एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नेलेले असंख्य धागे. या असंख्य धाग्यांच्या माध्यमातूनच ती कलाकृती तयार झालेली असते. कधी त्या कलाकृतीतील धाग्यांचा रंग फिका होत जातो आणि.. मग ते धागे बाजूच्या भिंतीत अदृश्य झाल्याप्रमाणेच भासतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कलादालनात प्रवेश केल्यानंतर समोरच नजरेस पडणाऱ्या दृश्याने आपण मोहित होऊन जातो. समोर आहे ते नेमके काय, याचा अंदाज घेऊ लागतो. हे मांडणीशिल्प आहे, हे आपल्याला ठाऊक असते. पण हे पठडीतील इतर मांडणीशिल्पांपेक्षा खूपच वेगळे असते. साधारणपणे शिल्प म्हटले की, काही तरी किमान वजन असलेले वेगळ्या आकार- प्रकारातील; पण इथे समोर दिसते त्यात वजनदार काहीच नसते उलट समोरचे दृश्य आपल्याला अगदी वेगळ्यात विश्वात नेणारे असते. समोर दिसते ती चक्क रंगीत धाग्यांमधून साकारलेली कलाकृती. खरे तर प्रथम यास कलाकृती कसे काय म्हणणार असा प्रश्न पडतो. आपल्यासमोर असतात ते कलादालनाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नेलेले असंख्य धागे. या असंख्य धाग्यांच्या माध्यमातूनच ती कलाकृती तयार झालेली असते. कधी त्या कलाकृतीतील धाग्यांचा रंग फिका होत जातो आणि मग क्षणभर ते धागे बाजूच्या िभतीत अदृश्य झाल्याप्रमाणेच भासतात. त्यातूनच वेगळा आभास निर्माण होतो. विविध भौमितिक रचना आकार समोर दिसू लागतात.
दुसऱ्या दोन िभतींमध्ये मृगजळाप्रमाणे काही तरी अधांतरी असल्यासारखा भास होतो. हीदेखील धाग्यांमधूनच साधलेली कलाकृती आहे, हे बारकाईने पाहिल्यावर लक्षात येते. कलाकृतीच्या अधिक जवळ जाऊन आपण पाहातो त्या वेळेस तो अधांतरी पिवळा गोल नाही तर या असंख्य धाग्यांमधूनच तो पिवळा मृगजळाचा गोलाकार तयार झाल्याचे लक्षात येते. या सर्वच्या सर्व कलाकृती आपल्याला एका वेगळ्याच गूढ विश्वात घेऊन जातात आणि प्रत्येक कलाकृती पाहताना आपल्या मनात विविध भावतरंग उमटत असतात. एक कलाकृती पाहताना आपल्यातील उत्साह दाटलेला असतो, त्यावेळेस ताजेतवाने वाटते तर दुसरी कलाकृती पाहताना भास- आभासामुळे गूढ तरंग वातावरणात असल्याचे जाणवत राहते. कलाकृतीच्या जवळ जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस कळते की, हे धागे िभतींवर स्टेपल केलेले आहेत.
कलाकृतीचा विचार करताना लक्षात येते की, कलावंतांने हे साकारण्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. म्हणजे यातील गूढ आभास निर्माण करणारी रचना धाग्यांच्या त्या विणीतून साकारायची म्हणजे प्रचंड संयम असायलाच हवा. शिवाय धागे व त्यावरील रंगांचे कमी- अधिक असलेले प्रमाण यामुळे एक वेगळाच दृश्य संवेदनांचा खेळ इथे सुरू असतो. महत्त्वाचे म्हणजे अॅनी िलडबर्ग हिने हे सगळे साकारताना जिथे प्रदर्शन होणार आहे, तेथील वास्तुरचनेचाही चांगला अभ्यास केलेला दिसतो. कारण तेथील कोन, कोपरे, दोन िभतींमधील कमी- अधिक असलेले अंतर व उपलब्ध प्रकाश म्हणजेच नसíगक प्रकाश किंवा मग दिव्यांची प्रकाशरचना यांचा तिने चांगला वापर केलेला दिसतो. काही कलाकृतींच्या बाबतीत तर नसíगक प्रकाश म्हणजे प्रकाश किरण आणि त्यांची तीव्रता कलाकृतीवर दिवसभरात जसजशी बदलत जाते तसतसा तिचा परिणामही बदलत जातो.
उपलब्ध असलेल्या अवकाशामध्ये धाग्यांच्या आधारे बारकाईने काम करून स्वतचे एक वेगळे अवकाश त्याच जागेत निर्माण करायचे आणि ते करतानाच त्या धाग्यांच्या माध्यमातून तेच अवकाश भेदत उपलब्ध प्रकाश मग तो नसíगक असेल किंवा मग कृत्रिम; त्याच्या वापरातून पुन्हा एका वेगळ्या अवकाशाचाच वापर करत, रसिकाच्या मनात भावनांची वेगळी निर्मितीही करायची हे सारे करण्यामध्येच अॅनीचे समकालीनत्व दडलेले आहे. कमीतकमी साधनांचा वापर करणाऱ्या कलावंतांना मिनिमलिस्ट असे म्हटले जाते. पण अॅनी त्याही पलीकडे जाऊन अनेकविध परिणाम एकाच कलाकृतीमध्ये साधते म्हणूनच तिच्याकडे उत्तम समकालीन कलावंत म्हणून पाहिले जाते.
विनायक परब
vinayak.parab@expressindia.com
@vinayakparab