lp64आपला शेजारी श्रीलंका म्हणजे पाचूसारखा हिरवागार देश. निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक स्थळं, प्राणीजीवन असं पर्यटकाला लागतं ते सगळं भरभरून देणारा हा देश आवर्जून पहायलाच हवा.

आताची श्रीलंका ही रावणाची लंका म्हणून आपल्याला माहीत आहे. भारत, मालदीव्ह्ज या देशांशी सागरी सीमेने जोडलेले हे द्वीप राष्ट्र आकाराने मोत्यासारखे दिसते म्हणून त्याला हिंदी महासागरातील मोती म्हटले जाते. पण खरं तर तो आहे पाचू. नजर टाकावी तिथे धरणीने ल्यालेल्या हिरव्यागार शालूशिवाय नजरेला काहीच पडत नाही. अशा निसर्गरम्य देशाला भेट देण्याची संधी मिळाली. विषुवृत्तावर असलेल्या या देशात एप्रिल ते ऑगस्ट व ऑक्टोबर ते जानेवारी अशा दोन मोसमांत पाऊस पडतो. शिवाय वर्षभर अधूनमधून पावसाची हलकीशी हजेरी असतेच. कमाल तापमान २८ ते ३० अंश सेल्सियस तर किमान ९ ते १५ अंश सेल्सियस असे असते. कॅँडी, नुवा रेलीआ अशी थंड हवेची ठिकाणं, चहूकडून वेढलेला समुद्र त्यामुळे कोलंबोचा गॉल फेस, बेंतोटा, पासी कुडा, जाफना असे रम्य किनारे; चहा, नारळ, रबराच्या बागा आणि महत्त्वाचे म्हणजे इथे वर्षांतून तीन वेळा आंबे येतात असं आम्हाला सांगितलं गेलं. लिचीसारखे दिसणारे मोठे लाल व पिवळ्या रंगांचे रंबूतानचे रस्त्यारस्त्यावर दिसणारे ढिगारे. श्रीलंका बिबळ्यासाठीही प्रसिद्ध आहे. याला हे नॅशनल पार्क, दालचिनीची उपजतच पैदास आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ख्रिस्तपूर्व २०० वर्षांपासून स्थायिक झालेला बुद्ध धर्म. कॅँडी येथे दलाडा येथे बुद्धाचा दात ठेवलेले टूथ रेलीक टेंपल. हे सगळं बघण्यासाठी जगभरातून पर्यटकांचा ओघ सदैव चालूच असतो. तिथे सिंहली तामीळ, इंडियन तामीळ, मूर, मले आणि मूळचे रहिवासी असे वेगवेगळे लोक राहतात. बहुमिश्रित जनतेमुळे सण वेगवेगळे असतात. पण काही म्हणा, ती मंडळी सदा हसतमुख.

Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
gadhimai festival in nepal animal slaughtered
‘या’ उत्सवात दिला जातो हजारो जनावरांचा बळी; काय आहे गढीमाई उत्सव? याला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव का म्हटले जाते?
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड
Cotton is a key kharif crop in India, with Maharashtra producing 90 lakh bales
बांगलादेशातील अराजकता अन् कापूस उत्पादकांना लाभ
pune pustak Mahotsav marathi news
‘पुणे पुस्तक महोत्सव’ का गाजला?
Letter, Picture, other country Wandering , loksatta news,
चित्रास कारण की: विविधतेत एकटा

पाहा फोटो गॅलरी

ख्रिस्तपूर्वपासून असलेल्या श्रीलंकेत बऱ्याच राजवटी होऊन गेल्या. पूर्वी अनुराधपुरा येथे राजधानी होती. राजघराण्यातील हेवेदावे, असूया हा इतिहास इथेही होताच. राजा धतुसेन हा जनतमध्ये चांगल्या कार्यासाठी प्रिय होता. राजाच तो, त्याचेही अंत:पुर होतेच. त्याला एका बटीक दासीचा कश्यप व त्याच्या राणीचा मोगलाना असे दोन पुत्र होते. राज्यात सर्व सुबत्ता नांदत होती. मोठे झाल्यावर कश्यपने आपल्या वडिलांना धनसंपत्तीविषयी विचारले असता राज्यातील सुबत्ता हीच आपली संपत्ती असे सांगितले; पण त्याचा विश्वास बसेना. सत्तेचा लोभ ठेवून त्याने राजाला भिंतीत जिवंत गाडले. राजपुत्र मोगलाना पळून दक्षिण भारतात आला. कश्यपने कुणीही आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून सीरीगिया येथे २०० मी. उंच, भल्यामोठय़ा खडकावर आपला राजवाडा बांधला. त्याला ‘पॅलेस इन द एअर’ असे म्हटले जाते. अनुराधपुरा येथून राजधानी येथे हलवली. त्या खडकाच्या तळाला विस्तीर्ण बाग आहे. तेथे त्याने आपल्या अंत:पुराची व्यवस्था केली. मनोरंजनासाठी सभामंडप, स्विमिंग पूल सर्व काही होते. खडकावर पाण्याचा स्रोत नसल्याने तळालाच असलेल्या दोन मोठय़ा जलाशयातून गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने पाणी थेट माथ्यावर नेण्याची सोय केली आणि आश्चर्य म्हणजे अजूनही काही ठिकाणी ती यंत्रणा सुरळीत चालू आहे. अध्र्या वाटेपर्यंत मातीच्या पायऱ्या, लोखंडी जिना, लहान पाऊलवाटा असे चढून आपण लायन गेटपर्यंत येतो. पण इथून पुढे मात्र लोखंडी निमुळता जिना. तिथे पोहोचेपर्यंत दमछाक होते. पण वर ओपन पॅलेसमध्ये मात्र थंडगार वारा आणि चहूकडचं दृश्य आपले श्रम पळवून लावतं.

निळ्या समुद्राला चंदेरी वाळूची किनार असलेले बेंतोटा, पासी कुडा, जाफना व कोलंबोचा गॉल फेस हे किनारे स्वच्छ आणि रम्य आहेत. भरपूर मासळी असलेल्या या ठिकाणी एंजॉयमेंटसाठी कबानाज, श्ॉक्स आहेत, वॉटर स्पोर्ट्स आहेत. पण कुठेही गडबड-गोंधळ नाही. इतस्तत: पसरलेल्या पेपर प्लेट्स, बाटल्या वगैरे मुळीच दिसत नाही. पासी कुडा येथे हॉटेलच्या परिसरात वाळूत भेंडी, टोमॅटो, वांगी, मिरची, भुईमूग अशी लागवड केली आहे. शिवाय नारळाला कल्पवृक्ष का म्हटले जाते याचे कोकोनट फार्म येथील प्रात्यक्षिक पर्यटकांचे लक्ष वेधतातच. बेंतोटा येथील कासोगाड या ठिकाणी कासव संवर्धन केंद्रात अगदी कासवाच्या मादीने अंडं घातल्यापासून ते पिल्लं समुद्रात जाईपर्यंत कशी निगा राखली जाते ते पाहायला मिळते.

सरकारी केंद्रात कोळ्यांकडून कासवाची अंडी ९० ते १०० रुपयांना एक अशा दराने विकत घेतली जातात, असंही ऐकायला मिळालं. चोरून अंडी विक्री करणाऱ्यांना जबर दंड द्यावा लागतो. त्यामुळे थोडी जरब आहे, पण तस्करी तरीही होतेच. अंडी ४५ दिवस जमिनीत पुरून ठेवतात. १, २, ५ दिवसांची पिले वेगवेगळ्या हौदात ठेवतात. ती पिलं सारखी चळवळ करत असतात. त्यांच्यात वरवर चढण्याची स्पर्धा असते. ते दृश्य पाहण्यात नक्कीच मजा असते. त्यांना पाच दिवसांनंतर भक्षकांपासून दूर ठेवण्यासाठी रात्री समुद्रात सोडतात. पण lp65तिथेसुद्धा मासे असतातच. त्यामुळे काळजी घेऊनही ती जिवंत राहण्याचे प्रमाण शेकडा दोन-तीन एवढेच असते.

तिथल्या मादू रिव्हरमधून फेरफटका मारायची सोय आहे. या सहलीत आपण बऱ्याच वेळा खारफुटीच्या जंगलातूनच जातो, त्यामुळे डोक्याची काळजी म्हणून जरा वाकूनच बसावे लागते. पण एकदा का आत गेलो की त्या छायेत बाहेरची गर्मी मुळीच जाणवत नाही. चांगली चार-पाच फूट उंचीची मुळं म्हणजे जणू काही झाडाच्या फांद्याच. मादू रिव्हर समुद्राला मिळत असल्याने भरती-ओहोटीचा फायदा घेऊन बरीच फिश फाम्र्स आहेत. लहान मचव्यांना तीन ते चार किलोपर्यंत मासळी मिळते. कोलंबो येथून जाफनाला निघालेली आगगाडी डोक्यावरच्या ब्रिजवरून जात असते तेव्हा धडधडाट होऊन स्पीड बोटही डुलू लागते. इथे मात्र ब्रिज अगदी कमी उंचीचा असल्याने अगदी गुडघ्यात डोके खुपसून बसावे लागते.

बेंतोटा येथून निघून आम्ही जाफनाच्या वाटेला लागलो. यासाठी पूर्ण दिवस लागतो. जाफना हे श्रीलंकेतील कोलंबोखालोखाल मोठे शहर. १९८९ ते २०१० पर्यंत बहुचर्चित असलेले दहशतवादी केंद्र. तामिळ टायगर्सनी त्यांची स्वतंत्र भूमीच केली होती म्हणा ना. लंकेच्या रहिवाशांनादेखील तिथे जाण्यासाठी तिथल्या सरकारचा परवाना लागे.

एलिफंट पास अगदी १८ व्या शतकापासून, म्हणजे पोर्तुगीज, डच यांच्या वेळेपासून महत्त्वाचे ठिकाण. श्रीलंकेच्या कोणत्याही भागातून व्यापारासाठी जाफना किनारा परिसरात जाण्याचा महत्त्वाचा मार्ग. पोर्तुगीज काळापासून हा व्यापाराचा महामार्गच होता. त्यामुळे तामीळ वाघांबरोबरच्या लढाईत मोक्याचे ठिकाण. त्यांच्या प्रचंड रसदीमुळे लंकेच्या सैन्याची खूप हानी होती. आपला देश व बरोबरीचे सैनिक यांचे प्राण वाचवण्याच्या उद्देशाने जवान गमिनी कुलरत्ने याने स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता हातात ग्रेनेड घेऊन समोरून येणाऱ्या शत्रूच्या रणगाडय़ातच उडी मारली. त्यामुळे तामीळ वाघांचा कणा मोडून लंकेच्या सैन्याला चढाई करायला मोका मिळाला. या ठिकाणी त्याचे स्मारक व तो रणगाडा ठेवलेला आहे. आपल्याला त्याची फिल्मही पाहायला मिळते.

अजूनही जाताना येताना आपल्याला रस्त्यावरील केंद्रात रीतसर नोंदणी करावीच लागते. दहशतवादी कारवायांचे नमुने पाहायला मिळतात. एके ठिकाणी संपूर्ण गावाला पाणी पुरवण्याची प्रचंड टाकीच उलटून पडलेली दिसते. बरीच उद्ध्वस्त घरे, शेतात पुरलेले पण अजूनही जिवंत असलेल्या सुरुंगांची निशाणी दिसते. त्यामुळे त्या भागात जाण्यास मनाई आहे. जाफना येथे फिरताना आपल्याला उद्ध्वस्त शाळा, हॉस्पिटल, आशिया खंडातली सर्वात मोठी लायब्ररी असे बरेचसे अवशेष पाहायला मिळतात. हे शहर आता शांत आहे व हल्लीच पर्यटनासाठी मुक्त केले आहे. आताच्या नव्या पांढऱ्या रंगाच्या लायब्ररीच्या प्रवेशद्वारावरच वीणाधारित सरस्वतीची मूर्ती पाहून प्रसन्न वाटते. येथील प्राचीन मुरुगन कोवील, विष्णूचे देऊळ पाहण्यासारखे आहे. आपल्या दक्षिणेकडील द्रविड कलाकृतीची छाप आहे. तेवढे मोठे जरी नसले तरी सोनेरी lp66मुलामा दिलेली विष्णूची गाभाऱ्यातली मूर्ती छान आहे. मलालावेरी येथे बॉटमलेस रिव्हर पाहायला २५ कि.मी. प्रवास करावा लागतो. किनाऱ्याजवळच गरम पाण्याची कुंडे आहेत.

समुद्रसपाटीपासून ५१८ मी. उंचीवर कँडी तर त्यापेक्षा उंच १८६८ मी.वर नुवारा इलिया ही येथील थंड हवेची ठिकाणं. जाफनाच्या प्रवासानंतर शीण घालवण्यासाठीची अगदी योग्य. नुवारा इलिया म्हणजे रामायणातील अशोकवन ते हेच. हा इलाकाच कांद्याच्या पातीप्रमाणे दिसणाऱ्या लिक् नावाच्या वनस्पतीने भरलेला. जोडीला इतर फळभाज्या, फुलबागा वगैरे तर होत्याच. बाजूनेच खळाळणाऱ्या नदीमुळे परिसर तर अगदीच रम्य होता. रामायणातील उल्लेखानुसार रावणाने सीतेला अशा ठिकाणी ठेवले होते. या जागेवर सीतेचे जुने व नवे मंदिर आहे. बरोबरीने रामलक्ष्मण सीतेचेही मंदिर आहे. नदीपलीकडे मोठय़ा खडकावर हनुमान पावले म्हणून मोठे खळगे आहेत. वर समोरच डोंगरावर काही ठिकाणी माती काळी दिसते, ती हनुमानाने लंका जाळल्याची साक्ष देते असे सांगतात. तिथल्या हक्गला गार्डन्सबद्दल अशी आख्यायिका आहे की युद्धात बाण लागून बेशुद्ध पडलेल्या लक्ष्मणासाठी हिमालयात संजीवनी आणण्याकरता गेलेला हनुमान असंख्य वनस्पतींमध्ये गोंधळून जातो. उपचारांना उशीर नको म्हणून तेवढा तो पर्वताचा तुकडाच उचलून आणतो, तेच हे गार्डन.

सिंहली भाषेत कुंड उद् राता, म्हणजे डोंगरावरील जागा. वेगवेगळ्या राजवटींमध्ये त्याचा अपभ्रंश होत इंग्रजांनी त्याचे सहज सोपे कँडी केले. पाश्चात्त्यांना थंड हवेची सवय, त्यामुळे कोलंबोच्या गरमीपासून सुटका म्हणून या ठिकाणी वास्तव्याची सोय केली. येथे आपल्याला त्या वेळच्या वास्तू पाहायला मिळतात. भौगोलिक स्थानामुळे प्राचीन काळापासून ते गंपोला राजवटीपर्यंत कँडी हीच राजधानी होती. अगदी आवर्जून पाहण्याचे एक ठिकाण म्हणजे पिन्नावला एलिफन्ट ऑर्फनेज्. १९७५ मध्ये प्रथमच जंगलात काही कारणांमुळे आईपासून दुरावलेल्या हत्तीच्या पिलांना ऑर्फनेजमध्ये संगोपनासाठी आणले गेले होते. दोनतीन ठिकाणी जंगलातली जागा बदलून आता या गावात आहे. त्यांना सकस आहार देऊन जंगलातली काही कामं करवून घेतात. लहानांचे व्यवस्थित संगोपन केले जाते. दिवसातून दोन वेळा सर्व हत्तींना तिथल्या ओया नदीवर आणले जाते. हा कार्यक्रम पाहण्याजोगा असतो. भोंगा वाजल्यावर जागेवरून रांगेत रस्ता पार करून ते नदीवर येतात. तासभराने पुन्हा भोंगा झाल्यावर नदीतून बाहेर येऊन गॅलरीत उभ्या असलेल्या लोकांच्या हातातील केळी सोंडेने काढून घेतात, कुणी देण्याला कुचराई केली तर सोंड पुढे करून हिसका मारून घेतात. पुन्हा जंगलात जातात. भोंगा म्हणजे खरें तर, लोकांनी त्यांच्या आगमनाची दक्षता घ्यावी व रस्ता मोकळा ठेवण्यासाठी सूचना असते.

ज्याप्रमाणे कॅथलिक धर्मात इटलीमध्ये व्हेटिकन हे ठिकाण तसेच बौद्ध धर्मात कॅँडी येथील टूथ रेलीक टेंपल, बुद्धाचा दात ठेवलेल्या देवळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खरं म्हणजे, बुद्धाचा दात हा आपल्या देशातून श्रीलंकेला गेला. गौतम बुद्धाच्या महानिर्वाणानंतर त्याचे अवशेष बाहेर जाण्याला सक्त मनाई होती. पण त्या वेळी कलिंग देशाच्या राजाचा पराभव झाल्याने अवशेष सांभाळून ठेवण्यासाठी आपली राजकन्या हेममाला हिच्या केशसंभारात लपवून येथील राजाकडे पाठवला व तो इथलाच झाला. तेव्हापासून राजघराण्याने तो दात सांभाळण्याची प्रथा पडली. त्या वेळी राजधानी अनुराधपुरा येथे होती. पुढे स्वकीय, परकीय, डच पोर्तुगीज यांच्यापासून सांभाळून बुद्धाच्या दाताचा कॅँडीपर्यंत प्रवास झाला. एलटीटीईच्या आतंकात या देवळाची बरीच नासधूस झाली होती. पण तद्नंतर दुरुस्ती झाली.

मुख्य प्रवेश तर हमरस्त्यावरूनच आहे, बाकी प्रवेश सुरक्षेसाठी बंद आहेत. आवारात हेममाला व तिचा पती धतुना यांच्या मूर्ती आहेत. एका लहानशा तलावात हे देऊळ विराजमान आहे. प्रवेशावर दोन्ही बाजूंना गजमुख आहेत. आत व्हरांडय़ात प्रदक्षिणा करून आपण देवळात येतो. देवळाच्या प्रार्थनागृहात लंकेपर्यंत दाताचा प्रवास कसा झाला याची क्रमश: चित्रे आहेत. आपल्याला तो उघडउघडपणे दिसत नाही. गाभाऱ्यात प्रथम रुपेरी, हस्तीदंती मढीत दरवाजापाठी बुलेट प्रूफ काचेच्या स्तुपाच्या आकाराच्या एकात एक जाणाऱ्या आठ lp67सोन्याच्या कुप्यांत दात ठेवलेला आहे. सकाळी व संध्याकाळी सहा वाजता दर्शनासाठी दरवाजा उघडला जातो. त्या कुप्या वेगवेगळ्या तीन चाव्यांनी उघडता येतात.

तीनही बाजूंनी गर्द झाडी व एका बाजूला महावेली नदी असलेले कँडी येथील रॉयल बोटॅनिकल गार्डन हे आशिया खंडातील सर्वात मोठे गणले जाते. उष्ण कंटिबंधात समुद्रसपाटीपासून ५१८ मी. उंचीवर असल्याने वर्षांतले ७, ८ महिने पाऊस असतो. १४६ एकरांवर पसरलेल्या गार्डनमध्ये वेगवेगळे फुलांचे, पाम, बांबू, मसाल्याचे जिन्नस असे विभाग आहेत. पायी फिरायचं नसेल तर गोल्फ कार्ट मिळू शकते. ग्रेट सर्कल मेमोरिअल ट्रीज् या विभागात वेगवेगळ्या देशातील पुढाऱ्यांनी अगदी पंचम जॉर्ज, प्रिन्स ऑफ वेल्सपासून ते स्वर्गीय इंदिरा गांधी, युरी गागारिन यांनी लावलेली झाडे आहेत. कॅबेज अ‍ॅव्हेन्यू भागात वटवाघळांनी झाडं भरून गेली होती, पाम विभागात एकाच खोडातून दोन अशी डबल कोकोनट, नारळ वर्गाची झाडे आहेत. दर २५ वर्षांनी फलधारणा होणाऱ्या या झाडांची फळे १० ते २० किलो वजनाची असतात.

बांबूच्या विभागात आपल्याला २०० हून अधिक प्रकार पाहायला मिळतात. तोच प्रकार फर्नसच्या बाबतीत. जगातल्या वेगवेगळ्या ऑर्कीड्ससाठी तर एक वातानुकूलित हॉलमध्ये व्यवस्था आहे. गुलाबांचे ताटवेच्या ताटवे. क्वीन्स क्राऊन म्हणून असलेले चिमुकले फूल म्हणजे व्हिक्टोरिया राणीचा मुकुटच. आपण ज्याला कृष्णकमळ म्हणतो, त्या फुलांनी डवरलेल्या झाडांवर लटकणारी टेनिस बॉलसारखी दिसणारी फळं. त्या झाडाला कॅनन बॉल ट्री म्हणतात. मसाल्याच्या व औषधी झाडांच्या विभागात मिऱ्याचे वेल, वेलची जायफळाबरोबरच युकॅलिप्टस्, गवती चहा, शिवाय व्हॅनिला अशा वेगवेगळ्या झाडांच्या कुंडय़ा. आसमंत नुसता मिश्र सुगंधाने भरला होता. रोझ गार्डनमध्ये तर डवरलेले, टवटवीत गावठी गुलाबांनी मोहित करून टाकले होते.

इथले याला नॅशनल पार्क बिबटय़ांसाठी प्रसिद्ध आहे. इथल्या सहा लहानमोठय़ा नॅशनल पार्कस्मध्ये याला हे दुसऱ्या क्रमांकाचे आहे. जगात सर्वाधिक बिबटे इथे असले तरी रोज दर्शन होईल याची खात्री नाही. पण त्यांचा मागोवा घेण्यात मजा असते. कारण एका गाइडला दिसला की ते मोबाइलवरून एकमेकांना कळवतात. आमच्या वेळीही असेच झाले. आम्हाला कळल्यावर आम्हीही तिथे गेलो. तो तीन-चार वर्षांचा बछडा झाडाच्या फांदीवर आरामात झोपला होता. १५, २० जीप गाडय़ा जमल्यावर आवाजाने त्याची झोपमोड झाली नसती तरच नवल. आळोखेपिळोखे देत फांदीवरुनच काय एवढे पाहतात म्हणून आम्हा सर्वाकडे कुतूहलाने पाहत राहिला.

गॉल हे लंकेच्या अगदी दक्षिणेचे टोक. पंधराव्या शतकात ते आयात निर्यातीचे मोठे केंद्र होते. चायनीज, पोर्तुगीज, अरब, मले वगैरे बरेच येथे मसाल्याच्या पदार्थासाठी येत. डच राज्यकर्त्यांनी १७ व्या शतकात आशिया खंडातला सर्वात मोठा किल्ला येथे बांधला होता. किल्ल्याचे तट मजबूत ग्रॅनाइटचे असून सन, मून, स्टार असे तीन टेहळणी बुरूज होते. आता येथे फक्त एक लाइट हाउस आहे. श्रीलंकेचे किनारे बऱ्याच ठिकाणी उथळ असल्याने समुद्रात पोहणारे बरेच दिसतात. तसेच मच्छीमारीच्या ठिकाणी काही कोळी पाण्यात काठीवर उभे राहून मासे पकडताना दिसले. काढलेली ताजी फडफडीत मासळी लगेचच किनाऱ्यावर विकायला येते. त्यात कोलंबी, टुना, माकली, लाल रंगाच्या केसाळ कुल्र्या असे मासळीचे विविध प्रकार पाहायला व चाखायला मिळतात. श्रीलंकेचे जेवणही आपल्या दक्षिणेसारखेच पण चविष्ट असते. दक्षिणेला आपम् म्हणतात ते हॉपर्स इथे कांदा खोबऱ्याची सुकी चटणी, किंवा अंडय़ाचे आम्लेट, फिश करी असे घालूनही खाण्याची प्रथा आहे. तसेच शेवया. मी-कारी म्हणजे दगडी वाटग्यात लावलेले दही काकवी घालून खायला देतात. हा वेगळाच पण चविष्ट प्रकार आहे. आपण इथे आल्यावर परक्या ठिकाणी आहोत असे वाटत नाही.

Story img Loader