lp46व्हेज पनीर कबाब

१५० ग्रॅम पनीर, २-३ ढोबळी मिरची, अर्धा फ्लॉवर, ३-४ टॉमेटो, २ मोठे कांदे.

मसाल्यासाठी- अर्धी वाटी दही, १ चमचा काश्मिरी मिरची पावडर, अर्धा चमचा मोहरी पावडर, अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा मीठ.

एका बाऊलमध्ये दही, मिरची पावडर, मोहरी पावडर, धणे पावडर, जिरेपूड व मीठ एकत्र करून मॅरीनेशन तयार करावे. पनीर, डोबरी मिरची, फ्लॉवर, टॉमेटो व कांद्याचे मोठे तुकडे करून मॅरीनेशनमध्ये एकत्रित करून १ ते दीड तास ठेवावे. नंतर हेच तुकडे टुथपीकमध्ये एक-एक टाकून पसरट भांडय़ात (काचेच्या) मायक्रो मिडीयमवर ३-४ मिनिटे ठेवून शिजवावे. गरम सव्‍‌र्ह करावे.

lp48साखरभात

१ कप तांदूळ (बासमती), १ कप नारळाचा चव, अर्धी वाटी नारळाचे दूध, अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी बेदाणे, अर्धी वाटी काजू, १ चमचा वेलची पावडर, १ वाटी साखर.

१ कप तांदूळ जरा जास्त पाण्यात गॅसवर शिजवून घ्यावे. तांदूळ शिजला की सर्व पाणी निथळून टाकावे व त्यावर थंड पाणी टाकावे. त्यामुळे सर्व तांदूळ मोकळा होईल.

काचेच्या बाऊलमध्ये साखर, नारळाचा चव, नारळाचे दूध व साधे दूध मायक्रो हायवर २ मिनिटे ठेवावे. नंतर त्यात शिजलेला तांदूळ, बेदाणे, वेलची पावडर टाकून मायक्रो लोवर ४-५ मिनिटे ठेवावे. गरम गरम सव्‍‌र्ह करावे.

lp47भरलेल्या मिरच्या

१० मोठय़ा भावनगरी मिरच्या, पाव  किलो पनीर, अर्धा चमचा मोहरी पूड, अर्धा चमचा जिरे पूड, ३-४ हिरव्या तिखट मिरच्या, अर्धी जुडी चिरलेली कोिथबीर, अर्धा चमचा धणेपूड, मीठ चवीनुसार, २ चमचे लोणी, मिरच्या धुवून त्याला लांब चीर पाडावी व आतल्या बिया काढून सर्व साफ करून घ्यावे.

एका काचेच्या भांडय़ात लोणी व सर्व साहित्य पनीरवगळून मायक्रोमध्ये १ मिनिट हायवर ठेवावे. त्यात पनीर मिक्स करून नीट मळून घ्यावे. हे सारण चिरलेल्या मिरचीमध्ये भरून काचेच्या पसरट डिशमध्ये ठेवून मायक्रो हायवर ३-४ मिनिटे ठेवावे. गरमगरम सर्व करावे. हे अगोदर बनवून फ्रिजमध्ये ठेवू शकता. जेव्हा सव्‍‌र्ह करणार त्या अगोदर ५-१० मिनिटे बाहेर ठेवून मग मायक्रो करावे.

lp50पोटॅटो पालक सूप
अर्धी जुडी पालक, ३-४ बटाटे, २ टे. स्पून लोणी, २ वाटी क्रिम, २ वाटी पाणी, अर्धा चमचा मिरपूड, २-३ हिरवी मिरची, अर्धी चमचा मीठ.
बटाटे उकडवून शिजवून घ्यावेत. मिक्सरमधून काढून पेस्ट करून घ्यावी. पालक व हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावी. काचेच्या मोठय़ा बाऊलमध्ये लोणी, पालक, हिरवी मिरची, मिरपूड व मीठ टाकून १-२ मिनिटे मायक्रो हायवर ठेवावे.

पेस्ट केलेल्या बटाटय़ात क्रिम व पाणी टाकून नीट मिसळून घ्यावे. हे मिश्रण पालक हिरवी मिरच्या मिश्रणात टाकून नीट मिसळून हळुवारपणे एकत्रित करावे. ३-४ मिनिटे मायक्रो मिडीयमवर एक मिनिट ठेवावे. मध्ये मध्ये थोडेसे हलवत राहावे म्हणजे सर्व नीट गरम होऊन शिजून येईल. गरमगरम सव्‍‌र्ह करावे.

lp49जिरे अरनी भाजी

अर्धा किलो अरनी, २ चमचे लोणी, १ चमचा जिरेपुड, १ चमचा अख्खे जिरे, ३-४ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या), १/४ वाटी चिंचेचा कोळ, अर्धी जुडी कोंथिबीर (बारीक चिरलेली), मीठ चवीनुसार, अर्धा चमचा चाट मसाला.

अरनी साफ करून बटाटय़ाप्रमाणे उकडवून शिजवून घ्यावे. त्यावरील स्कीन साफ करून बारीक तुकडे करावेत. काचेच्या बाऊलमध्ये लोणी, जिरपुड, जिरे, हिरवी मिरची, चिंचेचा कोळ टाकून मायक्रो हायवर २-३ मिनिटे ठेवावे. त्यात तुकडे केलेल अरनी टाकून नीट हलवून घ्यावे. त्यामुळे हा सर्व मसाला त्या अरनीला लागेल. मायक्रो मिडीयमवर एक मिनिट ठेवावे. नंतर त्यावर चिरलेली कोिथबीर टाकून परत मायक्रो मिडीयमवर एक मिनिट ठेवावे. हे सर्व तयार झाल्यावर त्यावर चाट मसाला टाकून परत मिक्स करावे. या भाजीची चव वेगळीच आहे.
विवेक ताम्हाणे –

Story img Loader