साहित्य : १०० ग्रॅम साखर, १०० ग्रॅम बटर, ३ अंडी, २०० ग्रॅम मैदा, १०० ग्रॅम व्हाइट चॉकलेट, १०० ग्रॅम क्रीम चीज, १०० ग्रॅम स्ट्रॉबेरी जाम

कृती :
एका काचेच्या बाऊलमध्ये बटर, व्हाइट चॉकलेट मीडियमवर ४ ते ५ मिनिटे मेल्ट करून घ्यावे व नीट मिक्स करून बाजूला करून ठेवावे. एका भांडय़ात अंडी साखर फेटून घ्यावे. त्यात बटर चॉकलेटचे मिश्रण मिक्स करावे व मैदा टाकून हळुवार मिक्स करून घ्यावे.

हे सर्व मिश्रण एका पसरट मायक्रोच्या भांडय़ात टाकावे त्यावरून क्रीम चीज थोडे थोडे ब्राऊनीवर टाकावे व स्ट्रॉबेरी जामचे ड्रॉप ब्राऊनीवर टाकावे. कन्व्हेक्शन मायक्रोमध्ये मीडियम २० ते २५ मिनिटे बेक करून घ्यावी. थंड झाल्यावर छोटे तुकडे करून सव्‍‌र्ह करावे.

चीज आणि पाप्रिका ब्रेड

साहित्य : ५०० ग्रॅम मैदा, २० ग्रॅम मीठ, २० गॅ्रम ईस्ट, २० गॅ्रम साखर, ३०० मिली पाणी, १०० ग्रॅम बटर, १०० गॅ्रम चीज, दोन चमचे चिली फ्लेक्स.

कृती : एका भांडय़ात पाणी, मीठ, साखर टाकून चांगले एकत्र करून घ्यावे. त्यात मैदा टाकून पीठ नीट मळून घ्यावे. तसेच चिली फ्लेक्स व चीज टाकून परत मळून घ्यावे.

१५ ते २० मिनिटांनी डोहचे १०० ग्रॅमप्रमाणे रोल करावे व बेकिंग ट्रेमध्ये टाकून साधारणत: ३५ ते ४५ मिनिटे ठेवावे. डोहची साइज डबल झाल्यावर मायक्रो कव्हेक्शन हायवर २० ते २५ मिनिटे ठेवून बेकिंग करावे. गोल्डन ब्राऊन कलर आल्यावर त्यावर चीज पाप्रिका टाकून मायक्रो कव्हेक्शन मीडियमवर दोन मिनिटे ठेवावे. या डोह चे छोटे रोल वापरू ब्रेड किंवा मोठा सॅण्डवीच ब्रेड करता येतो.

ड्रायफ्रुट आणि मिल्क ब्रेड

साहित्य : ५०० ग्रॅम मैदा, २०० मि. ली. मिल्क, १०० ग्रॅम साखर, १०० ग्रॅम बटर, ३ अंडी, १० ग्रॅम मीठ, २० ग्रॅम ईस्ट, १०० ग्रॅम ड्रायफ्रुट.

कृती :

एका भांडय़ात मिल्क, साखर, बटर, अंडी, मीठ, ईस्ट टाकून नीट मिक्स करावे. त्यात मैदा टाकून पाणी मळून घ्यावे. नंतर त्यामध्ये सर्व ड्रायफुट्र मिक्स करावे. ओल्या फडक्याने पिठाला झाकून ठेवावे. डोहची साइज डबल झाल्यानंतर एका ब्रेड मोल्डमध्ये टाकून २० ते २५ मिनिटे ठेवावे. मायक्रो कन्व्हेक्शला प्री-हीट करून मीडियम वर २५ ते ३० मिनिटे बेक करावे.

होलव्हीट मॅन्गो ब्राऊनी

साहित्य : गव्हाचे पीठ २०० ग्रॅम, १०० ग्रॅम साखर, १०० ग्रॅम बटर, १०० ग्रॅम व्हाइट चॉकलेट, ३ अंडी, १ वाटी मॅन्गो पल्प

कृती :
एका काचेच्या बाऊलमध्ये बटर चॉकलेट मायक्रो मीडियम ४ ते ५ मिनिटे ठेवून मेल्ट करून घ्यावे व नीट मिक्स  करून बाजूला करून ठेवावे. एका भांडय़ात साखर, अंडी फेटून घ्यावे त्यात बटर चॉकलेट मिश्रण मिक्स करून घ्यावे व गव्हाचे पीठ टाकून हळूवार मिक्स करून घ्यावे व सर्वात शेवटी मॅन्गो पल्ब टाकून थोडेसे मिक्स करावे पण मॅन्गो पल्ब मिक्स होता कामा नये हे सर्व मिश्रण एका पसरट मायक्रोच्या भांडय़ात टाकून कन्व्हेक्शन मायक्रोच्या भांडय़ात टाकून २० ते २५ मिनिटे बेक करून घ्यावे.

टॉफी बनाना ब्राऊनी

साहित्य : १०० ग्रॅम मिल्क मेड, १०० ग्रॅम साखर, १०० ग्रॅम बटर, १०० ग्रॅम चॉकलेट, ३ अंडी, २०० ग्रॅम मैदा, २ ते ३ कुस्क रलेली केळी

कृती :
एका काचेच्या बाऊलमध्ये बटर चॉकलेट मायक्रो मीडियमवर ४ ते ५ मिनिटे ठेवून मेल्ट करून घ्यावे व नीट मिक्स करून बाजूला करून ठेवावे.

एका भांडय़ात अंडी, साखर फेटून घ्यावे. त्यात बटर चॉकलेटचे मिश्रण मिक्स करावे व मैदा टाकून हळूवार मिक्स करून घ्यावे.

एका काचेच्या बाऊलमध्ये मिल्कमेड व कुस्करलेले बनाना मायक्रो हायवर २ ते ३ मिनिटे ठेवावे. एका पसरट मायक्रोच्या भांडय़ात मिल्कमेड व बनानाचे मिश्रण नीट पसरून घ्यावे त्यावर तयार झालेले ब्राऊनीचे मिश्रण टाकावे. कन्व्हेक्शन मायक्रोमध्ये मीडियम २० ते २५ मिनिटे बेक करून घ्यावे. ब्राऊनी थोडीशी गरम असताना मोल्डमधून काढून घ्यावी. पिसेस करून गरम सव्‍‌र्ह करू शकता किंवा कुठल्याही आईस्क्रीम बरोबर सव्‍‌र्ह करू शकता.

चॉकलेट क्रम्बल ब्राऊनी

साहित्य : १०० ग्रॅम साखर, १०० ग्रॅम बटर, ३ अंडी, २०० ग्रॅम मैदा, १०० ग्रॅम डार्क चॉकलेट,

क्रमबलसाठी

१०० ग्रॅम बटर, १०० ग्रॅम साखर,  १०० ग्रॅम मैदा, ५० ग्रॅम काजूचे तुकडे, ५० ग्रॅम ओटस्.

कृती :
एका काचेच्या भांडय़ात बटर थोडेसे मेल्ट करून घ्यावे. त्यात साखर, मैदा, काजूचे तुकडे व ओटस् टाकून ब्रेड क्रम कन्सीसटन्सी होईपर्यंत मिक्स करावे.

एका काचेच्या बाऊलमध्ये बटर, डार्क चॉकलेट मीडियमवर ४ ते ५ मिनिटे ठेवून मेल्ट करून घ्यावे व नीट मिक्स करून बाजूला करून ठेवावे. एका भांडय़ात अंडी, साखर फेटून घ्यावे. त्यात बटर चॉकलेटचे मिश्रण मिक्स करावे व मैदा टाकून हळूवार मिक्स करून घ्यावे.

एका पसरट भांडय़ात मिश्रण नीट पसरून घ्यावे. त्यावर तयार झालेले क्रम्बलचे मिश्रण टाकावे. कन्व्हेक्शन मायक्रोमध्ये मीडियम २० ते २५ मिनिटे बेक करून घ्यावे. साधारणत: ब्राऊनी आइस्क्रीम सव्‍‌र्ह करतात.
विवेक ताम्हाणे – response.lokprabha@expressindia.com