‘पेरणीची नीतिकथा’, ‘लोकांनी तुमच्यावर प्रेम करावे असे वाटत असेल तर त्यासाठी.’, ‘नऊ मूठ स्टार्च आणि नऊ मूठ साखर घ्या.’, ‘अंतर नसतेच मुळी, तुमचे मन त्याच्या मनाशी थेट संवाद साधतेय, याला कोणताच पर्याय नाही मुळी!’ प्रदर्शनाच्या प्रवेशद्वाराजवळच काही शीर्षके लिहिलेली असतात.. प्रदर्शनाच्या प्रवेशद्वाराजवळची ही शीर्षके आपल्याला काहीशी बुचकळ्यात टाकतात. आतमध्ये प्रवेश केल्यावर गूढ आफ्रिकन संगीत कानावर येते. आपल्याकडे जादू करताना वापरतात तसे काहीसे आली, काली, महाकाली, काली कलकत्तेवाली.. अशा आशयाचे काहीसे आफ्रिकन बरळले जाणारे शब्द एकापाठोपाठ एक कानावर येतात. आतमधील वातावरणही काही गूढच असते. जारणमारण विद्य्ोचा प्रयोग या ठिकाणी होत असावा बहुधा, असा विचार मनात येतो..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
त्याच वेळेस आपण रेनी स्टौट ऊर्फ फातिमा मेफिल्डच्या सुरू असलेल्या व्हिडीओसमोर पोहोचतो. एक खेळ सुरू असावा, कारण समोरच्या दृश्यामध्ये एक आखलेला पट दिसतो. पण सोंगटय़ा मात्र दिसत नाहीत. फासे कुठे आहेत याचा विचार आपल्या मनात येत असतानाच हलवून फासे टाकले जातात, तशीच कृती केली जाते. पण प्रत्यक्षात पटावर पडतात ती हाडे असतात, लहान आकाराची. त्याद्वारे मोजून पटावरची कवटी पुढे सरकवली जाते.
..आता निसर्गाच्या पटावर पहुडलेली ती (आफ्रिकन महिला म्हणजेच या प्रदर्शनाची नायिका रेनी स्टौट ऊर्फ फातिमा मेफिल्ड) हळुवार उठते आजूबाजूला पडलेली सुकलेल्या झाडांची मुळे गोळा करते. ती विशिष्ट प्रकारच्या मुळांचा शोध घेते आहे, हे लक्षात येते. गूढ संगीताची सोबत असतेच. ती मागे वळते आणि म्हणते, ‘‘मी तुम्हाला पूर्ण बरे करू शकते. मी तुमच्या सर्व प्रकारच्या जखमांवर उतारा देऊ शकते. मी तुमचे भविष्य सांगू शकते. या आपणच आपली नियती ठरवू या.’’ आपल्याला प्रदर्शनाच्या विषयाचा उलगडा होतो. जारणमारण, जादू, अंतर्यामीच्या शक्ती जागृत करून त्याद्वारे काही कृत्ये घडवून आणणाऱ्या संस्कृतीशी हे सारे संबंधित आहे. आता आपल्याला प्रदर्शनाची उकल नक्कीच होईल, असेही वाटू लागते. कारण बहुधा ते पाहण्याचे सूत्र गवसण्याच्या अतिशय जवळ आपण पोहोचलेले असतो.
गेली अनेक वष्रे रेनी स्टौट तिच्या विविध कलाकृतींमधून अशा प्रकारे आदिम आफ्रिकन अंत:प्रेरणांचा शोध घेते आहे. अर्थात असा शोध घेणारी ती काही पहिलीच नाही. आफ्रिकन जादू आणि लोकपरंपरेच्या या शोधाला सुरुवात झाली ती चार्ल्स चेस्टनट यांच्यापासून, त्यांनी १८९९ साली ‘द काँजूर वूमन’ या त्यांच्या कथासंग्रहामध्ये आफ्रिकन लोकपरंपरेतील जादूई गूढ गोष्टींचा उलगडा केला. तोच धागा पकडून झोरा निअले हर्स्टन हिने ३० वर्षांनंतर याच संदर्भात अधिक संशोधन करत या गूढ आफ्रिकन लोकपरंपरांवर लिखाण केले. लेखक अलिस वॉकर आणि रॉबर्ट हेमेन्वे यांनी हर्स्टनच्या निधनानंतर तब्बल दहा वर्षांनी पुन्हा एकदा तिच्या कार्यकर्तृत्वाची जाणीव नव्या पिढीला करून दिली. तोच परंपरेचा धागा पकडून रेनी आता पुढे जाते आहे. तिच्यासाठी माध्यम आहे ती, तिचीच मानसकन्या असलेली व्यक्तिरेखा फातिमा मेफिल्ड. फातिमाच्या निर्मितीची प्रेरणा रेनीला हर्स्टनच्या मेरी लेवीऊ या व्यक्तिरेखेवरून मिळाली असावी. फातिमा ही व्यक्तिरेखा रेनीची निर्मिती आहे. तिला जे जे करावेसे वाटते ते सारे ती या फातिमा मेफिल्डच्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून घडवून आणते. ही फातिमा भविष्य सांगणारी, आयुर्वेदतज्ज्ञासारखी आफ्रिकन जडीबुटींमधील उपचारांत तज्ज्ञ तर आहेच, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती गूढ विषयांमधीलही तज्ज्ञ आहे, ती ज्योतिषी आहे. जे प्रत्यक्षात घडणे कठीण आहे असे वाटते, ते ते सारे अंत:प्रेरणेच्या शक्तीच्या माध्यमातून घडवून आणण्याची तिची क्षमता आहे. हेच सारे समजावून घेतल्यानंतर प्रदर्शन पाहणे व तेही आपल्या पद्धतीने समजून घेणे सोपे जाते.
आता प्रदर्शनामध्ये फेरफटका मारताना आपल्याला एक गोष्ट लगेचच लक्षात येते ती म्हणजे समोर प्रदíशत झालेल्या वस्तूंचा थेट संबंध हा गूढशक्ती आणि त्यांना खूश करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींशी संबंधित आहे. म्हणजे गूढ शक्तींना आकर्षति करण्यासाठी वापरले जाणारे अंगारे-धुपारे, अत्तरे, त्यांच्या वेधक कुपी, त्यांना आकर्षति करणारी रंगरचना व प्रत्यक्षात एखादी कृती करण्यापूर्वी साधनसाहित्य म्हणून केली जाणारी नानाविध गोष्टींची गूढ मांडणी हे सारे या प्रदर्शनात केवळ पाहता नाही तर अनुभवता येते. कारण यातील अनेक गोष्टी मांडणीशिल्पाप्रमाणे आहेत. त्यात रसिकांचा सहभागही अपेक्षित आहे. म्हणजे एक सहा फूट यंत्र आहे, ज्यावर लिहिलेले आहे की, हाऊस ऑफ मिसचिफ अॅण्ड चान्स. ही संधी टाळू नका, तुमची इच्छा किंवा तुम्हाला असलेला सर्वात मोठा त्रास एका कागदावर लिहा आणि या यंत्रात टाका.. कदाचित इच्छा पूर्ण झालेलीही असेल किंवा त्रास संपलेलाही असेल. संधी घेऊन तर पाहा.. झाडांची मुळे वापरलेल्या कलाकृती त्या जडीबुटीशी जोडल्या गेलेल्या अनेक अंत:प्रेरणा सहज सांगून जातात.
या प्रदर्शनाला आणखी एक किनार आहे ती म्हणजे अगदी सुरुवातीपासून आफ्रिकन मंडळींची विविध ठिकाणी झालेली कोंडी. वर्णभेदामध्ये त्यांच्यावर अन्याय झालाच. गौरवर्णीयांनी त्यांना अतिशय अपमानास्पद वागणूक तर दिलीच, पण त्यांच्या अस्तित्वासोबतच त्यांच्या प्रथा-परंपरा संपवून टाकण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न जगभरात झाले. युरोप- अमेरिकेत तर हे प्रयत्न सर्वाधिक झाले. मूळ आफ्रिकन असलेल्या मंडळींना अमेरिकेत सन्मान मिळू लागला तो गेल्या काही वर्षांमध्ये. गौरवर्णीय नसलेले बराक ओबामा म्हणूनच तर राष्ट्राध्यक्ष होऊ शकले. आफ्रिकन व मूळच्या रेड इंडियन्सच्या सन्मानाचे प्रतीक म्हणून अमेरिकेत आता अमेरिकन इंडियन म्युझियम्स अस्तित्वात आली आहेत. परंतु आज जे टिकलेले दिसते ते टिकवण्यासाठीचा आफ्रिकन मंडळींचा प्रवास हा अक्षरश: वेदनांनी भरलेला आहे. या जादुई-गूढ गोष्टींमध्ये मानवी उक्रांतीच्या कथा दडलेल्या आहेत, असे अलीकडच्या वैज्ञानिक संशोधनात लक्षात आल्यानंतर तर यापूर्वी अवैज्ञानिक म्हणून दुर्लक्ष केलेल्या या गोष्टींना अधिक महत्त्व आले आहे. यातील अवैज्ञानिक गोष्टी सोडून मानवी वर्तनाचा अभ्यास मोलाचा ठरेल आणि मानवी उत्क्रांतीच्या संदर्भात खूप मोलाच्या गोष्टी तो सांगून जाईल, असे संशोधकांना वाटते आहे.
या सर्व प्राचीन किंवा आदिम गोष्टींचा समकालीनत्वाशी काय संबंध असा प्रश्न मनात येणे महत्त्वाचेच आहे. पण त्याचे उत्तर आदिम अंत:प्रेरणांच्या अर्वाचीन पद्धतीने घेतलेल्या शोधामध्ये आणि आज घेतल्या जाणाऱ्या वैज्ञानिक शोधामध्ये दडलेले आहे. या प्रदर्शनासाठी समकालीन रेनीने व्हिडीओ, ऑडिओ, संगीत, कथाकथन, चित्र, मांडणीशिल्प, शिल्प अशा सर्व माध्यमांचा वापर केला आहे. म्हणूनच हा अर्वाचीन शोध अधिक रोचक ठरतो! अनुभवायलाच हवा हा आदिम अंत:प्रेरणांचा अर्वाचीन शोध!
(रेनीचे काही व्हिडीओज यूटय़ूबवर उपलब्ध आहेत, ते अधिक संदर्भासाठी पाहता येतील)
विनायक परब
response.lokprabha@expressindia.com, twitter – @vinayakparab