आपण अननस आणि त्याचे वेगळेवेगळे पदार्थ यांची माहिती घेऊ या.

  • 55lp-foodअननसचा शोध युरोपनने १४९३ मध्ये लावला. १६ व्या शतकात पोर्तुगाल आणि स्पॅनिश लोकांनी अननस आशिया खंडामध्ये आणले.
  • अननसामध्ये खूप जास्त प्रमाणात विटामिन्स आणि मँगेनीज आहे, आणि काही प्रमाणात तांबे आणि बी वन व्हिटामिन आहे.
  • अननस खाल्ल्याने आपली त्वचा सुंदर होते. वजन कमी करण्यासाठीही ते महत्त्वाचे ठरते.  अननसचा रस आणि नारळचे तेल एकत्र करून ओठांवर लावले तर ओठांचा रुक्षपणा नाहीसा होतो. केस गळणे थांबते. दात व हिरडय़ा मजबूत होतात.
  • अननसाचे तुकडे व कोळंबीचे तुकडे एकत्र करून खाल्ले जातात. त्यात थोडे आले किसून घातले आणि ऑलिव्ह तेल, मीठ, मिरी पावडर घालून लेटय़ूसच्या पानावर सव्‍‌र्ह केले तर लाजवाब चव येते.
  • पपई, आंबा, किवी आणि अननसाचे सॅलड खूप चविष्ट लागते.

अननसचे आइस्क्रीम

साहित्य :

53lp-food१ कप दूध
१ कप कन्डेस्ड मिल्क
१ कप साय
२ चमचे अननसचा गर
१ टीस्पून जिलेटीन
एका अननसाचे काप

कृती :

प्रथम दूध व कॅन्डेंस मिल्क व साय एकत्र बीट करून घेणे, दोन टीस्पून  पाणी घेऊन २० सेकंद मायक्रोवेव्हमध्ये गरम करण्यास ठेवावे आणि त्यात जिलेटीन घालून ते मिश्रण एकत्र करावे. त्यानंतर त्यात अननसाचा गर व अध्रे अननसचे काप घालून मिश्रण एकत्र करावे.  हे मिश्रण प्लास्टिकच्या भांडय़ात ओतून चार ते पाच तास फ्रीझरमध्ये ठेवणे, परत हे मिश्रण बीट करावे आणि परत साताठ तासांसाठी फ्रीझरमध्ये ठेवावे आणि सव्‍‌र्ह करताना परत त्यावर अननसाचे काप घालून सव्‍‌र्ह करावे.

अननस प्लेजर मोक्टेल

57lp-foodसाहित्य :

२०० मिली अननसाचा ज्यूस
१ टीस्पून मध
१ टीस्पून साखर
६० मिली पाणी
४ ते ५ ताज्या अननसचे काप.

कृती :

हे सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. काचेच्या ग्लासमध्ये ओतून अननस लावून आपल्या आवडीप्रमाणे सजवावे, थंड झाल्यावर सव्‍‌र्ह करावे.

अननसचा शिरा

साहित्य :

54lp-food१ वाटी रवा
१-२ वाटी अननसचा गर
१/२ वाटी साजूक तूप
१ वाटी साखर
२-अडीच कप दूध
सजावटीसाठी सुका मेवा.

कृती :

एका मोठय़ा पातेल्यात तूप घालून रवा चांगला भाजा.  रवा भाजला की त्यात अननसाची पेस्ट टाका व रवा आणि पेस्ट एकजीव करा. नंतर गरम गरम दूध रव्यावर ओता.  रवा फुलाला की झाकण ठेवून एक वाफ द्यावी. मग साखर घालून चांगले हलवावे, परत झाकण ठेवून एक वाफ द्यावी, अननसाचा शिरा तयार.

टिप्स :

या पद्धतीने आंब्याचा शिरा, स्टॉबेरी गर घालून स्ट्रॉबेरीचा शिरा, व चॉकोलेट वितळवून चॉकोलेट शिरा पण तयार करता येतो.

कुठल्याही फळाचे इसेन्स घालून पाहिजे त्या फळाचा शिरा बनवू शकतो.

पाइनापल क्रंच

साहित्य :

56lp-food१ अननसचा टीन ल्ल    १ डायजेस्टिव्ह बिस्किटांचा पुडा
बटर
४-५ टेस्पून पिठीसाखर
व्हीप क्रीम सजावटीसाठी.

कृती :

बटर आणि पिठीसाखर एकत्र करून चांगली घोटून घ्या.  त्यात अननसाचे बारीक काप घालून एकत्र करा.  बिस्कीट अननसाच्या रसात बुडवून एका डिशमध्ये ठेवा, त्यावर बटर पिठीसाखरेचे मिश्रण लावून घ्या व टे फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवा. त्यावर अननसाच्या चकत्या ठेवा व व्हीप क्रीमने सजवा आणि गार करून सव्‍‌र्ह करा.
सीमा नाईक

Story img Loader