साहित्य :
२ कप डोशाचे आंबवलेले पीठ
स्टफिंगसाठी :
१ मध्यम भोपळी मिरची, उभी पातळ चिरून
१ मध्यम कांदा, उभा पातळ चिरून
१/२ गाजर, उभे पातळ मॅचस्टिकसारखे काप
१/२ वाटी शिजलेल्या नूडल्स
१ चमचा तेल
१ चमचा बारीक चिरलेली लसूण
१/२ चमचा किसलेले आले
१/२ चमचा सोया सॉस
१ हिरवी मिरची बारीक चिरून
इतर साहित्य :
शेजवान सॉस, गरजेनुसार
तेल डोसा बनवताना कडेने सोडण्यासाठी
कृती :
१) कढईत तेल गरम करून त्यात आलं-लसूण आणि मिरची घालून परतावे. नंतर त्यात भाज्या, नूडल्स घालून मिक्स करावे. सोया सॉस घालून टॉस करावे. मिश्रण बाजूला काढून ठेवावे.
२) तव्यावर डोशाचे पीठ पसरवून पातळ डोसा घालावा. कडेने तेल सोडावे. डोसा वरून सकला की १/२ ते १ चमचा शेजवान सॉस पसरवावा. मधे थोडे सारण पसरवून घ्यावे. एका बाजूने डोसा लालसर झाला की रोल करून डोशाचे २ इंचांचे तुकडे करून सव्र्ह करावे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in