साहित्य :
२ लेटय़ुसची पाने हातानेच तोडून घ्यावीत (१ ते २ इंचाचे तुकडे)
१ लहान टोमॅटो, उभे काप करून
काकडीच्या ५ ते ६ पातळ चकत्या (काकडी सोलून)
लाल मुळ्याच्या ५ ते ६ पातळ चकत्या
१ पाती कांदा, १ इंचाचे तिरपे काप
कांद्याची १ पातळ चकती, मोकळी करून
ड्रेसिंग :
१ चमचा ऑलिव ऑइल
१ चमचा लिंबाचा रस
चिमूटभर ड्राय ओरेगानो
१ लहान लसूण पाकळी, एकदम बारीक किसून
चवीनुसार मीठ आणि मिरपूड

कृती :
१) एक मोठे भांडे (मिक्िंसग बोल) घ्यावे. ड्रेसिंगच्या खाली दिलेले जिन्नस या भांडय़ात एकत्र करावे. नीट मिक्स करावे.
२) सव्‍‌र्ह करायच्या वेळी लेटय़ुसच्या पानाव्यतिरिक्त इतर भाज्या (कांदा, टोमॅटो, काकडी, मुळा, पाती कांदा) तयार ड्रेसिंगमध्ये अलगद हातांनी घोळवाव्या.
३) या घोळवलेल्या भाज्यांमध्ये लेटय़ुसची तोडलेली पाने घालावीत आणि हलकेच टॉस करावे. जास्त वेळ मिक्स करू नये. यामुळे भाज्यांचा, खासकरून लेटय़ुसचा करकरीतपणा जाऊन भाज्या कोमेजतात.
सलाड तयार झाले की लगेच सव्‍‌र्ह करावे.

स्वीट कॉर्न बीट सलाड

साहित्य :
१ मध्यम बीट
१/२ वाटी स्वीट कॉर्न
१/२ चमचा हिरवी मिरची पेस्ट
१ चमचा कोथिंबीर
१/४ चमचा जिरेपूड
१/२ चमचा लिंबाचा रस किंवा चवीनुसार
चवीपुरते मीठ

कृती :
१) बीट कुकरमध्ये वाफवून घ्यावे. सोलून अगदी लहान तुकडे करावेत.
२) स्वीट कॉर्न मायक्रोवेव्हमध्ये ५० सेकंद वाफवून घ्यावे.
३) बीट आणि स्वीट कॉर्न एकत्र करावे. त्यात मिरची पेस्ट, जिरेपूड, लिंबू रस, कोथिंबीर आणि मीठ घालून टॉस करावे.
जेवणात साईड डिश म्हणून सव्‍‌र्ह करावे.

डेलीशियस लेटय़ुस सलाड

साहित्य :
२०० ग्राम सलाडची पाने (मी रोमेन लेटय़ुस वापरला होता. याची चव जास्त चांगली असते आणि हा लगेच मऊ पडत नाही.)
१ मध्यम संत्रे
१ मध्यम लाल आणि करकरीत सफरचंद
१/२ वाटी मलबेरी
१/४ ते १/२ वाटी डाळिंब
१ लहान कांदा (उभे पातळ काप)
६-७ बदाम, अर्धवट कुटलेले
२ ते ३ चमचे बेदाणे
३ चमचे पिस्ता
१/४ वाटी चीजचे लहान तुकडे
१/४ वाटी संत्र्याचा ज्यूस
२ चिमटी मीठ
२ चिमटी मिरपूड
आवडीनुसार सलाड ड्रेसिंग
कृती :
१) संत्रे सोलून घ्यावे. फोडींवरील पातळ साल काढून हलक्या हाताने आतील गर वेगळा काढावा.
२) सफरचंद कापून मध्यम फोडी कराव्यात. संत्र्याच्या ज्यूसमध्ये या फोडी बुडवून बाहेर काढून ठेवाव्यात.
३) लेटय़ुसची पाने धुऊन घ्यावी. हाताने मध्यम तुकडे करावेत. कात्री किंवा सुरीने चिरू नये, हातानेच तुकडे करावेत.
४) सलाड ड्रेसिंग आणि संत्र्याचा ज्यूस एकत्र करावे.
५) मोठे काचेचे बोल घ्यावे. त्यात आधी लेटय़ुसमधली निम्मी पाने घालावीत. त्यावर निम्मे सफरचंद, संत्रे, मलबेरी, डाळिंब, कांदा, बदाम, पिस्ता आणि चीज घालावे. त्यावर थोडेसे मीठ आणि मिरपूड भुरभुरावे. सलाड ड्रेसिंग आणि ऑरेंज ज्यूसचे निम्मे मिश्रण घालावे. त्यावर परत उरलेले लेटय़ुस, सफरचंद, संत्रे, मलबेरी, डाळिंब, कांदा, बदाम, पिस्ता, आणि चीज घालावे. थोडेसे मीठ आणि मिरपूड भुरभुरावे. सलाड ड्रेसिंग आणि ऑरेंज ज्यूसचे उरलेले मिश्रण घालावे.

टिप्स :
हे सलाड काही तास आधी बनवून फ्रिजमध्ये ठेवू शकता. अशा वेळी कांदा आणि ऑरेंज ज्यूस आधी घालू नये. सव्‍‌र्ह करायच्या आधी १० मिनिटे हे दोन्ही घालून मिक्स करावे.
यामध्ये सिझनमध्ये असतील अशी फळेसुद्धा घालू शकतो. द्राक्षं, कलिंगड, आंबाही छान लागतो.
कांदा ऐच्छिक आहे.
मी गार्लिक ड्रेसिंग वापरले होते. पण मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची ड्रेसिंग्ज मिळतात. आवडीनुसार वापरावी.
वैदेही भावे – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader