साहित्य :
बटर ५० ग्रॅम, बिस्कीटचा चुरा १०० ग्रॅम, क्रिम चीज १०० ग्रॅम, पनीर चक्का १०० ग्रॅम, साखर ७५ ग्रॅम, १ अंडे, २-३ चमचे लेमन ज्यूस, १० ते १५ फ्रेश स्ट्रॉबेरी (बारीक कापलेल्या).
कृती :
एका भांडय़ात बटर व बिस्किटाचा चुरा मिक्स करून घ्या. मायक्रोवेव्हेबल पल्प मोल्डमध्ये पसरवून व त्याला थापून बेस तयार करा. मायक्रो लोवर एक ते दोन मिनिटे ठेवून काढून घ्या. एका भांडय़ात क्रीम, चीज, चक्का, साखर, अंडे, लेमन ज्यूस मिसळून करून घ्या.
ते मिसळताना या मिश्रणात हवा जाणार नाही याची काळजी घ्या. म्हणजेच हे मिश्रण एका लाकडाच्या चमच्याने हळुवार एकत्र करावे. तयार केलेल्या पल्प मोल्डमध्ये स्ट्रॉबेरी पसरवून त्यावर चिजचे मिश्रण घालावे व मायक्रो मीडियमवर १८ ते २० मिनिटे ठेवावे.
बटरी प्रॉन्स सूप
साहित्य :
१० ते १५ कोलंबी, ५० ग्रॅम बटर, १/२ चमचा व्हाइट मिरीपावडर, ५ ते ६ कांडी कडीपत्ता, १/२ जुडी कोथिंबीर (बारीक चिरलेली), १/२ लिटर पाणी, १/२ वाटी क्रीम, मीठ चवीनुसार.
कृती :
कोलंबी पाण्यात धुऊन त्याची साले काढावीत व कोलंबीचे बारीक तुकडे करून घ्यावेत. एका मायक्रोव्हेबल भांडय़ात कोलंबीची साले मायक्रोमध्ये हायवर आठ मिनिटे ठेवावा. त्यावर बटर टाकून मायक्रो लोवर पाच मिनिटे ठेवावे. हे मिश्रण थंड झाल्यावर गाळून घ्यावे. त्यात व्हाइट मिरी पावडर कोलंबी, कडीपत्ता, कोथिंबीर, टाकून मायक्रो मीडियमवर पाच मिनिटे ठेवावे. त्यात पाणी, क्रीम व मीठ टाकून मायक्रो मीडियमवर तीन मिनिटे ठेवावे. गरम गरम सूप सव्र्ह करावे.
पीनट बटर कुकीज
साहित्य :
१२५ ग्रॅम बटर, २५० ग्रॅम बारीक साखर, १०० ग्रॅम भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कूट, ५० ग्रॅम गव्हाचे पीठ, १/२ चमचा मीठ, १/२ चमचा रेड चिली फ्लेक्स.
कृती :
एका भांडय़ात बटर व साखर फेटून घ्यावे. हळुवारपणे त्यात गव्हाचे पीठ, शेंगदाण्याचे कूट, मीठ व चिली फ्लेक्स टाकून थोडेसे मळून घ्यावे. १० ते १५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवावे. नंतर छोटे गोळे करून थोडे थापून पसरट मायक्रोव्हेबल भांडय़ात ठेवून मायक्रो हायवर दहा मिनिटे व मायक्रो मीडियमवर पाच-सहा मिनिटे ठेवावे.
फ्लॉवर वाटाणा पिझ्झा
साहित्य :
दीड किलो साधारणत: फ्लॉवर, १ वाटी हिरवे वाटाणे, २ ते ३ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेली), १/२ वाटी टोमॅटो (बारीक चिरलेला), १/२ वाटी कांदा बारीक चिरलेला, १०० ग्रॅम चेडार चीज, मीठ चवीनुसार, १ चमचा चिली फ्लेक्स, २ चमचे ऑलिव्ह तेल
कृती :
एका काचेच्या भांडय़ात हिरवे वाटाणे साफ करून मायक्रो मीडियमवर दोन मिनिटे ठेवून काढावेत. फ्लॉवरची पाने काढून मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी. त्यात थोडे पाणी व चिली फ्लेक्स व मीठ टाकून कणकेसारखे मळून घ्यावे. याचा पिझ्झा-बेस तयार करावा. त्यावर हिरवे वाटाणे, हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो व मीठ टाकून मायक्रो मीडियमवर तीन ते पाच मिनिटे ठेवावा. त्यावर चीज व ऑलिव्ह तेल टाकून मायक्रो हायवर तीन मिनिटे ठेवावे. थंड झाल्यावर काप करून सव्र्ह करावे.
बेक चिली टोमॅटो
साहित्य :
५ ते ६ टोमॅटो ल्ल २ कांदे, ३-४ पाकळ्या बेसील, ५० ग्रॅम चेडार चीज, १/२ चमचा काळीमिरी पावडर, २ चमचे ऑलिव्ह तेल, ३ ते ४ हिरवी मिरची (बारीक चिरलेली), मीठ चवीनुसार
कृती :
एका मायक्रोव्हेबल डिशमध्ये टोमॅटोचे काप करून सर्वत्र लावून घ्यावेत. त्यावर हिरवी मिरची, कांद्याच्या बारीक चकत्या, बेसीलची पाने काळीमिरी व मीठ टाकून मायक्रो हायवर दोन मिनिटे ठेवावे. नंतर त्यावर ऑलिव्ह तेल व चीज स्प्रेड करून मायक्रो मीडियमवर दोन मिनिटे ठेवावे. गरम गरम डिशसकट सव्र्ह करावे.
(समाप्त)
विवेक ताम्हाणे – response.lokprabha@expressindia.com