साहित्य –
तीन ते चार कडक पाव किंवा ब्रुन पाव, १० ते १५ पाकळ्या लसूण (बारीक तुकडे करून) १०० ग्रॅम बटर, अर्धी वाटी कोथिंबीर चिरलेली, तीन ते चार हिरव्या मिरच्या (बारीक तुकडे करून)
कृती –
बटरला थोडेसे सॉफ्ट करून त्यात लसूण कोथिंबीर, हिरवी मिरची एकत्र करून घ्यावे. हे मिश्रण फ्रिजमध्ये देखील चांगले राहते. कडक पावाला आडवे कापून त्यावर हे मिश्रण पसरवावे. मायक्रो हायवर दोन मिनिटे ठेवून कडक पावाला थोडेसे टोस्ट करून घ्यावे. या मिश्रणात आवडत असल्यास चीजसुद्धा वापरू शकता.
पोटॅटो क्रिस्पी ब्रेड
साहित्य –
५०० ग्रॅम मैदा, १० ग्रॅम इस्ट, ३०० मिलि पाणी, १०० ग्रॅम बटर, १५० गॅ्रम मॅश केलेला बटाटा, १० ग्रॅम साखर.
कृती –
एका भांडय़ात पाणी, इस्ट, साखर टाकून चांगले एकत्र करावे. थोडय़ा वेळाने त्यात मैदा टाकून पीठ नीट मळून घ्यावे. त्यात मॅश केलेला बटाटा व बटर टाकून हलक्या हाताने मॉलिश करून गुळगुळीत गोळा तयार होईल. ओल्या फडक्याने त्याला झाकून ठेवावे. १५ ते २० मिनिटांने त्या डोहचा आकार दुप्पट होईल. तेव्हा हळू मॉलिश करून त्याचे १०० ग्रॅमप्रमाणे रोल करावेत व बेकिंग ट्रेमध्ये साधारणत: ३५ ते ४५ मिनिटे ठेवावे.
मायक्रो कन्व्हेक्शन हायवर २० मिनिटे ठेवावे. साधारणत: गोल्डन ब्राऊन कलर आल्यावर त्यावर थोडेसे बटर लावावे. त्यामुळे ब्रेड सरफेसला शाइन येऊन वरची स्किन सॉफ्ट राहते.
शिरमाल
साहित्य –
५०० ग्रॅम मैदा, २० ग्रॅम इस्ट, तीन अंडी, दोन वाटी मिल्क, १०० ग्रॅम खोया, ल्ल १०० ग्रॅम क्रिम, एक चमचा रोझ वॉटर, एक चमचा केवडा वॉटर, २०० गॅ्रम बटर, ५० गॅ्रम किशमिश
कृती –
एका भांडय़ात मिल्क, अंडी, खोया, क्रिम, इस्ट, रोझ वॉटर, केवडा वॉटर, मैदा, किशमिश सर्व एकत्र करून मैदा टाकून पीठ मळून घ्यावे. या पिठाचे छोटे छोटे गोळे करून २० मिनिटे बाजूला ठेवून द्यावे. या गोळ्यांचा आकार दुप्पट झाल्यावर बेकिंग ट्रेमध्ये ठेवून त्यावर मेल्ट बटर लावून मायक्रो मीडियमवर ८ ते १० मिनिटे ठेवावे. बाहेर काढल्यावर पुन्हा मेल्ट बटरने ब्रश करावे. इथे बटरच्या ऐवजी तुम्ही मिल्कसुद्धा वापरू शकता.
कोकोनट अॅण्ड मिल्क चॉकलेट ब्राऊनी
साहित्य –
२०० ग्रॅम मैदा, १०० ग्रॅम बटर, १०० ग्रॅम साखर, तीन अंडी, एक वाटी ओले खोबरे, १०० गॅ्रम मिल्क चॉकलेट, एक शहाळातील ताजे खोबरे (बारीक तुकडे करून), अर्धा चमचा जायफळ पावडर
कृती –
एका काचेच्या बाऊलमध्ये बटर, चॉकलेट मायक्रो मीडियमवर ४ ते ५ मिनिटे ठेवून मेल्ट करून घ्यावे व नीट मिक्स करून बाजूला ठेवावे. एका भांडय़ात साखर अंडी फेटून घ्यावी. त्यात बटर चॉकलेट मिश्रण मिक्स करून घ्यावे. मैदा टाकून हळूवार मिक्स करावे व सर्वात शेवटी शहाळ्यातील खोबऱ्याचे तुकडे मिक्स करावे व हे मिश्रण परत मायक्रोच्या भांडय़ात टाकावे. त्यावर खवलेले ओले खोबरे नीट पसरून कन्व्हेक्शन मायक्रोमध्ये मीडियमवर २० ते २५ मिनिटे बेक करावे. बेक होताना साधारण पंधरा मिनिटाने ब्राऊनीचा ट्रे बाहेर काढून त्यावर जायफळ पावडर भुरभुरावी व परत बेकिंगसाठी मायक्रोमध्ये ठेवावे.
कोकोनट मायक्रुन
साहित्य –
१०० गॅ्रम कोकोनट पावडर, १०० गॅ्रम ग्रीन शुगर, १०० गॅ्रम बटर, १०० मिली. अंडय़ाचा पांढरा भाग.
कृती –
एका भांडय़ात हे सर्व मिक्स करून १० ते १५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवावे. २५ ते ३० गॅ्रमचे छोटे गोळे करून बेकिंग ट्रेवर ठेवावे. थोडेसे प्रेस करून पसरट करावे. त्यानंतर कन्व्हेक्शन मायक्रो हायवर १० ते १२ मिनिटे ठेवून बेक करावे.
ओट्स अॅण्ड रेझिंग कुकीज
साहित्य –
१०० ग्रॅम बटर, १०० गॅ्रम साखर, अर्धी वाटी मिल्क, पाच ग्रॅम बेकिंग पावडर, ५० ग्रॅम ओट्स, ५० ग्रॅम रेझिंग, २०० ग्रॅम मैदा.
कृती –
एका भांडय़ात बटर साखर फेटून घ्यावी. त्यात हळू हळू मिल्क टाकून परत फेटत राहावे. या मिश्रणात मैदा बेकिंग पावडर रेझिंग टाकून हळूवार मिक्स करून सॉफ्ट गोळा बनवावा.
या डोहला २० ते २५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवावे. २५ ते ३० गॅ्रम छोटे छोटे गोळे करून बेकिंग ट्रेवर ठेवावे. थोडेसे प्रेस करून पसरट करावे. त्यानंतर कन्व्हेक्शन मायक्रो हायवर १० ते १२ मिनिटे बेक करावे.
विवेक ताम्हाणे – response.lokprabha@expressindia.com