नागरीकरणासारख्या प्रसंगी क्लिष्ट वाटणाऱ्या विषयाचाही वेगळा दृश्यविचार केला जाऊ शकतो..
जमाना नागरीकरणाचा आहे. गाव-खेडीही हळूहळू मोठी होतात आणि मग त्यांचा प्रवास शहर आणि महानगरे होण्याच्या दिशेने सुरू होतो. पण अनेक शहरांच्या बाबतीत ही प्रक्रिया अनियोजित पद्धतीने होत जाते. केवळ मुंबई-पुण्याचीच नव्हे तर जगातील अनेक शहरांची वाढ ही आडव्या पद्धतीनेच आधी होते. नागरिकरणाच्या इतिहासात त्याची नोंद फारशी घेतलीही जात नाही, घेतली जाते ती केवळ राजकारणाच्या संदर्भात. कलेचा प्रांत तर या नागरीकरणाच्या प्रक्रियेपासून तसा दूरच. मात्र गेल्या १५ वर्षांपासून फेड्रिको हेर्रेरो हा मध्य अमेरिकेतील कलावंत नागरिकरणाच्या या प्रक्रियेचा दृश्यवेध घेताना दिसतो आहे.
सॅन जोस या निसर्गरम्य शहरातच जन्मलेला आणि वाढलेला फेड्रिको हेर्रेरो दोन हजार साली अवघ्या २२ वर्षांचा होता. शहरातील झाडांवर छोटेखानी आणि वेगळी चित्रे टांगणारा चित्रकार म्हणून तो ओळखला जात होता. त्यानंतर व्हेनिसमधील बिएनालेमध्ये त्याला सवरेत्कृष्ट कलावंत म्हणून गौरविण्यात आले आणि त्यानंतर मध्य अमेरिकेतील महत्त्वाच्या कलावंतांमध्ये त्याची गणना होऊ लागली. बिएनालेमधील निवड कलावंतांच्या उत्कृष्टतेवरची मोहोर ठरते.
फेड्रिको हा खरे तर चित्रकारच. इतरांप्रमाणेच त्यानेही कॅनव्हॉसवरील चित्रांपासून सुरुवात केली. मात्र नागरीकरणाच्या विचारप्रक्रियेत अडकल्यानंतर त्याचे माध्यम बदलले. इमारती किंवा कुंपणाच्या भिंती, इमारतीचे छत हे त्याचे माध्यम झाले. सुरुवातीस लोकांना असेही वाटले की, हा तर केवळ स्ट्रीट आर्टचाच एक प्रकार आहे. फेड्रिको अतिशय उजळ अशा रंगांचा वापर करतो, त्यामुळे केवळ एक ‘रंगीत गंमत’ म्हणूनही त्याच्याकडे पाहिले गेले. मात्र नंतर त्यामागचा त्याचा सखोल विचार पुढे आला आणि मग लोकांना त्याची ती चित्रे, त्या मागील विचार कळू लागले आणि ही विचारचित्रे असल्याचा साक्षात्कार झाला.
शहरामध्ये असणाऱ्या नानाविध गोष्टी म्हणजे धनिकांची घरे, त्याला लागूनच असणारी तेथे काम करणाऱ्या निम्नवर्गातील लोकांची वसाहत, प्रसंगी झोपडपट्टी, शहरातील मोकळ्या जागा, घरांची रचना, रस्ते, मार्गिका, त्यांचे नियोजन- बकालपण हे सारे हेरून फेड्रिकोने त्यासाठी काही रंगरचना निश्चित केली. कधीही रंगरचनानंतर त्याने आडव्या प्रतलावर त्याच पद्धतीने तर काही वेळेस विहंगावलोकनात्मक (एरिअल) पद्धतीने प्रत्यक्षात उतरवली. त्यातून तयार झालेले उजळ रंगांचे ते चित्र आपल्यासमोर येते. सुरुवातीस कष्ट पडतात, विषयवार रंगरचना समजून घ्यावी लागते. मात्र एकदा का ती समजून घेतली की, मग शहराचे दृश्यरूप समजून घेणे आपणांस सोपे जाते. आता तर एखाद्या शहराचा दृश्यवेध समजून घ्यायचा असेल तर नागरीकरणातील तज्ज्ञ फेड्रिकोची चित्रे पाहा, असे सांगतात हे तर त्याचे यशच म्हणायला हवे. फक्त शहराच्या पायाभूत सुविधाच नव्हेत तर शहराची सांस्कृतिकताही या चित्रांतून लक्षात येते. एखादे शहर रोबोसारखे यांत्रिक कामच करणारे असेल तर फेड्रिकोच्या चित्ररचनेत तेही प्रतिबिबिंत होते. मग अशा वेळेस जे शहराचे व लोकांचे आहे, ते बंद कलादालनात कशासाठी, असा सवाल फेड्रिको करतो आणि म्हणूनच त्याचे आविष्करण थेट शहरात, लोकांमध्येच व्हायला हवे, असा आग्रह धरत तो इमारतींच्या भिंती, त्यांची छते याचा वापर कॅनव्हॉससारखा करतो. नागरीकरणाचा दृश्यवेध घेण्याची त्याची ही विचारप्रक्रियाच नव्हे तर आविष्करण पद्धतीही तेवढीच समकालीनच आहे.
विनायक परब
vinayak.parab@expressindia.com, Twitter – @vinayakparab