साहित्य :
- अर्धी वाटी मैदा,
- अर्धी वाटी साखर,
- तीन अंडी,
- अर्धी वाटी बटर,
- एक वाटी बारीक केलेलं केळं,
- पाव वाटी अक्रोडाचे तुकडे,
- अर्धा चमचा जायफळ पावडर,
- तीन ते चार चमचे दूध.
कृती :
एका भांडय़ात बटर, साखर फेटून घ्यावे. त्यात अंडी व दूध टाकून परत फेटावे. त्यात मैदा हळुवार टाकून मिसळून घ्यावा. त्यात केळं, अक्रोड व जायफळ पावडर टाकून पीठ तयार करावं. हे पीठ एका काचेच्या बाउलमध्ये टाकून मायक्रो मीडिअमवर बारा ते पंधरा मिनिटे ठेवावे. कुठल्याही सॉसबरोबर किंवा आइसक्रीमबरोबर सव्र्ह करावे.
राजगिरा केक
साहित्य :
- एक वाटी राजगिरा पीठ,
- तीन ते चार चमचे तूप,
- अर्धी वाटी गूळ,
- दोन वाटय़ा क्रीम,
- अर्धा चमचा वेलची पावडर.
कृती :
एका भांडय़ात क्रीम, गूळ, वेलची पावडर मिसळून घ्यावे, त्यात राजगिऱ्याचे पीठ टाकावे. हे मिश्रण एका काचेच्या चौकोनी बाउलमध्ये केकसारखे थापावे. या मिश्रणाला कव्हर करून तीन ते चार तास तसेच ठेवावे.
त्यानंतर मायक्रो मीडिअममध्ये आठ ते दहा मिनिटे ठेवावे. थंड झाल्यावर त्याच्या वडय़ा करून खायला द्यावे. हा पदार्थ उपवासासाठीसुद्धा करू शकता.
फणस आणि बदाम खीर विथ शेवया
साहित्य :
- दोन वाटय़ा फणसाचे गरे (उभे कापलेले) कन्डेन्स मिल्क अर्धी वाटी,
- एक वाटी क्रीम, पाव वाटी बदामाचे तुकडे,
- अर्धा चमचा वेलची पावडर.
कृती :
एका काचेच्या बाउलमध्ये कन्डेन्स मिल्क, क्रीम, वेलची पावडर, बदामाचे तुकडे टाकून मायक्रो मीडिअमवर चार ते पाच मिनिटे ठेवावे. त्यानंतर त्यात फणसाचे उभे कापलेले गरे टाकून, मायक्रो हायवर दोन मिनिटे ठेवावे.
शेवया
साहित्य :
- ल्ल एक पॅकेट शेवया,
- ल्ल दोन चमचे साखर,
- ल्ल एक वाटी दूध,
कृती :
एका काचेच्या बाउलमध्ये शेवया, साखर, दूध टाकून मायक्रो मीडिअमवर चार ते पाच मिनिटे ठेवावे.
ही शेवयाची खीर पातळ असल्यास मायक्रो मीडिअमवर थोडे जास्त वेळ ठेवावे.
सव्र्ह करताना पसरट डिशमध्ये ही शेवयाची खीर थोडी टाकावी. व त्यावर फणस आणि बदामाची खीर टाकून गरम सव्र्ह करावी.
होल व्हिथ् करवंद क्रम्बल
साहित्य :
- दोन वाटय़ा करवंदं (बिया काढलेल्या),
- तीन चमचे साखर,
- एक चमचा मिक्स फ्रुट जॅम,
क्रम्बल मिक्स्चरसाठी :
- अर्धी वाटी गव्हाचे पीठ,
- पाव वाटी बारीक साखर,
- अर्धी वाटी बटर,
- अर्धा चमचा वेलची पावडर.
कृती :
साफ केलेली करवंदं, जॅम, साखर, थोडेसे पाणी टाकून गॅसवर पॅनमध्ये नीट मिसळून घ्यावे.
एका भांडय़ात गव्हाचे पीठ, साखर, बटर, इलायची पावडर क्रम्बल करून घ्यावे. ते ब्रेड क्रम्बलसारखे असावे. छोटय़ा काचेच्या बाउलमध्ये अध्र्यापर्यंत करवंदाचे तयार केलेले मिक्स्चर टाकावे व त्यावर ब्रेड क्रम्ससारखे तयार केलेले मिश्रण टाकावे. कन्व्हेंशन मायक्रोमध्ये पाच/सहा मिनिटे लोवरती ठेवावे. कुठल्याही आइसक्रीमबरोबर सव्र्ह करावे.
विवेक ताम्हाणे – response.lokprabha@expressindia.com