आइस बकेट, राइस बकेटबद्दल ऐकताय ना सध्या? आपल्या आयआयटी मुंबईच्या अभ्युदय या संस्थेच्या टेक जीएसआर या सामाजिक विभागाने त्या पलीकडे जाऊन स्मार्ट बकेट हा उपक्रम राबवलाय..

नुकतीच एक बातमी कानावर आली. आयआयटी मुंबईच्या अभ्युदय या संस्थेच्या टेक जीएसआर (Tech GSR) या सामाजिक विभागाने ‘आइस बकेट’ ऐन झोकात असताना ‘स्मार्ट बकेट’ नावाचा एक अनोखा उपक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत त्यांनी हिरेवाडी या कर्जतजवळील गावाला भेट दिली. गाव तसं मोजक्याच बिऱ्हाडांचं पण स्वच्छ आणि माणसंही आपल्या कष्टांना पावती देणारी असं एकंदर निरीक्षणावरून दिसलं. अशा या गावाला भेट देऊन त्यांनी राजमा, सोयाबीन, डाळ, गहू असं प्रथिनेयुक्त अन्नधान्य आणि प्रथमोपचार संच, मॉस्किटो कॉइल्स यांसारख्या सोयी-सुविधेच्या गोष्टी बकेटमध्ये घालून अशा बकेट्स संपूर्ण गावामध्ये वाटल्या.
या उपक्रमामागे त्याचा मूळ हेतू ‘संतुलित आहार’ असा होता. म्हणूनच या बकेट वाटताना त्यांनी गावकऱ्यांना संतुलित आहाराचं महत्त्वही सांगितलं. ते गाव तसं शहरापासून दूर असल्याने तिथे सुख-सुविधा फारच कमी, त्यात आहार संतुलित राखणं आणखीनच कठीण त्यामुळे आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी त्या गावाची निवड केली. आपल्या या उपक्रमाकडे लहान मुलांनीही आकर्षति व्हावं आणि त्यांनाही संतुलित आहाराचं महत्त्व कळावं याकरिता त्यांनी लहान मुलांना रंगवायची पुस्तके, छोटी-मोठी खेळणी वाटून त्यांनाही आपल्यात सामावून घेतलं. वारंवार या गावाला भेट दिल्यानंतर या गावातल्या मोठय़ा अडचणी त्यांच्या लक्षात आल्या. त्यावर उपाय म्हणून त्यांनी या गावात धूरविरहित (स्मोकलेस) चुली ज्यांना वीज अणि इतर ऊर्जेचीही गरज नाही अशा चुली, नसíगक कॅटलाइट खत, विजेची बचत करून अपेक्षेपेक्षा जास्त उजेड देणारे बल्ब अशा प्रकारच्या गरजेच्या वस्तूंचेही वाटप केलं.
हे सगळं ऐकून सकाळचा उत्साह द्विगुणित झाला. ‘आजच्या पिढीला कशाची जाण नाही’ असं म्हणणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिल्यासारखं वाटलं. सकाळच्या यादीतले बरेच प्रश्न डिलीट झाले. शेवटी आपण शिकत असलेल्या विज्ञानाची अंमलबजावणी करणं म्हणजेच खरं ज्ञान नाही का?

Story img Loader