साहित्य :
१०० ग्रॅम बटर, २५ ग्रॅम साखर, ५ ग्रॅम बेकिंग पावडर, २० ग्रॅम मैदा, अर्धी वाटी मिल्क, १ टी स्पून चिली फ्लेक्स, अर्धी वाटी काजूचे बारीक तुकडे.
कृती :
एका भांडय़ात बटर व साखर फेटून घ्यावी व त्यात हळू मिल्क टाकून परत फेटावे या मिश्रणात मैदा बेकिंग पावडर, १ टी स्पून चिली फ्लेक्स करून सॉफ्ट डोह बनवावा. या डोहला २० ते २५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवावा. २५ ते ३० ग्रॅम छोटे गोळे करून बेकिंग ट्रेवर ठेवावे व काजूचे बारीक तुकडे प्रेस करून पसरट करावे. त्यानंतर कन्व्हेक्शन मायक्रो हायवर १० ते १२ मिनिटे ठेवून बेक करावे.
चोकोचिप्स अॅण्ड क्रंची ब्राऊनी
साहित्य :
१०० ग्रॅम मिल्क चॉकलेट, ५० ग्रॅम चोकोचिप्स, ५० ग्रॅम कॉर्नर फ्लेक्स, १०० ग्रॅम बटर, ३ अंडी, २०० ग्रॅम मैदा, १०० ग्रॅम साखर.
कृती :
एका काचेच्या बाऊलमध्ये बटर, मिल्क चॉकलेट, मीडियम ४ ते ५ मिनिटे ठेवून मेल्ट करून घ्यावे व नीट मिक्स करून बाजूला करून ठेवावे. एका भांडय़ात अंडी साखर फेटून घ्यावे. त्यात बटर, चॉकलेट, मिश्रण मिक्स करावे व मैदा टाकून हळूवार मिक्स करून घ्यावे. त्यात चोकोचिप्स व कॉर्नरप्लेक्स मिक्स करावे. हे सर्व मिश्रण एका पसरट मायक्रोच्या भांडय़ात नीट पसरून घ्यावे. कन्व्हेक्शन मायक्रोमध्ये २० ते २५ मिनिटे बेक करून घ्यावे. थंड झाल्यावर आइस्क्रीमबरोबर सव्र्ह करावे.
बदाम व मनुका केक
साहित्य :
१०० ग्रॅम बटर, १०० ग्रॅम साखर, १०० ग्रॅम मैदा, २ अंडी, १/२ वाटी बदामाचे तुकडे, १/२ वाटी मनुका, १ चमचा वेनिला इसेन्स
कृती :
एका भांडय़ात बटर, साखर फेटून घ्यावे. त्यात हळूहळू अंडी टाकून फेटून घ्यावे. या मिश्रणात मैदा मिक्स करून घ्यावा. त्यात बदामाचे तुकडे, मनुका व वेनिला इसेन्स टाकून छोटय़ा मायक्रो केकच्या भांडय़ात टाकून मायक्रो कन्व्हेक्शनमध्ये ३५ ते ४० मिनिटे मायक्रो मीडियमवर बेक करावा.
बनाना-जायफळ केक
साहित्य :
१०० ग्रॅम बटर, १०० ग्रॅम साखर, १०० ग्रॅम मैदा, ३ अंडी, १/२ वाटी क्रीम, १० केळी (मिक्सरमधून पेस्ट केलेली), १/२ चमचा जायफळ पावडर
कृती :
एका भांडय़ात बटर, साखर, फेटून, हळूहळू अंडी टाकून फेटून द्यावे. या मिश्रणात मैदा मिक्स करून द्यावा. त्यानंतर केळ्याचा पल्प जायफळ पावडर व क्रीम टाकून हे मिक्स करून घ्यावे. हे मिश्रण छोटय़ा मायक्रो केकच्या भांडय़ात टाकून मायक्रो कन्व्हेक्शनमध्ये ४० ते ४५ मिनिटे मायक्रो लोवर ठेवून बेक करावे.
जिरा बटर कुकीज
साहित्य :
१०० ग्रॅम बटर, २ चमचे रोस्टेड जिरा, अर्धी वाटी दूध, २२५ ग्रॅम मैदा, ३ ग्रॅम बेकिंग पावडर
कृती :
एका भांडय़ात बटर फेटून घ्यावे. त्यात हळूहळू मिल्क टाकून परत फेटून घ्यावे. त्यात जीरा व मैदा टाकून हळूवारपणे मिक्स करून २० ते २५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवावे. बाहेर काढून या लाटणाने रोल करून घ्यावे. साधारणत १ ते दीड सें. मी. जाड असावे. राऊन्ड कुकी कटरने किंवा आपल्या आवडीच्या कुकी कटरने कट करून बेकिंग ट्रेमध्ये ठेवावे. कन्व्हेक्शन मायक्रोमध्ये हायवर १० ते १५ मिनिटे बेक करावे.
विवेक ताम्हाणे – response.lokprabha@expressindia.com