूश होतो. त्यामुळे नवीन काही शोधायलाही जात नाही. त्यामुळे आपल्या जवळपास पर्यटनदृष्टय़ा इतकं वैविध्य आहे, हे वाचल्यावर खरोखरच थक्क व्हायला झालं. मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, कोकण आणि औरंगाबाद या परिसरातच फिरायचं आणि हे सगळं बघायचं म्हटलं तरी किती वर्षे लागतील! एक गोष्ट खटकली ती म्हणजे या भ्रमंतीमध्ये उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचा अजिबात समावेश नव्हता. विदर्भाचा अनुशेष या पातळीवरही असावा याचं वैषम्य वाटलं. विदर्भात एवढीच नाही, तर याहीपेक्षा निसर्गरम्य, प्रेक्षणीय ठिकाणे आहेत याची कृपया लेखकाने आणि ‘लोकप्रभा’ने नोंद घ्यावी. दुसरी गोष्ट म्हणजे पर्यटनदृष्टय़ा आपण एवढे समृद्ध असताना पर्यटनामध्ये इतर देश डॉलर आणि युरो कमावतात आणि आपल्याकडे मात्र परदेशी पर्यटकांना आकर्षित करून घेण्यासाठी, त्यातून मोठा व्यवसाय उभारण्यासाठी काहीच प्रयत्न होत नाहीत! पर्यटनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर आपण किती तरी मोठा रोजगार निर्माण करू शकतो. आपण हे केव्हा करणार?
ऋता काशीकर, चंद्रपूर.
पावसाचे उबदार दिवस
‘लोकप्रभा’च्या पाऊस विशेषांकातून गावोगावचा पाऊस अनुभवला. मजा आली. खरं तर पावसाकडे या दृष्टीनेही बघता येईल हे लक्षातच आलं नव्हतं. मी आता नोकरीनिमित्त सासवडला असलो तरी लहानपणी कर्नाटकात बेळगावला अनुभवलेला पाऊस आजही माझ्या मनात घर करून आहे. धुवांधार, मुसळधार हे शब्दही फिके पडावेत असा पाऊस असायचा तो. आम्हा मुलांना उन्हाळा संपताना आलेला पाऊस हवा असायचा, कारण त्यात भरपूर भिजायला मिळायचं. भिजून घरात शिरल्यावर आजी तिच्या मऊसूत पदराने भिजलेलं डोकं पुसायची. गरमगरम बटाटेपोहे, उपमा, तळलेले पापड-कुरडया आणि नंतर जायफळ घातलेली कॉफी आणि आजी, आई, मावश्या यांच्या रंगलेल्या गप्पा.. त्या ऐकता ऐकता कधी झोप लागायची ते कळायचंही नाही. हळूहळू पाऊस जुना व्हायचा. भिजण्यातली गंमत संपायची आणि मग पावसामुळे बाहेर जाऊन खेळता येत नाही याची चीडचीड होत राहायची. मग फडताळातली पुस्तकं बाहेर निघायची. भावंडांचे, घराजवळ राहणाऱ्या मित्रमंडळींचे चिमुकले अड्डे घरातच जमायचे आणि बैठे खेळ, गप्पा, भांडणं सगळंच रंगायचं. पावसानं मला असे उबदार दिवस दिलेत..
सदाशिव पाटील, सासवड.
‘मोदी सरकार’चा तिमाही ताळेबंद
‘व्हॉस्सप मोदीजी’ या मथितार्थात (लोकप्रभा, २९ ऑगस्ट) मोदींच्या भाषणाचा समतोल दृष्टिकोनातून घेतलेला आढावा वाचायला मिळाला.
मोदी सरकार सत्तेवर येऊन तीन महिने झालेले आहेत. काही भरीव कार्यक्रम किंवा मूलभूत धोरणात्मक बदल करायचे असतील तर गृहपाठ नीट करायला तीन महिने तसे कमी आहेत. आरंभशूरपणा इथे कामाचा नाही. नवीन लष्करप्रमुखांची नियुक्ती हा प्रतिष्ठेचा प्रश्न न करणे, सत्तेवर आल्यावर काही आठवडय़ातच सादर करावा लागलेला अर्थसंकल्प जवळजवळ जुन्या सरकारचाच वाटावा असा असणे, पूर्वनियोजित रेल्वे भाडेवाढही त्याच स्वरूपात करणे, अशा काही प्रसंगात घिसाडघाईने आणि हट्टाने काही तरी नवीन बदल ‘करून दाखवण्याचा’ मोह टाळलेला असू शकतो. तसे असेल तर ते स्तुत्य आहे आणि ‘लंबी रेस का घोडा’ असण्याचे लक्षण आहे असे अजून काही महिने म्हणायला हरकत नाही. निदान तसा संशयाचा फायदा तरी काही दिवस द्यायलाच पहिजे. प्रतीकात्मक का होईनात पण काही चांगल्या गोष्टीही मोदींच्या भाषणात व इतर प्रसंगात दिसलेल्या आहेत. स्वत:चा उल्लेख ‘प्रधानसेवक’ असा करणे, ‘खासगी नोकरी’ आणि ‘सरकारी नोकरी ’ यातील फरकावर नेमके बोट ठेवणे, सर्व सरकारी कार्यालयातील अजागळ वातावरण आणि धूळ खात पडलेले जुने सामान बदलून सकारात्मक वातावरण निर्मितीचे महत्त्व सांगणे, जनतेला स्वत:च्या सवयी बदलून स्वच्छतेची सुरुवात करण्याचे आवाहन करणे, लैंगिक गुन्हे टाळण्याकरता पालकांनी फक्त मुलींना उपदेश न करता मुलाच्या वागण्याकडेही लक्ष देण्याची गरज अधोरेखित करणे, मुलांप्रमाणेच (किंवा त्यापेक्षा जास्त) मुली घराकरिता किती त्याग करतात याचा आवर्जून उल्लेख करणे, या सर्व गोष्टी पंतप्रधान हस्तीदंती मनोऱ्यात बसलेले नाहीत याची आश्वासक जाणीव करून देतात. नियोजन आयोगाचे स्वरूप बदलणे, कुठल्याही घराण्याचे/ व्यक्तीचे नाव नसलेल्या योजना जाहीर करणे, देशभरातील गरिबांना बँक खाते देऊन विमासंरक्षण देणे, असे काही नवे विचारही दिसून आलेले आहेत. त्याचे कौतुक केलेच पाहिजे.
त्याचबरोबर गणकपूर्तीशी (कोरम) संबंधित १० टक्के आकडय़ाचा आधार घेऊन काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद नाकारणे योग्य नाही. सध्याच्या लोकसभेत या पदावर नैसर्गिक अधिकार काँग्रेसचाच आहे हे मान्य करावयास पाहिजे होते. तांत्रिक मुद्दय़ावरून ते नाकारून भाजपने आणि विशेषत: नरेंद्र मोदींनीही आपला दिलदारपणा दाखवून देण्याची एक चांगली संधी गमावली. एखाद्या व्यक्तीला किंवा पक्षाला सगळे मिळून जाणूनबुजून हिणवत असतील तर अशांच्या पाठीशी उभे राहण्याची भारतीय मानसिकता आहे. यूपीए-१च्या काळात मनमोहनसिंग यांच्याविषयी अडवाणी यांनी काढलेले उद्गार जनतेच्या पचनी पडलेले नव्हते. साऱ्या जगाने सतत हेटाळणी करून ज्यांची कोंडी करण्याचा सतत १०-१२ वर्षे प्रयत्न केला त्या नरेंद्र मोदींनी आवाहन करताच त्यांच्या पाठीशी यावेळी जनता ठामपणे उभी राहिली. ही मानसिकता भाजपच्या चाणक्यांनीही नीट समजून घेण्याची गरज आहे. नाही तर काँग्रेसला असे ‘बिचारेपण’ बहाल करण्याचे परिणाम भाजपलाही आगामी काळात भोगावे लागू शकतात.
तेव्हा ‘कोरम’सारख्या तांत्रिकतेमध्ये अडकण्यापेक्षा आगामी काळात ‘डेकोरम’चे पालन करण्यातच सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, भारतीय लोकशाही, आणि जनता अशा सर्वाचे भले आहे याची जाणीव नव्या सरकारचा तिमाही ताळेबंद मांडताना सर्वसंबंधितांनी ठेवावी अशी जनतेची अपेक्षा असेल.
प्रसाद दीक्षित, ठाणे.
स्वातंत्र्यदिन विशेषांक आवडला
स्वातंत्र्यदिन विशेषांक खूपच छान आहे. स्वातंत्र्याची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी आहे. प्रत्येकाने खूपच छान लिहिले आहे. बऱ्याचदा सेलिब्रेटी लोक कसे एखादा सण साजरा करतात याविषयी नेहमी रकानेच्या रकाने भरभरून छापले जाते. त्या वेळी आम्हा वाचकांना नेहमी प्रश्न पडतो की सण काय फक्त या सेलिब्रेटी लोकांनीच साजरा करायचा असतो का, आम्ही नाही का करू शकत. ठीक आहे आमची साजरा करण्याची पद्धत भव्यदिव्य नसेल पण साधी असेल पण कुठे बिघडले? २२ ऑगस्ट २०१४ च्या लोकप्रभा अंकात सामान्य माणसांच्या दृष्टिकोनातून ‘स्वातंत्र्य सामान्य माणसाचे!’ हे सदर खूप आवडले.
– किशोर टापरे (ई-मेल)