राजमा हा तेलबियांचा प्रसिद्ध प्रकार आहे. खरं तर आपण ‘राजमा चावल’ आवडीने पूर्वापार खात असलो तरी राजमा भारतामधले पीक नाही. आपल्याप्रमाणेच मेक्सिकन खाण्यामध्येही राजमाला भरपूर महत्त्व आहे. राजमामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन असते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी राजमा खूप चांगला ठरतो असं म्हटलं जातं. तो रक्तातील शर्करेचं प्रमाण वाढू देत नाही. राजम्यामध्ये खूप प्रमाणात फायबर आढळते, म्हणून राजमामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. आज आपण काही राजम्याच्या रेसिपी पाहू या.
राजमा कटलेट
साहित्य :
एक कप उकडलेला राजमा, दोन मध्यम आकारचे उकडलेले बटाटे, दोन मिरच्या कुटून, चवीप्रमाणे मीठ, एक टीस्पून गरम मसाला पावडर, एक टे स्पून आलं- किसलेलं, अर्धा टी स्पून हळद पावडर.
कृती :
राजमा आणि बटाटा कुस्करून घ्या. त्यात सर्व मसाले घालून त्याची टिक्की तयार करा. टिक्की दोन प्रकारांनी तळा. डीप फ्राय करा किंवा शॅलो फ्राय करा.
टीप :
- राजमा आणि बटाटा एकत्र केल्यावर गोळा सैल वाटत असेल तर अर्धा चमचा मैदा घालून गोळा घट्ट करा.
- डीप फ्राय किंवा श्ॉलो फ्राय करताना रवा किंवा भाजलेले पोह्य़ाचे पीठ घातले तर कटलेटची चव आणखी छान होईल.
चिझी पोटॅटो बास्केट
साहित्य :
राजमा फीलिंगकरिता :
अर्धा कप उकडलेला राजमा कुस्करून घ्या, तीन-चार टे स्पून टोमॅटो केचअप, अर्धा टी स्पून चिली सॉस, मीठ चवीनुसार, मिरीपूडही चवीनुसार.
बास्केटकरिता :
बटाटे तीन मध्यम आकाराचे घ्या. पाण्यात अर्धवट उकडून घ्या. बटाटा मधून स्कूप करुन घ्या., अर्धा कप किसलेले चीझ.
कृती :
राजमा फीलिंगचं सर्व साहित्य एकत्र करून घ्या. सर्व राजमा बटाटय़ामध्ये भरा. आणि वरून चीझ टाकून ओव्हनमध्ये २०० सेल्सिअसवर दहा मिनिटं बेक करा. गरम गरम सव्र्ह करा.
मेक्सिकन राइस
साहित्य :
दोन कप शिजवलेला भात ल्ल एक कांदा चिरलेला, एक टी स्पून लाल मिरची पावडर, एक कप उकडलेल्या भाज्या (फरसबी, गाजर, बटाटा, फ्लॉवर), अर्धा कप उकडलेला राजमा, चवीप्रमाणे मीठ., एक टे. स्पून ठेचलेली लसूण, एक टे. स्पून ठेचलेलं आलं.
कृती :
एका कढईमध्ये दोन टे स्पून तेल टाकून कांदा परतून घ्या. नंतर त्यात लसूण आणि आलं घालून चांगलं परता. त्यात सर्व भाज्या व राजमा घालून परता. त्यात मीठ व तिखट पावडर घालून आणि उकडलेला भात घालून छान परतून गरम गरम वाढा.
चीज, राजमा व काबुली चणे सलाड
साहित्य :
एक कप उकडलेला राजमा, अर्धा कप उकडलेले काबुली चणे, दोन-तीन चीज क्यूब ल्ल अर्धा कप चिरलेला पातीचा कांदा, अर्धा कप टोमॅटो मोठे चिरलेले तुकडे.
ड्रेसिंगसाठी :
दोन टे स्पून ऑलिव्ह ऑइल ल्ल अर्धा टी स्पून ऑरेगानो, एक टी स्पून ठेचलेली लसूण ल्ल एक टी स्पून लिंबाचा रस, मीठ चवीप्रमाणे.
कृती :
वरील सर्व गोष्टी एकत्र करून फ्रिजमध्ये गार करायला एका तासासाठी ठेवा. सव्र्ह करायच्या अगोदर ड्रेसिंग ओतून एकत्र करून घ्या.
सीमा नाईक – response.lokprabha@expressindia.com