साहित्य :

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

८ लादीपाव
६ चमचे अमूल बटर
२ चमचे भोपळी मिरची, एकदम बारीक चिरून
किंचित मीठ

मसाल्यासाठी :

२ चमचे तेल
२ मध्यम कांदे बारीक चिरून

१ चमचा आले-लसूण-मिरची पेस्ट
१ टॉमेटो बारीक चिरून
१ लहान टॉमेटोची प्युरी
पाव चमचा आमचूर पावडर
अर्धा चमचा लाल तिखट
२ चिमटी मिरपूड
पाव चमचा धणेपूड
२-३ चिमटी बडिशेप पावडर
मीठ
अर्धा चमचा पावभाजी मसाला
सजावटीसाठी चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टॉमेटो

कृती :

१)     कढईत २ चमचे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. कांदा अर्धवट परतला की आले-लसूण-मिरची पेस्ट घालावी.
२)     कांदा नीट परतला की त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून मध्यम आचेवर टोमॅटो एकदम मऊ  होईस्तोवर शिजू द्यवा. टोमॅटो प्युरी घालून मध्यम आचेवर २ ते ४ मिनिटे उकळी काढावी. मिश्रण खूप घट्ट झाले थोडे पाणी घालावे.
३)     यामध्ये आमचूर पावडर, लाल तिखट, मिरपूड, धणेपूड, गरम मसाला, बडिशेप पावडर, चवीपुरते मीठ आणि थोडा पावभाजी मसाला घालून मिक्स करावे. मसाला किंचित पातळ असावा.
४)     प्रत्येक पाव विलग करून घ्यावा आणि वडापावसाठी कापतो तसा मधून आडवा कापावा. प्रत्येक पावाला थोडे बटर लावून घ्यावे.
५)     तवा गरम करून त्यात १ चमचा बटर घालून त्यात १ चमचा बारीक चिरलेली भोपळी मिरची घालावी. काही सेकंद परतून साधारण २ चमचे तयार मसाला घालावा. त्यावर लगेच कापलेला पाव उघडून भाजून घ्यावा.
६)     अशा प्रकारे सर्व पाव भाजून घ्यावे.
सव्‍‌र्ह करताना कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा आणि किंचित टोमॅटो पेरून गरमागरम सव्‍‌र्ह करावे.

गार्लिक ब्रेड

साहित्य :

१ फूट फ्रेंच ब्रेड लोफ
मीठ चवीप्रमाणे
२ ते ३ चिमटी इटालियन ड्राय हर्ब्स
गार्लिक बटर बनवण्यासाठी
६ चमचे बटर
१ चमचा ऑलिव्ह ऑइल
५ लसणीच्या पाकळ्या, बारीक किसलेल्या

कृती :

१)     ओव्हन ४००ो (२०० उ) वर प्रिहीट करावे.
२)     ब्रेड आडवा कापून दोन तुकडे करावेत.
३)     गार्लिक बटर स्प्रेड बनवण्यासाठी बटर हलके वितळवून घ्यावे. नंतर यात ऑलिव्ह ऑइल आणि किसलेले लसूण घालून नीट मिक्स करावे.
४)     तयार गार्लिक स्प्रेड ब्रेडच्या आतील पांढऱ्या भागावर लावावा तसेच डाव्या-उजव्या कडांनाही लावावा. ओरेगानो बोटांनी चुरगाळून पावावर भुरभुरावा. ५ ते ८ मिनिटे बेक करावे किंवा कडा लाइट ब्राऊन होईस्तोवर बेक करावे. चवीपुरते मीठ भुरभुरावे.
बेक केलेला ब्रेड धारदार सुरीने कापावा. १ ते दीड इंचाच्या स्ट्रिप्स कराव्यात. गार्लिक ब्रेड जनरली, टोमॅटो पास्ता सॉसबरोबर सव्‍‌र्ह करतात, पण नुसताही छान लागतो.

टीप :

यात आवडीनुसार थोडे चिली फ्लेक्स घालू शकतो.

झटपट ब्रेड पिझ्झा

साहित्य :

४ ब्रेडचे स्लाईस
अर्धी वाटी पिझ्झा सॉस
अर्धी वाटी भोपळी मिरचीचे पातळ काप
अर्धी वाटी कांद्याचे पातळ काप
टोमॅटोच्या १२ पातळ चकत्या
अर्धा वाटी किसलेले पनीर (ऐच्छिक)
अर्धी ते पाऊण वाटी किसलेले चीझ
ड्राय बेसिल किंवा ओरेगानोची पाने
२ ते ३ चिमटी मीठ
चिली फ्लेक्स आवडीनुसार

कृती :

१)     ओव्हन ४००ो (२०० उ) वर प्रिहीट करण्यास लावावे. चिरलेल्या सर्व भाज्यांवर थोडे मीठ पेरावे.
२)     प्रत्येक ब्रेड स्लाईसवर पिझ्झा सॉस लावावा. त्यावर टोमॅटो, कांदा आणि भोपळी मिरची घालावी. वरून किसलेले पनीर पेरावे. ड्राय बेसिल पाने चुरडून भुरभुरावीत.
३)     आवडीनुसार चीज घालावे आणि साधारण १० मिनिटे बेक करावे किंवा चीज वितळून किंचित सोनेरी झाले की लगेच पिझ्झा बाहेर काढावा.
गरमागरम सव्‍‌र्ह करावा. सव्‍‌र्ह करताना वरून चिमूटभर ड्राय रेड चिली फ्लेक्स आणि ड्राय बेसिल पाने क्रश करून भुरभुरावीत.

टीप :

  • मायक्रोवेव्ह नसल्यास तव्यावर थोडे बटर लावून पिझ्झा ठेवावा. मंद आचेवर शेकावा. चीज वितळण्यासाठी वर गोलट झाकण ठेवावे.
  • भोपळी मिरची, कांदा, टोमॅटोबरोबर मश्रुम, ऑलिव्ह, पालक घालू शकतो तसेच अननसाचे तुकडेही पिझ्झावर छान लागतात.

वैदेही भावे – response.lokprabha@expressindia.com