१ जुडी पालक (साफ केलेली पाने)
२ चमचे दही
अर्धा चमचा हळद पावडर
१ चमचा लाल तिखट
१/४ चमचा हिंग
५-६ पाकळ्या लसूण (बारीक चिरलेला)
१ चमचा जिरे
१-२ चमचे तेल
मीठ चवीनुसार.
रोलसाठी साहित्य :
१ वाटी तांदळाचे पीठ
१ चमचा तेल
कृती :
एका भांडय़ात दही, हळद, तिखट, हिंग, लसूण, जिरे टाकून मिक्स करावे. २ चमचे तेल गरम करून त्यावर टाकावे. व सर्व मिक्स करावे. त्यात साफ केलेली पालकची पाने टाकून मिक्स करावे. मीठ चवीनुसार टाकावे.
दुसऱ्या भांडय़ात तांदळाचे पीठ, मीठ, तेल व थोडेसे गरम पाणी टाकून कणकेसारखे पीठ मळावे. छोटे गोळे करून गोलसर लाटून घ्यावे. त्यात मिक्स केलेले पालकचे मिश्रण भरून रोल करावेत. हे रोल बटर पेपरमध्ये गुंडाळून मायक्रो हाय- मीडियमवर ३-४ मिनिटे ठेवावे. मायक्रोमध्ये पसरट काचेचे भांडे वापरावे. गरम गरम कुठल्याही स्वीट चटणीबरोबर सव्र्ह करावेत.
साहित्य :
१० ब्रेड स्लाइस
५० ग्रॅम चीज
३-४ हिरवी मिरची
४-५ पाकळ्या लसूण बारीक चिरलेला
५० ग्रॅम बटर
अर्धी जुडी कोथिंबीर (बारीक चिरलेली)
मीठ चवीनुसार.
कृती :
एका भांडय़ात चीज, बटर, चिरलेली हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर मीठ टाकून नीट मिक्स करून ब्रेड स्लाइसवर स्पेड करून घ्यावे. पसरट काचेच्या भांडय़ात हे टोस्ट ठेवून मायक्रो मीडियमवर ८ मिनिटे ठेवावे. ब्रेड स्लाइस नरम वाटल्यास मायक्रो मीडियमवर अजून २-३ मिनिटे ठेवावे. ब्रेड स्लाइसचे त्रिकोणी काप करून गरम सव्र्ह करावेत.
साहित्य :
८-१० भावनगरी मिरची
१/२ वाटी पनीर (किसलेले)
३-४ उकडलेले बटाटे
१ चमचा तिखट
अर्धी वाटी काजू- किसमिस, बेदाणे
२ चमचे तेल
मीठ चवीनुसार.
कृती :
भावनगरी मिरचीला उभे कापून आतल्या बिया काढाव्यात. एका भांडय़ात पनीर, बटाटे, तिखट, काजू- बेदाणे, मीठ टाकून एकजीव करून घ्यावे. हे मिश्रण मिरचीमध्ये भरून थोडेसे तेल लावून काचेच्या पसरट भांडय़ात ठेवून मायक्रो हायवर ३ मिनिटे ठेवावे. परत थोडेसे तेल लावून मायक्रो हाय वर ३ मिनिटे ठेवावे. गरम सव्र्ह करावे.
साहित्य :
१ वाटी दालिया (भिजलेले १ दिवस अगोदर)
१ वाटी दूध ल्ल अर्धी वाटी ओल्या नारळाचे खोबरे
अर्धा चमचा जायफळ
१/४ वाटी गूळ
कृती :
एका भांडय़ात दूध, खोबरे जायफळ व गूळ टाकून मायक्रो मीडियमवर २ मिनिटे ठेवावे. नंतर त्यात दालिया टाकून नीट मिसळून घ्यावे. व मायक्रो लोवर ८-१० मिनटे ठेवावे. दालिया कडक वाटल्यास अजून ४-५ मिनिटे ठेवावे.
भिजवलेल्या दालिया २-३ वेळा पाण्यातून धुऊन घ्याव्यात. म्हणजे याचा वास निघून जाईल.
साहित्य : ४ चिकन कोस्ट (धुऊन साफ केलेले)
२ वाटी मशरूम (बारीक चिरलेले)
१ चमचा काळी मिरी ल्ल मीठ चवीनुसार ल्ल २ चमचे तेल.
ग्रीन मसाला : १ जुडी कोथिंबीर, ४-५ हिरवी मिरची,
३-४ पाकळ्या लसूण (बारीक चिरलेला), मीठ चवीनुसार.
कृती : एका फ्राय पॅनमध्ये तेल टाकून त्यावर मशरूम, काळीमिरी व मीठ टाकून हाय गॅसवर परतवून घ्यावे, त्यामुळे हे मिश्रण थोडेसे ड्राय होईल. मिक्सरमधून कोथिंबीर, मिरची, लसूण व मीठ टाकून पेस्ट करून घ्यावी.
चिकन कोस्टला आडवी चीर मारावी. त्यात मशरूमचे मिश्रण भरावे. व हिरवा मसाला चिकनला वर लावावा. थोडय़ाशा तेल लावलेल्या बटर पेपरमध्ये गुंडाळून काचेच्या पसरट भांडय़ात मायक्रो हायवर १०-१२ मिनिटे ठेवावे. गरम गरम सव्र्ह करावे.
विवेक ताम्हाणे
response.lokprabha@expressindia.com