या कलाकृतीकडे वेडेपणा, भुक्कडपणा किंवा भन्नाटपणा म्हणून पाहू नका. तर मानव आणि प्राणी-पक्षी यांच्या शतकानुशतकांच्या आंतरसंबंधांचा शोध म्हणून पाहा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एटिनी चाम्बौडच्या कलाकृती सुरुवातीला बिलकूल लक्षात येत नाहीत. केवळ अमूर्त चित्र पाहत असल्याचाच भास आपल्याला होत राहतो. त्यातून वेगळा शोध घेण्याचा प्रयत्न आपण करतोही, पण तो केवळ त्याच्या रूपाकाराचा शोध ठरतो. नंतर आपण त्यामागची संकल्पना वाचतो त्या वेळेस लक्षात येते की, रूपाकारालाही भेदून उरणारे, चिरकाळ टिकणारे असे काहीतरी या कलाकृतीमध्ये दडलेले आहे. ती कल्पना समजल्यानंतर तर आपल्याला चाम्बौडच्या भन्नाटपणाचे कौतुकच अधिक वाटते. पण केवळ हीच कलाकृती नव्हे तर त्याच्या अन्य कलाकृतीही निसर्गातील अनेकविध घटकांशी संबंधित अशाच असतात.
वरच्या बाजूस चौकटीत दिसणारी दोन चित्रे ही या कलावंताने तांब्याच्या पत्र्यावर चितारलेली आहेत. चित्रकलेतील जाणकारांना तांब्यावरची ही कलाकुसर, त्याचा पोत आणि त्यावर केलेली ऑक्सिडेशनची प्रक्रिया यामुळे सहज लक्षात येते. पण चाम्बौड त्याहीपलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो. मुळात या चित्रांमागची संकल्पना वाचली की, मग सारे काही लक्षात येते.
प्राण्यांच्या विश्वामध्ये त्यांच्या मूत्राला महत्त्व असते. अनेक प्राणी त्यांचा इलाखा व त्यातील त्यांचे वास्तव्य इतर प्राण्यांच्या लक्षात यावे यासाठी अनेक ठिकाणी सूचक पद्धतीने त्याची फवारणी करतात. अशा अनेक प्राण्यांचे मूत्र गोळा करून त्याची तांब्याच्या पत्र्यावर फवारणी करून त्यावर त्याने ऑक्सिडेशन प्रक्रिया केली आहे. त्यामुळे आपल्याला समोर ऑक्सिडेशनमुळे अमूर्त आकार दिसत असले तरी जे मूत्र प्राण्यांच्या एकमेकांविषयी असलेल्या वर्तनामध्ये बदल करण्याची क्षमता राखते, त्याला कलावंताने स्फटिकरूप देऊन ते चिरस्थायी केले आहे. यावरून प्राण्यांच्या तत्कालीन वर्तनाचा कलात्मक पद्धतीने अभ्यास केला जाऊ शकतो, असे चाम्बौडला वाटते. त्याने याला ‘नेमलेस’ असे सूचक नाव दिले आहे.
त्याने वेगवेगळ्या प्रदर्शनांच्या वेळेस केलेल्या कलाकृतींमध्ये असा कोणत्या ना कोणत्या प्राण्याचा अथवा पक्ष्याचा वापर केलेला दिसतो. त्याच्या एका कलाकृतीमध्ये तिरक्या एकमेकांना छेद देणाऱ्या सळ्यांमधून एक मोठी रचना साकारलेली दिसते. या सळ्या एकमेकांना छेद देतात त्या ठिकाणी लहान आकाराची मानवी मुंडक्याच्या आकाराची एक गोष्ट पाहायला मिळते. प्रतीकात्मक मानवी चित्रण म्हणूनच त्याचा वापर त्याने केलेला दिसतो. ही सळ्यांची छेदरचना वेगवेगळ्या पद्धतीने फिरवता येईल, अशी सोय त्याने ठेवली आहे. मानवाने पाळलेला पहिला पक्षी म्हणजे कबुतर. त्यामुळे त्याने कलादालनाच्या ज्या भागात ही रचना ठेवली होती, तिथे तीन दिवस आधी कबुतरं पाळली. त्यांना रंगीत दाणे खाऊ दिले. तीन दिवसांनंतर त्या दालनात कबुतरांची रंगीत विष्ठा इतस्तत पसरलेली होती, त्या वेळेस त्या रंगीत
विष्ठेसकट ती छेदरचना हे सारे चाम्बौडने कलाकृती म्हणून सादर केले. तो म्हणतो, याकडे वेडेपणा, भुक्कडपणा किंवा भन्नाटपणा म्हणून पाहू नका. तर मानव आणि प्राणी-पक्षी यांच्या शतकानुशतकांच्या आंतरसंबंधांचा शोध म्हणून पाहा. काही वेळेस आपण आपली लहर किंवा आवड म्हणून प्राणी-पक्ष्यांना पाळतोही. पण मग तेव्हा आपण ठरवून त्यांचे वर्तन बदलतो का? ते कितपत योग्य? अयोग्य? आणि त्यांच्या सृष्टीचा विचार कोण करणार?
म्हणूनच मग आणखी एका कलाकृतीमध्ये तो माणसाळवलेल्या या पहिल्या पक्ष्याचीच एक पिग्मेंट कलाकृती घेतो. ठरवून ती कृष्णधवल निवडलेली असते आणि मग मानवी संस्कारानुसार त्यावर रंग चढलेले दिसतात. कधी एखादी वेगळ्या रंगाची छटा तर कधी पूर्ण रंगच बदललेला.
पण चाम्बौड हा काही केवळ फक्त पक्षी-प्राणी यांवरच कलाकृती करणारा कलावंत नाही. तो खूप वेगळ्या पद्धतीने विचार करतो. त्याची एक व्हिडीओ कलाकृती ही शब्द या विषयावर तर दुसरी दगड या विषयावर आधारलेली आहे. दगड या कलाकृतीत तो म्हणतो की, दगडाला स्वतला व्यक्त होता येत नाही. तो मूक आहे. पण मानवाने प्राचीन काळापासून त्यावर शब्द कोरले आणि आपल्या मनातले बोलण्याचे काम त्याला दिले, ते काम तो दगड आज एकविसाव्या शतकातही नेमाने करतो. तर शब्द या व्हिडीओ कलाकृतीमध्ये शब्द आपलेच असले तरी त्यात किती भेद असतो आणि उच्चारानुसार कशा आपल्याच आवाजाच्या छटा बदलत जातात ते तो दाखवून देतो. आणि मग अखेरीस शब्द केवळ तांत्रिक होता तेव्हा ते पाडकामाच्या बुलडोझरप्रमाणे कसे शाब्दिक पाडकाम यांत्रिकपणे करत राहतात, ते दाखवून देतो. तो आपल्याला मुळातून वेगळ्या पद्धतीने विचार करायला भाग पाडतो, तोही समकालीन कलेच्या वळणाने, म्हणून तो समकालीन ठरतो.
विनायक परब
twitter – @vinayakparab
vinayak.parab@expressindia.com