२० व्या शतकाच्या पूर्वार्धात वास्तववादी शैलीमध्ये काम करणाऱ्या दिग्गज शिल्पकारांमध्ये बाळाजी वसंत तालीम यांचा समावेश होतो. त्यांनी जेजे मधून शिल्पकलेचे प्रशिक्षण घेतले. १९११ साली त्यांना प्रतिष्ठेचे ‘लॉर्ड मेयो’ पदकही मिळाले. १९२३ आणि १९३२ या दोन वर्षी त्यांना बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वार्षिक कलाप्रदर्शनातील मानाचे मानले जाणारे सुवर्णपदकही मिळाले. प्रस्तुत छायाचित्रात दिसणारे ‘टकळी’ हे १९३२ साली सुवर्णपदक मिळालेले शिल्प आहे. यातील स्त्रीच्या चेहऱ्यावरचे भावविभ्रम, तिची बैठक कापसाचा मऊशारपणा, टकळी चालवत असतानाची बोटांची पकड या साऱ्या बाबी नेमक्या पद्धतीने त्यात आल्या आहेत. तालीम यांची सर्वात गाजलेली शिल्पकृती म्हणजे शिर्डी येथे समाधिस्थळावर साकारलेली साईबाबांची मूर्ती!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in