समाजावर परिणाम करणाऱ्या घटनांवर भाष्य करणे, प्रसंगी समयोचित प्रबोधन करून समाजमन घडवणे, चांगल्या कार्याची प्रशंसा करून त्याला प्रोत्साहन देणे हे वृत्तपत्रांचे इतिकर्तव्य. ‘लोकसत्ता’ने कायमच आपल्या इतिकर्तव्याचे भान बाळगले आहे. गेली चार वर्षे सुरू असलेला ‘सर्वकाय्रेषु सर्वदा’ हा उपक्रम हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण.
समाजोपयोगी कार्य करणाऱ्या निवडक दहा संस्थांची ओळख वाचकांना करून देत त्यांच्या कार्यासाठी आíथक मदतीचे हात उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट. गणेशोत्सवाच्या मंगलपर्वात वाचकांना विविध क्षेत्रात कार्यरत दहा संस्थांची ओळख करून देणाऱ्या या उपक्रमाचे यंदा चौथे वर्ष.
गेली तीन वर्षे ‘लोकसत्ता’ ‘सर्व कार्येषु सर्वदा’च्या माध्यमातून सामाजिक काम करणाऱ्या संस्थाची माहिती वाचकांना करून देत आहे. वाचकही या संस्थांच्या कार्याची महत्ता ओळखून त्यांना भरभरून मदत करतात. अनेकांना सत्पात्री दानाचे समाधानही लाभले आहे. अनेकजण या संस्थांशी कायमस्वरूपी जोडलेही गेले आहेत. आता उपक्रमाच्या या चौथ्या वर्षांच्या दानयज्ञात वाचक दानरूपी आहुती टाकतीलच या अपेक्षेसह.. सर्वकाय्रेषु सर्वदा..
सर्वकार्येशु सर्वदा : समाजासाठी दानयज्ञ
समाजावर परिणाम करणाऱ्या घटनांवर भाष्य करणे, प्रसंगी समयोचित प्रबोधन करून समाजमन घडवणे, चांगल्या कार्याची प्रशंसा करून त्याला प्रोत्साहन देणे हे वृत्तपत्रांचे इतिकर्तव्य.
First published on: 19-09-2014 at 01:33 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarvakaryeshu sarvada