रात्री बाहेर जेवायला कुठे जायचे याचा विचार करताना आपला शोध हल्ली ‘झोमॅटो’पाशी येऊन थांबतो. संजीव बिगचंदानी यांनीही हा शोध घेतला होता. ते सतत ६-७ महिने हे अॅप्लिकेशन वापरत होते. त्यांना त्याची उपयुक्तता पटली होती आणि ती आयडियासुद्धा क्लिक् झाली होती. त्यामुळे त्यांनी ‘झोमॅटो’चा संस्थापक दीपेंदर गोयलचा इमेल शोधला आणि त्याच्याशी संपर्क केला. मला तुझ्या कंपनीत गुंतवणूक करायची इच्छा आहे, असे त्या इमेलमध्ये त्यांनी म्हटले होते. पुढे बोलणी यशस्वी झाली आणि संजीव बिगचंदानी यांनी एक मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली. २०१५ पर्यंत ‘झोमॅटो’मध्ये वेगवेगळ्या लोकांनी आणि काही कंपन्यांनी मिळून जवळजवळ २२५ मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली होती. कारण काय तर ‘झोमॅटो’च्या उद्योग कल्पनेचे सामथ्र्य सगळ्यांनी ओळखले होते, त्याबद्दल त्यांना खात्री वाटत होती. कुठल्याही उद्योगासाठी भांडवल हे इंधनच असते. त्याला स्टार्ट अप्स अपवाद नाहीत. विशिष्ट एका स्टार्ट अपमध्ये अमुक एका उद्योगपतीने मोठी गुंतवणूक केली आहे किंवा अमुक एका उद्योगाने प्रचंड भांडवल उभारणी केली असे ऐकिवात असेल. मात्र हे याबाबत सखोल माहिती असावी.
व्हेंचर कॅपिटल : नावावरूनच अंदाज येतो की या कंपन्यांचे काम स्टार्ट अप्सना भांडवल पुरवणे हे असेल. या कंपन्या खरंतर खूप मोठय़ा संकल्पना मुळाशी असणाऱ्या उद्योगांना भांडवल देतात. माहिती तंत्रज्ञान, जैववैद्यकीय, पर्यायी ऊर्जासाधने यांसारख्या क्षेत्रात वेंचर कॅपिटल फम्र्स मुख्यत्वे भांडवल पुरवतात. हल्ली काही मोठय़ा बँकांचाही व्हेंचर कॅपिटल विभाग असतो. या भांडवलाच्या बदल्यात या कंपन्यांचे स्टार्ट अप उद्योगावर काही प्रमाणावर नियंत्रण असते शिवाय लाभात काही वाटा असू शकतो.
एंजल इन्व्हेस्टर : ही व्यक्ती उद्योगाचे सामथ्र्य, त्याच्या वाढीचा अंदाज घेत स्वत:हून स्वत:चे पसे गुंतवत असते. त्यांना स्टार्ट अपचे दैनंदिन नियंत्रण करण्यात रस नसतो मात्र त्यांनी गुंतवलेल्या पशांचा योग्य तो परतावा त्यांना अपेक्षित असतो. हल्ली बऱ्याचदा आपण वाचले असेल की प्रख्यात उद्योगपती रतन टाटा, मोहनदास प, अझीम प्रेमजी यांसारख्यांनी स्टार्ट अप उद्योगांत व्यक्तिगत गुंतवणूक केली आहे. मोठय़ा गुंतवणूकदाराच्या प्रतिमेचा फायदा त्या उद्योगालाही होत असतो.
कर्ज : उद्योजकाकडे त्याच्या उद्योगाचा व्यवस्थित आराखडा तयार असेल तर त्याला उद्योगासाठी कर्ज मिळवता येते तसेच तारण ठेवण्यासारखे काही असल्यास व्यक्तिगत कर्जही उपलब्ध होते.
क्राउड फंडिंग : सध्या ही कल्पना आपल्याकडे लोकप्रिय होत आहे. उद्योजक आणि इच्छुक गुंतवणूकदार यांना जोडणारा एक दुवा असतो तो म्हणजे एखादा ऑनलाइन बिझनेस फोरम (उद्योगमंच). याद्वारे अनेकांना त्यांच्या संकल्पना जाहीर करता येत असल्यामुळे भांडवल मिळायला मदत होते. यासाठी ऑनलाइन नेटवर्कची खूप मदत होते.
स्टार्ट अप उद्योजकाला हे पक्क माहीत असायला हवे की सुरुवातीला त्याच्या उद्योगात त्याला अपेक्षित असलेले भांडवल मिळेलच असे नाही. कारण समोरच्या गुंतवणूकदारासाठी ती एक जोखीम असते. यासाठीच उद्योजकाची कल्पना, त्याचा आराखडा, उद्योगातील तांत्रिक बाबींचे ज्ञान, त्याच्या उत्पादनाचे बाजारपेठेतील स्थान या जोडीला चिकाटी, विश्वासार्हता, धाडस इत्यादी घटक गुंतवणूकदाराला आकर्षति करत असतात. उद्योजकाने निश्चित केलेले लक्ष्य साध्य करण्यासाठी त्याची आणि सहकाऱ्यांची सक्षमता, प्रामाणिकपणा तपासला जातो. या सगळ्याचा विचार करून गुंतवणूकदार टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करू शकतो. अशावेळी संयम ठेवणे आवश्यक आहे. फक्त एकाच गुंतवणूकदारावर अवलंबून राहण्यापेक्षा अन्य दोनतीन पर्यायांचाही विचार करणे सुरक्षित असते.
अपेक्षित भांडवल मिळाले तर त्याचे अनेक फायदे होतात. उद्योगाचा विस्तार करायला वाव मिळतो, ग्राहकांना अधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी पाठबळ मिळते. तज्ज्ञ व्यक्तींना चांगल्या पदांवर नियुक्त करता येते इ. मात्र हे लक्षात ठेवले पाहिजे की, जर ग्राहक समाधानी असतील तर उद्योगही यशस्वी होतो. त्यामुळे ग्राहकहिताला प्राधान्य देत त्यांच्या समस्या सोडवण्यास मदत करणारी उत्पादनं किंवा सेवा निर्माण केल्या तर त्यापाठोपाठ पसा नक्कीच येणार आहे.
एंजल इन्व्हेस्टर्स सांगतात…
राजन आनंदन, सुनील कालरा, रेहान यार खान, रवी गुरुराज, अनुपम मित्तल हे काही नामवंत एंजल इन्व्हेस्टर्स आहेत. राजन आनंदन हे गुगलच्या आग्नेय आशिया आणि भारतातील व्यवसायाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. गेली अनेक वष्रे ते तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट अप्समध्ये गुंतवणूक करत आहेत. त्यांच्या मते तंत्रज्ञान क्षेत्रातील परिणामकारक कल्पना, उत्तम टीमवर्क, वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन आणि स्टार्ट अप उद्योजकाची बांधीलकी, निष्ठा हे गुण त्यांना प्रभावित करतात. कंपनीला किमान दोन संस्थापक असणे चांगले असते. कारण उद्योगातील ताणतणाव वाटून घ्यायला मदत होते, शिवाय एकमेकांच्या पूरक कौशल्याचा उद्योगाला फायदा होतो. त्यांनी काही स्टार्ट अप्सना सुरुवातीच्या काळात भांडवल दिले होते. भांडवल देताना उत्पादनाचा प्रोटोटाइप समजून घेत मदत केली असल्याचे ते सांगतात. तसंच त्या उद्योगाच्या उत्पादनाचे किती ग्राहक किंवा वापरकत्रे आहेत, हे आवर्जून पाहत असल्याचे ते सांगतात. सुनील कालरा हेसुद्धा तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट अप्समध्ये गुंतवणूक करतात. त्यांच्यासाठी गुंतवणूक करताना उत्पादनाची बाजारपेठेतील स्थिती हा महत्त्वाचा घटक आहे. त्या उत्पादनाला मोठय़ा बाजारपेठेत वाढायला वाव मिळायला हवा आणि सरासरीहून अधिक परतावा देण्याची हमी असली पाहिजे, हे त्यांचे स्पष्ट मत आहे आणि त्यानुसारच ते गुंतवणूक करण्यावर भर देतात.
ओंकार पिंपळे – response.lokprabha@expressindia.com, twitter – @pimple_omkar