हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘‘तो आज जिवंत असता तर तुमच्यासोबतच या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला हजर राहिला असता. ती असती तर कदाचित प्रदर्शन पाहात असतानाच तुम्ही तिला टेक्स्ट मेसेज करत असता. ती आज असती तर एव्हाना कदाचित तिने लिहायला घेतलेले पुस्तक पूर्णही केले असते. तो असता तर त्याने तुमच्यासोबत आजही युक्तिवाद केला असता. तो असता आज तर कदाचित तो एड्स सोबत घेऊन जगत राहिला असता. ते असते तर कदाचित तुमच्यासोबत बाहेर सिगारेटी फुंकत बसले असते. ती असती तर कदाचित आज तिने एखादे असेच कलादालन सुरू केले असते. तो असता तर त्याने तुला कवेत घेतले असते या क्षणी. आणि कदाचित तो असता तर या चित्रामध्ये तोच दिसला असता..’’
संपूर्ण कॅनव्हॉसभर या व अशाच ओळी लिहिलेल्या असतात.. ती आज असती तर किंवा तो आज असता तर.. याचा अर्थच असा की, आज ते/ती आज हयात नाहीत.
एचआयव्ही एड्सने प्राण गमवावा लागलेल्या दुर्दैवी लोकांबद्दल ही कलाकृती बोलत असते. गेले काही महिने एड्सशी संबंधित १०० हून अधिक कलाकृतींवर अमेरिकेमध्ये सर्वाधिक चर्चा होते आहे. एड्स आणि कलाकृती असा विचारही फारसा होताना दिसत नाही. अशा वेळेस अमेरिकेत गेल्या ३० वर्षांत एड्सच्या विकारामुळे अमेरिकन कलेमध्ये होत गेलेल्या बदलांचे व त्याच्या समाजावरील प्रभावाचे सिंहावलोकन करणारे प्रदर्शन सध्या चच्रेत आहे.
अलीकडे या सर्व प्रयत्नांना ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतर या कालखंडातील कलाकृती एकत्र करून १०० हून अधिक कलाकृतींचे प्रदर्शन तयार करण्यात आले असून ते अमेरिकेतील शहरांमध्ये फिरते आहे. या प्रदर्शनाचे संयोजक असलेले युनिव्हर्सिटी ऑफ बफेलोच्या दृश्यकला संशोधन विभागाचे संचालक जोनाथन डेव्हिड वाट्झ सांगतात, गेल्या ३० वर्षांच्या या प्रवासानंतर आपण कुठे आहोत आणि परिस्थितीत काही फरक पडलाय का, हेही या निमित्ताने ताडून पाहायचे आहे. या कलाकृती खूप बोलक्या आहेत. एड्स झालेल्यांचे विदारक वास्तव,
जीवनाची वाताहात त्या दाखवून देतात. आजही एचआयव्हीग्रस्तांच्या संख्येत वाढच होते आहे, हे भीषण वास्तव आहे आणि त्या भीषणतेला भिडणाऱ्या अशा या कलाकृती.
सहभागी कलावंतांमधील एक जोय तेरील म्हणतो, या कलाकृती साकारतानाच त्यांना कोणीही संग्रहालयात ठेवणार नाहीत किंवा विषय एड्सशी संबंधित असल्याने त्यांची विक्रीही होणार नाही, याची पूर्ण कल्पना कलावंतांना होती. पण समाजाचे ऋण महत्त्वाचे होते. भावासारखाच असलेला मित्र गमावण्याचे दु:ख मला आहे. पण विकारग्रस्तांच्या दु:खाला पारावर नाही. ते आहेत तोवर त्यांना माणूस म्हणून जगता यायला हवे, तो त्यांचा अधिकार आहे. आणि आपले माणूस म्हणून असलेले कर्तव्यच.
या कलावंतांपैकी प्रत्येक जण आपापल्या परीने आपापल्या माध्यमांतून व्यक्त झाला आहे. चित्र, छायाचित्र, शिल्प, मांडणीशिल्प असे सारे काही यात आहे. एका छायाचित्रात उधळलेल्या रेडय़ांनी एकाला कडय़ावरून खाली लोटल्याचे. समाजाने लोटल्याची भावना व्यक्त करणारे. दुसऱ्या रेखाचित्रात फुलांच्या ताटव्यातून खुरटत जाणारे फूल छाटून वेगळे काढलेले दिसते. एड्स वर्णभेद मानत नाही, कृष्ण-गौर सर्वच वर्णींयांना तो भीषण विकार होऊ शकतो, असे सांगणारे एक छायाचित्र आहे. तर विकार झाल्यानंतर अंगभर राहिलेले व्रण दाखविणारे एक छायाचित्र आहे तर त्या व्रणांची व्यथा व्यक्त करणारी दुसरी एक अमूर्त चित्रकृतीही आहे. प्रसारमाध्यमांचे लक्षही मग ‘टीआरपी’साठी एचआयव्हीग्रस्तांकडे जाते, याचे मार्मिक भाष्यही एका कलाकृतीत आहे. रोमँटिसिझममधून फुलत चाललेला प्रवास नंतर मानवी कवटी किंवा सापळ्याच्या दिशेने कसा नेतो, तेही वेधक पद्धतीने एका चित्रात पाहायला मिळते.
एचआयव्हीची भयग्रस्तता तर आपल्याकडेही तेवढीच भीषण आहे. पण आपल्याकडे कुणी कलाकृतींमधून असे फारसे व्यक्त झालेले दिसत नाही. काही कलाकृती आहेत. पण अमेरिकेमध्ये जसे नामवंतांपासून सर्व कलावंत चळवळ म्हणून उभे ठाकले तसे आपल्याकडे झालेले दिसत नाही. आपल्याकडे तर एचआयव्हीनिमित्ताने मुंबईमध्ये एक सेक्स म्युझियम चांगल्या पद्धतीने उभारण्यात आले. त्यातून चांगल्या पद्धतीने लैंगिक शिक्षण दिले जावे, असा हेतू होता. ते होतेही कलात्मक व शास्त्रीय. त्याची हाताळणी उत्तम पद्धतीने केलेली होती. पण आपण ते बंद कसे पडेल, हेच प्राधान्याने पाहिले.. म्हणूनच आपले समकालीनत्व कमी पडत्येय!
विनायक परब – response.lokprabha@expressindia.com, twitter – @vinayakparab