स्टार्टअप म्हणजे काय ते आपण मागच्या आठवडय़ात बघितलं. पण मग स्टार्टअप नेमकं कशाला म्हणायचं? अनेक जण वेगवेगळे प्रयत्न तर करत असतातच, पण त्यातल्या कुणाच्या प्रयत्नाला स्टार्टअप म्हणायचं?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिलशुकनगरपासून हैदराबादला जाण्यासाठी रोज बसची दीर्घकाळ वाट पाहण्याचा कंटाळा.. शिवाय टॅक्सीचा पर्याय महागडा. ही समस्या फक्त चार-पाच जणांचीच नाही तर टेकसिटीला प्रवास करणाऱ्या अनेकांची. तेव्हा रोजच्या कटकटीवर उपाय म्हणून काही तरुणांनी एकत्र येत मोबाइल एॅप्लिकेशनद्वारे सप्टेंबर २०१५ ला  ‘कम्युट’ ही किफायतशीर मिनीबस शटल सíव्हस सुरू केली. पहिल्या काही दिवसांत तीन हजारांहून अधिक प्रवाशांची नोंद झाली. बघता बघता हा पसारा वाढत गेला आणि ‘कम्युट’चा १७ बसेसचा ताफा सज्ज झाला. आज दिवसाला २५० प्रवाशांची नोंदणी आणि त्यातही ६० टक्क्यांहून अधिक स्त्री प्रवाशांचा समावेश.. ‘कम्युट’चा आलेख प्रतिदिन चढता आहे. दैनंदिन प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते.  मात्र त्यातील समस्या हीच संधी मानत त्याला उद्योगाचं रूप देणारं ‘कम्युट’ हे स्टार्ट अपचं प्रातिनिधिक उदाहरण.

पण स्टार्ट अपचा प्रवास नेमका सुरू कुठून होतो? अर्थातच एक चांगली कल्पना (idea) स्टार्ट अपच्या यशाचे मूळ आहे. यासाठी त्या कल्पनेवर खूप विचार करणं गरजेचं आहे. एखादी चांगली कल्पना सुचणं ही त्यातील पहिली पायरी आहे. मात्र त्यानंतर आपल्या कल्पनेत उद्योग होण्याची किती क्षमता आहे, याचा सखोल विचार स्टार्ट अप उद्योजकाने केलेला असावा. आपल्याला येता-जाता अनेक कल्पना सुचत असतात. त्यांपकी कित्येक कल्पना आपण कदाचित हसण्यावारी नेत असू किंवा त्याबद्दल थोडाफार विचारही करत असू. मात्र त्या विचाराला फारच थोडे डोकेबाज लोक पुढे घेऊन जात असतात. मात्र मुळातच ही कल्पना नेमकी सुचते कशी?

दैनंदिन समस्या –

दैनंदिन आयुष्यात अनेक लहानसहान समस्या आपल्याला दिसत असतात. त्यामुळे अनावश्यक ताण येतो, चिडचिड होते. आपल्या आजूबाजूच्या इतरांनाही तीच समस्या छळत असते. त्यावर पटकन उपाय सापडावा, ही प्रत्येकाची इच्छा असते. ‘हे ना असं असायला हवं होतं!’ हे वाक्यही आपण बोलत असतो. मात्र त्या समस्येवर नेमका उपाय सुचत नसतो. खरं तर या समस्याच आपल्या डोक्याला ‘वैचारिक खाद्य’ पुरवतात अर्थात् एखादी चांगली कल्पना सुचवतात.  मुंबईच्या प्रवासाचं उदाहरण घेऊ. ‘लोकल’ ही मुंबईची ‘लाइफलाइन.’ तिचं वेळापत्रक, तिन्ही मार्गावरचा प्रवास, स्थानकं याची माहिती देणारं छोटं पुस्तक अनेक जण यापूर्वी बाळगत होते. फक्त लोकलच नाही तर मुंबईची बससेवाही तितकीच विस्तारित आहे. बसक्रमांक, स्थानकं यांचं जाळं लक्षात ठेवणंही कठीण. काहींच्या डोक्यात असाही एक विचार आला असेल की ही सगळी माहिती एकाचवेळी एकाच ठिकाणी मिळाली तर! त्याच दरम्यान सचिन टेके या कल्पक तरुणाने ‘एम् इंडिकेटर’ हे मोबाइल एॅप्लिकेशन सुरू केलं आणि तेच एॅप्लिकेशन पूर्ण शहराच्या प्रवासाचा ‘गाइड’ ठरलं. आज त्यात रिक्षा-टॅक्सीचं दरपत्रक, मेट्रो, मोनोरेल, फेरीबोट्स यांची वेळापत्रकं, मुंबईतील प्रेक्षणीय स्थळांची माहिती, नाटक-चित्रपट, नोकरीसंदर्भातील जाहिराती इत्यादी माहिती मिळते आणि ती अद्ययावत होत असते.

दुसरं एक उदाहरण बघू या. समजा एखाद्याला शहरात स्वत:च्या मालकीचे किंवा भाडय़ाचे घर घ्यायचे आहे. मात्र त्यासाठी वणवण करायला अजिबात वेळ नाही. अशी समस्या फक्त एकटय़ाची नाही तर अनेकांची असेल. अशा वेळी घरांबद्दलची सगळी माहिती एका वेळी, एका ठिकाणी मिळायची सोय झाली तर! यावरून असे लक्षात येईल की, दैनंदिन समस्येवर उत्तर शोधण्याच्या प्रयत्नांतून एखाद्याला स्टार्ट अप उद्योग प्रत्यक्षात आणण्याची कल्पना सुचू शकते.

यशस्वी कल्पनांची नक्कल –

प्रत्येक वेळी नवीन कल्पना सुचेल असे नाही. मग काहीजण निरीक्षणाच्या जोरावर एखाद्या प्रचलित, लोकप्रिय उद्योगाच्या कल्पनेची नक्कल करतात. काही वेळेस जशीच्या तशी कल्पना उचलली जाते. उदाहरणार्थ स्वच्छता सेवा, कारवॉश इत्यादी. ही संकल्पना परदेशी आहे. आज मॉलमध्ये फिरायला गेलं की दोन-तीन तास सहज जातात. त्याच वेळेत जर एखाद्याला त्याची गाडी स्वच्छ करून मिळाली तर कोणाला नाही आवडणार? कारण कारवॉिशगसाठी वेगळा वेळ द्यावा लागणार नाही. त्याचे मॉलमधील काम होईपर्यंत गाडी स्वच्छ होऊन आलेली असेल. यात त्या ग्राहकाचा आणि उद्योजकाचाही फायदाच आहे. ग्राहकांच्या वेळेची बचत होईल, त्याला सहज सेवा मिळेल आणि त्या उद्योजकाला असंख्य ग्राहक मिळतील. ‘ओला’, ‘फ्लिपकार्ट’ हे स्टार्ट अप्सदेखील ‘उबर’, ‘अ‍ॅमेझॉन’ या उद्योगांची देशी आवृत्ती म्हणता येतील. जशी मूळ कल्पनेची बिनबोभाट नक्कल केली जाते तसे त्यात काही बदलही करतात. असे बदल करताना स्थानिक बाजारपेठेनुसार, स्थानिक ग्राहकांनुसार आपल्या उद्योगात काही आवश्यक बदल करतात. यासाठी स्थानिक बाजारपेठेत पाय रोवताना त्यांना ग्राहकांना आकर्षति करण्याच्या क्लृप्त्या शोधाव्या लागतात. परदेशी बर्गर्सच्या साखळी उद्योगाची संकल्पना घेत आपल्याकडेही देशी बर्गर्सचा उद्योग सुरू झाला. उदाहरणार्थ गोली वडापावचा साखळी उद्योग. त्यात परदेशी उद्योग संरचनेनुसार आधुनिक यंत्रांचा वापर करण्यात आला. पावाऐवजी काटेकोरपणे कापलेला बन देण्यास सुरुवात झाली.

प्रचलित ट्रेंड-

सध्या आजूबाजूला जे ट्रेंड्स सुरू आहेत, त्यावरूनही एखाद्याला स्टार्ट अपची कल्पना सुचू शकेल. सध्याचा ट्रेंड आणि त्याच्या आधारे पुढच्या तीन-पाच वर्षांत काय बदल होतील, त्यासाठी आपण काय करू शकतो. जर आपण तसा उद्योग आता सुरू केला तर येत्या वर्षांत तो उद्योग कुठे असेल, त्याचे भविष्य काय असेल, याचा सखोल विचार करून एखाद्याला नवीन सुरुवात करता येईल. सध्या आपल्याकडे सेल्फीस्टिकचा ट्रेंड आहे; पण येत्या काही वर्षांत तिचं रूप कसं पालटेल? तिच्यात कोणते सोयीस्कर बदल आवश्यक आहेत? याचा विचार करून एखादा डोकेबाज त्यातून स्वत:चा उद्योग सुरू करू शकतो. उद्या कदाचित तोच उद्योजक एक नवा ट्रेंड रूढ करेल किंवा त्याच्या सुधारित उत्पादनाला अमाप लोकप्रियता लाभेल.

फक्त कल्पना सुचून चालणार नाही तर ती प्रत्यक्षात आणण्यासाठी काही प्रश्न विचारणंही गरजेचं आहे.

  • माझी कल्पना एखाद्या प्रश्नावर अपेक्षित उत्तर किंवा उपाय सुचवत आहे का?
  • त्या कल्पनेमुळे काही आमूलाग्र बदल होणार का?
  • त्या कल्पनेत मोठी झेप घेण्याची क्षमता आहे का?
  • गुंतवणूकदार कसे आकर्षति होतील?
  • उत्तम कल्पना जरी असेल तरी नफा कसा मिळेल?
  • माझ्या कल्पनेवर माझा दृढ विश्वास आहे का?
  • मी ती कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी कितपत सज्ज आणि झपाटलेलो आहे?

या प्रश्नांची जर सकारात्मक उत्तरं मिळाली तर नक्कीच योग्य दिशेने पावलं उचलण्याची तत्परता दाखवावी. तेव्हा भरपूर विचार करा. जे सुचतंय ते लिहून काढा. त्या कल्पनेचं सामथ्र्य ओळखा.

आज स्टार्ट अप्सना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन देण्यासाठी आवश्यक ती मदत संस्थात्मक पातळीवरून सुरू आहे. इंटरनेट तर आधुनिक मार्गदर्शकाच्या रूपाने चोवीस तास उपलब्ध आहे. अशाच काही संकेतस्थळांची यादी ज्यामुळे नवोन्मेषी उद्योजकांना माहिती आणि नेटवìकगसाठी मदत मिळेल.

chaturideas.com  – तुमच्याकडे जर एखादी मस्त कल्पना असेल तर या संकेतस्थळाला भेट द्यायलाच हवी. त्यावर सातत्याने चर्चा सुरू असतात. त्यात सहभाग घेता येईल. चांगल्या कल्पनेत असलेल्या उद्योगाची संभाव्यता, क्षमता जाणून तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. शिवाय ऑनलाइन स्पर्धाच्या माध्यमातून बीजभांडवल (seed capital) मिळवण्याची संधी मिळू शकते.

startups.in –  या संकेतस्थळावर आपले अनुभव मांडता येतील, इतरांकडून सल्ला, काही tips मिळू शकतील. तुमचा उद्योग अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यासपीठ मिळेल. शिवाय संपर्क वाढल्यास business partner मिळण्याची शक्यता वाढते.

mumbai.startups-list.com  – हे संकेतस्थळ म्हणजे मुंबईतील स्टार्ट अप उद्योग, उद्योजक आणि गुंतवणूकदार यांची ऑनलाइन डिरेक्टरीच आहे. गुंतवणूकदारांच्या यादीमुळे त्यांच्याशी थेट संपर्क करण्याची सोय आहे.

याशिवाय लिंक्डइन किंवा फेसबुकसारख्या सोशल नेटवर्कीग साइट्सवर स्टार्ट अप ग्रुप्स (मराठीसुद्धा) तयार झाले आहेत. याचा संपर्क वाढवण्यासाठी निश्चितच फायदा होईल.
ओंकार पिंपळे
response.lokprabha@expressindia.com