मूळ चित्रांचे सुलभीकरण करताना राखलेली प्रतीकात्मकता हे मायकेल वॅन ओफेनचे वैशिष्टय़. त्याची चित्रे ही एक प्रकारची राजकीय टीकाच होय..
प्रदर्शनातील चित्रे पाहायला सुरुवात करताना असे वाटू शकते की, चित्रकाराने बहुधा ही चित्रे अर्धवटच चित्रित केली असून त्याच अवस्थेत आणून कलादालनात लावली आहेत. कारण यात केवळ चित्रातील बारेखाच दिसतात. बारेखा त्याही काहीशा जाडसर अशा ब्रशच्या फटकाऱ्याने साकारलेल्या किंवा मग एखादी व्यक्तिरेखा साकारण्याचा चित्रकाराचा प्रयत्न दिसतो. काही चित्रांमध्ये त्याला व्यक्तिचित्र साकारायचे असावे, असे पाहणाऱ्यास वाटू शकते. अशी अर्धवट चित्रे का बरे कलादालनात लावली असावीत, यातून तर काहीच अर्थबोध होत नाही, असे सतत वाटत असते. असे असले तरी या चित्रातील रंग काहीसे वेगळे, प्रसंगी मोहक आहेत हे तोवर जाणवलेले असते. त्या रंगांमध्ये काहीतरी मजा, गंमत आहे हेही लक्षात आलेले असते. त्या चित्रातील एखाददुसऱ्या व्यक्तिरेखेकडे आपण पाहण्याचा किंवा निरखण्याचा प्रयत्न करतो त्या वेळेस हेही लक्षात येते की, चित्रकाराच्या ब्रशमधील त्या फटकाऱ्यामध्ये एक लयकारी आहे. खास करून झगा घातलेल्या दोन मुली किंवा घोडय़ाची बारेखा असलेले आकाशी रंगाचे चित्र पाहताना तर हे सतत जाणवत असते. मग पुन्हा एकदा त्याचा अर्थ शोधण्याचा एक व्यर्थ प्रयत्न आपण करतो.
दालनात दुसऱ्या बाजूस त्याच वेळेस ज्या चित्रकाराने ही सर्व चित्रे साकारली त्या मायकेल वॅन ओफेन यांची मुलाखत व्हिडीओवर सुरू असते. दरम्यान, हे तर आपल्या पूर्णपणे लक्षात आलेले असते की, ही सर्व चित्रे अमूर्त आहेत. अर्थबोधासाठी काही धागा मिळेल या उद्देशाने आपण मुलाखत लक्षपूर्वक ऐकू लागतो आणि सुरुवातीसच धक्का बसतो.. कारण चित्रकार म्हणतो.. अमूर्त चित्र म्हणजे काय मला माहीत नाही. ती मला कळत नाहीत आणि अमूर्त चित्र काढण्याचा प्रयत्न मी आजवर कधीही केलेला नाही. करणारही नाही. ते जमणाऱ्यातील मी नाही.. आता आपण हे सारे ऐकून अधिकच बुचकळ्यात पडतो.. नंतर मात्र जसजशी मुलाखत पुढे सरकते, तसतशी आपल्याला त्या चित्रांमागची चित्रकाराची भूमिका कळते, समजते आणि उलगडतही जाते.
मायकेल वॅन ओफेनच्या या प्रदर्शनाचे शीर्षक असते ‘जर्मनिया अॅण्ड इटालिया’. जर्मनी आणि इटली हे तसे दोन एकमेकांच्या शेजारील देश. यांच्यामध्ये राजकीय संबंध अनेक वर्षांचे उत्तम राहिले आहेत्, पण जेव्हा राजकीय संबंध प्रस्थापित होतात, त्या वेळेस त्या अनुषंगाने सांस्कृतिक संबंधही येतातच. या दोन्ही देशांमधील संबंधांना इटलीच्या एकत्रीकरणापासून सुरुवात झाली. ऑस्ट्रियाविरोधात दोन्ही देशांनी एकत्र युद्ध केले, तेव्हापासूनचे हे संबंध नंतर उत्तरोत्तर दृढच होत गेले. दुसऱ्या महायुद्धातही हे दोन्ही देश एकाच गटात होते. शीतयुद्धातही समीकरण बदलले नाही. नंतर स्थापन झालेल्या जी-सिक्स देशांच्या गटातही ते एकत्रच होते. २००५ मध्ये तर जर्मन काíडनलची निवड रोमचे बिशप म्हणून करण्यात आली, त्या वेळेस या दृढ संबंधांवर शिक्कामोर्तबच झाले.
राजकारण आणि धर्मकारणातील या सर्व घटनांचे प्रतििबब नंतर सांस्कृतिक संबंधांमध्येही उमटू लागले. दोन्ही देशांतील अनेक चित्रकारांनी मग या संबंधांचे आपल्या चित्रांतून प्रतिकात्मक चित्रण केले. जॉन फ्रेड्रिक ऑव्हबेक एल्डो याचे दोन्ही देशांतील दोन युवतींचे हातात हात घेतलेले चित्र तर विशेष गाजले. अशा या दोन्ही देशांतील संबंध व्यक्त आणि दृढ करणाऱ्या अशा या चित्रांनाच मायकेल वॅन ओफेन याने अमूर्त रूप दिले आहे. याचाच अर्थ आपल्याला सर्वप्रथम मूळ चित्रे पाहावी लागतात. या लेखासोबत अशी दोन मूळ चित्रे आणि त्याची अमूर्त रूपे प्रसिद्ध केली आहेत.
मायकेलने काय केले आहे हे व्यवस्थित समजून घेतले तर लक्षात येते की, त्याने मूळ चित्र घेऊन त्यातील बारकावे काढून टाकले आहेत. आणि त्यातील प्रतिमांचे सुलभीकरण करून त्यात केवळ प्रतीकात्मकता राखली आहे.. कारण त्याच्या आकलनानुसार आता या दोन्ही देशांचे संबंध एवढे दृढ आहेत की, केवळ प्रतीकात्मकता लक्षात घेतली तरी दोघांनाही त्यांच्या दृढ संबंधांची जाणीव होते, त्यासाठी बारकाव्यांची गरज नाही. वेगळ्या अर्थाने पाहायचे तर मायकेल वॅन ओफेनची ही चित्रे अमूर्त असली तरी ती राजकीय ठरतात. या त्याच्या विचारात आणि प्रतीकात्मक सुलभीकरण केलेल्या अमूर्तामध्येच त्याचे समकालीनत्व दडलेले आहे.
विनायक परब
vinayak.parab@expressindia.com, twitter – @vinayakparab