कॉन्टिनेन्टल या शब्दाचा संबंध मूलत: युरोप खंडाशी आहे. कॉन्टिनेन्टल फूड म्हणजे युरोप खंडात बनवले जाणारे खाद्यपदार्थ. ज्यात ओलिव्ह ऑइल, लसूण आणि काही विशिष्ट हब्र्ज चवीकरिता वापरले जातात. फ्रान्स, इटली आणि स्पेन आदी युरोपातील देशात ओलिव्ह ऑइल, लसूण आणि रोझमेरीसारख्या काही हब्र्जबरोबर काही वेळेस वाईन पण या कॉन्टिनेन्टल अन्नपदार्थात घालण्याची पद्धत आहे. तर कधी कधी यात रेड वाईनप्रमाणेच टोमॅटोही वापरतात.
चिझस्टिक
* १ कप मदा
* ६ चमचे मीठ नसलेले किसलेले बटर
* १ कप किसलेले चेड्डर चिझ
* १ कप किसलेले पाम्रेसन चिझ
* १/४ कप बर्फाचे पाणी
* खडे मीठ.
कृती :
२२५ डिग्री से. वर ओव्हन गरम करून घ्या. ओव्हन ट्रेला बटर लावून घ्या. एका बाऊलमध्ये किसलेलं बटर, मदा आणि चिझ घ्या. हातांनीच एकजीव होईपर्यंत एकत्र करा. बर्फाचे पाणी घालून कणकेचा गोळा बनवतो तसा गोळा बनवा. त्याचे गोळे बनवून ते आयताकृती लाटावे. (९ ते १२ इंच लांबीचे) आणि उभ्या पट्टय़ांत कापावे. ह्या पट्टय़ा उचलून ट्रेमध्ये ठेवा आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बेक करा.
बर्मीज वडा
साहित्य :
* एक कांदा
* एक गाजर
* लसूण मिरची पेस्ट
* मीठ
* चिमूटभर बेकिंग पावडर.
कृती :
बटाटे, कांदा आणि गाजर किसून घ्यावी. त्यात मीठ, मिरची लसूण पावडर घालावी. बेकिंग पावडर घालून एकत्र करावे. मिक्स करताना हळूहळू अंदाजाने मदा घालावा. गोळे करून तेलात तळून घ्यावे. हे वडे मन्च्युरीयन किंवा चिली आणि टोमॅटो सॉसबरोबर छान लागतात.
मेयोनिज
* ४ अंडय़ांचा बलक
* २ टेस्पून पाणी
* १ टेस्पून व्हाइट व्हिनेगर
* दीड कप व्हेजिटेबल ऑइल (किंवा व्हेजिटेबल ऑइल आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र करून वापरावे)
* चिमूटभर पांढरी मिरी पावडर.
कृती :
एका बाऊलमध्ये अंडय़ाचा बलक, पाणी आणि व्हिनेगर एकत्र करून ब्लेंडरने एकजीव होईपर्यंत घुसळावे. हे घुसळत असताना बाजूने हळूहळू तेल सोडत रहावे. हे सर्व मिश्रण डबल बॉयलर पद्धतीने घट्ट होईपर्यंत गरम करावे. त्यात व्हाइट मिरी पावडर घालावी. हे मिश्रण पाच दिवसांपर्यंत फ्रिजमध्ये टिकू शकते.
चिझ स्टफ्ड हैलोपिनोज
* २०० ग्रॅम चिझ (उभे चिरलेले)
* १५ जाडय़ा हिरव्या मिरच्या (उभे भाग केलेल्या आणि बिया काढलेल्या)
* १/४ कप ब्रेडचा चुरा
* १/४ कप कुस्करलेली सोयाबीन.
कृती :
चिझचे उभे चिरलेले तुकडे उभ्या चिरलेल्या मिरचीवर ठेवा. त्यावर ब्रेडचा चुरा भुरभुरवा आणि सोयाबीन कुस्करून ठेवा. ही स्टफ्ड मिरची चिझ वितळेपर्यंत नॉनस्टिक पनमध्ये ४ ते ६ मिनिटे शिजू द्या. वर हब्र्ज घालून गरमागरम सव्र्ह करा.
सीमा नाईक –