43-lp-foodसाहित्य :

१ जुडी पालक (साफ केलेली पाने)

२ चमचे दही

अर्धा चमचा हळद पावडर

१ चमचा लाल तिखट

१/४ चमचा हिंग

५-६ पाकळ्या लसूण (बारीक चिरलेला)

१ चमचा जिरे

१-२ चमचे तेल

मीठ चवीनुसार.

रोलसाठी साहित्य :

१ वाटी तांदळाचे पीठ

१ चमचा तेल

कृती :

एका भांडय़ात दही, हळद, तिखट, हिंग, लसूण, जिरे टाकून मिक्स करावे. २ चमचे तेल गरम करून त्यावर टाकावे. व सर्व मिक्स करावे. त्यात साफ केलेली पालकची पाने टाकून मिक्स करावे. मीठ चवीनुसार टाकावे.

दुसऱ्या भांडय़ात तांदळाचे पीठ, मीठ, तेल व थोडेसे गरम पाणी टाकून कणकेसारखे पीठ मळावे. छोटे गोळे करून गोलसर लाटून घ्यावे. त्यात मिक्स केलेले पालकचे मिश्रण भरून रोल करावेत. हे रोल बटर पेपरमध्ये गुंडाळून मायक्रो हाय- मीडियमवर ३-४ मिनिटे ठेवावे. मायक्रोमध्ये पसरट काचेचे भांडे वापरावे. गरम गरम कुठल्याही स्वीट चटणीबरोबर सव्‍‌र्ह करावेत.

44-lp-foodचीज कोथिंबीर टोस्ट

साहित्य :

१० ब्रेड स्लाइस

५० ग्रॅम चीज

३-४ हिरवी मिरची

४-५ पाकळ्या लसूण बारीक चिरलेला

५० ग्रॅम बटर

अर्धी जुडी कोथिंबीर (बारीक चिरलेली)

मीठ चवीनुसार.

कृती :

एका भांडय़ात चीज, बटर, चिरलेली हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर मीठ टाकून नीट मिक्स करून ब्रेड स्लाइसवर स्पेड करून घ्यावे. पसरट काचेच्या भांडय़ात हे टोस्ट ठेवून मायक्रो मीडियमवर ८ मिनिटे ठेवावे. ब्रेड स्लाइस नरम वाटल्यास मायक्रो मीडियमवर अजून २-३ मिनिटे ठेवावे. ब्रेड स्लाइसचे त्रिकोणी काप करून गरम सव्‍‌र्ह करावेत.

47-lp-foodभरलेली भावनगरी मिरची

साहित्य :

८-१० भावनगरी मिरची

१/२ वाटी पनीर (किसलेले)

३-४ उकडलेले बटाटे

१ चमचा तिखट

अर्धी वाटी काजू- किसमिस, बेदाणे

२ चमचे तेल

मीठ चवीनुसार.

कृती :

भावनगरी मिरचीला उभे कापून आतल्या बिया काढाव्यात. एका भांडय़ात पनीर, बटाटे, तिखट, काजू- बेदाणे, मीठ टाकून एकजीव करून घ्यावे. हे मिश्रण मिरचीमध्ये भरून थोडेसे तेल लावून काचेच्या पसरट भांडय़ात ठेवून मायक्रो हायवर ३ मिनिटे ठेवावे. परत थोडेसे तेल लावून मायक्रो हाय वर ३ मिनिटे ठेवावे. गरम सव्‍‌र्ह करावे.

45-lp-foodदालिया खीर (बार्ली)

साहित्य :

१ वाटी दालिया (भिजलेले १ दिवस अगोदर)

१ वाटी दूध    ल्ल अर्धी वाटी ओल्या नारळाचे खोबरे

अर्धा चमचा जायफळ

१/४ वाटी गूळ

कृती :

एका भांडय़ात दूध, खोबरे जायफळ व गूळ टाकून मायक्रो मीडियमवर २ मिनिटे ठेवावे. नंतर त्यात दालिया टाकून नीट मिसळून घ्यावे. व मायक्रो लोवर ८-१० मिनटे ठेवावे. दालिया कडक वाटल्यास अजून ४-५ मिनिटे ठेवावे.

भिजवलेल्या दालिया २-३ वेळा पाण्यातून धुऊन घ्याव्यात. म्हणजे याचा वास निघून जाईल.

46-lp-foodग्रीन चिकन व मशरूम कोस्ट

साहित्य :  ४ चिकन कोस्ट  (धुऊन साफ केलेले)

२ वाटी मशरूम (बारीक चिरलेले)

१ चमचा काळी मिरी  ल्ल मीठ चवीनुसार  ल्ल २ चमचे तेल.

ग्रीन मसाला : १ जुडी कोथिंबीर, ४-५ हिरवी मिरची,

३-४ पाकळ्या लसूण (बारीक चिरलेला), मीठ चवीनुसार.

कृती :  एका फ्राय पॅनमध्ये तेल टाकून त्यावर मशरूम, काळीमिरी व मीठ टाकून हाय गॅसवर परतवून घ्यावे, त्यामुळे हे मिश्रण थोडेसे ड्राय होईल. मिक्सरमधून कोथिंबीर, मिरची, लसूण व मीठ टाकून पेस्ट करून घ्यावी.

चिकन कोस्टला आडवी चीर मारावी. त्यात मशरूमचे मिश्रण भरावे. व हिरवा मसाला चिकनला वर लावावा. थोडय़ाशा तेल लावलेल्या बटर पेपरमध्ये गुंडाळून काचेच्या पसरट भांडय़ात मायक्रो हायवर १०-१२ मिनिटे ठेवावे. गरम गरम सव्‍‌र्ह करावे.
विवेक ताम्हाणे
response.lokprabha@expressindia.com