अमिताने सगळ्या वस्तू घेतल्याची खात्री करून घेतली. स्वत:ला एकदा आरशात बघून तिने आईला हाक मारली. ‘‘ममा, निघते गं मी.. ’’ घाईघाईने तिच्याजवळ येत मधू म्हणाली, ‘‘अगं दूध पिऊन जा. मघाशीच ठेवलंय टेबलावर आणि हे बघ टेन्शन नको घेऊस. पेपर चांगलाच जाईल.. बेस्ट ऑफ लक‘’’ अमिता घटाघटा दूध प्यायली. रुमालाने तोंड पुसत म्हणाली, ‘‘ थँक्यू ममा.. ममा लक्षात आहे ना आम्ही सगळ्या मैत्रिणी हॉटेलमध्ये जाणार आहोत.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘‘हो.. हो.. आहे लक्षात. जा मजा करून ये. पण जास्त उशीर करू नकोस..’’ काळजीने मधू बोलली. अमिताचा आज दहावीचा शेवटचा पेपर होता. संपूर्ण वर्ष टेन्शनमध्येच गेले होते, त्यामुळे आता सेलिब्रेशन व्हायलाच हवे होते. अमिता गेल्यावर मधूने दार लावून घेतले व ती परत कामात गुंतली.
गेले दोन-तीन दिवस मधू जरा अस्वस्थ होती. नीरजने ती बातमी सांगितल्यापासून तिचे मन थाऱ्यावर नव्हते. पण अमिताला काही कळू नये म्हणून ती अगदी नॉर्मल असल्यासारखी वागत होती. त्या दिवशी ऑफिसमधून आल्यावर नीरज म्हणाला, ‘‘मधू, मला वाटतं अमिताला सगळं खरं सांगण्याची वेळ आली आहे..’
‘‘पण आपलं ठरलं होतं ना, बारावीनंतर तिला सांगायचं, मग आत्ता घाई का करताय?’’ मनातली भीती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
‘‘मधू काळजी करू नको. आजची ही पिढी खूप समजूतदार आहे. अमू आपल्याला नक्की समजून घेईल.’’ नीरजने मधूला समजावण्याचा प्रयत्न केला.
‘‘पण अजून ती अल्लड आहे. मग हा हट्ट का?’’ मधूचा चेहरा कमालीचा केविलवाणा झाला होता. ‘‘काल अशोकचा फोन आला होता. बिंदूला कॅन्सर झालाय.. लास्ट स्टेजला आहे ती..’’ नीरज हताश स्वरात बोलला.
‘‘काय ?..मग मात्र अमूला सांगणं भाग आहे. बिंदूची इच्छा आहे का एकदा अमिताला बघायची?’’ आता मधूच्या बोलण्यातून काळजी डोकावत होती. नीरजच्या जवळ बसत तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तिच्या हातावर आपला हात ठेवत नीरज म्हणाला, ‘‘मधू कधीतरी तिला हे सांगावंच लागणार होतं ना मग आता का नको?’’
‘‘बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण मला खूप भीती वाटते हो.. माझ्यापासून दुरावणार नाही ना माझी लेक? मला नाही जगता येणार हो तिच्याशिवाय..’’ बोलता बोलता मधूच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.
अमिता.. १६ वर्षांची गोड मुलगी.. गोरीपान, कुरळ्या केसांची तपकिरी डोळ्यांची, अल्लड, मनमोकळी.. नीरज व मधूचा जीव असलेली अमिता तितकीच समजूतदारपण होती. अमिताचा शाळेतला आज शेवटचा दिवस.. पण आज मधूला तिचा शाळेतला पहिला दिवस आठवत होता. निरागस चेहऱ्यावरचा भेदरलेला भाव मधूला आजही आठवतोय. शाळेत सोडून जाताना तिने रडून घातलेला धुमाकूळ. शाळा सुटल्यावर ममाला मारलेली घट्ट मिठी..
मोबाइल वाजला आणि मधू भानावर आली. फोन अमिताचा होता. तिचा पेपर छान गेला होता. चार वार्जेपत घरी येते असे सांगून तिने फोन ठेवला. मधू परत आपल्या कामात गुंतली, पण भूतकाळ काही डोक्यातून जात नव्हता.
ममाचा फोन झाल्यावर अमिताने लगेच पपांना फोन लावला. ‘‘बोल बेटा तुझ्याच फोनची वाट बघत होतो, कसा गेला पेपर?’’ नीरजच्या प्रश्नाला उत्तर देत ती म्हणाली, ‘‘पप्पा पेपर मस्त गेला. आता मी एकदम फ्री झाले, आता रिझल्ट लागेपर्यंत मस्त मजा करणार मी..’’
‘‘अगं हो, तुला आम्ही कधी कुठल्याही गोष्टीला नाही म्हटलंय का.. चल रात्री बोलू. मला एका मीटिंगला जायचंय. बाय.’’ नीरजने फोन बंद केला आणि मीटिंगच्या तयारीला लागला.
दार उघडताच अमिता ममाच्या गळ्यात पडून म्हणाली, ‘‘ममा छान गेला आजचा दिवस. मस्त आराम करणार मी आता.. खूप थकवा आलाय गं या परीक्षेच्या टेन्शनमुळे.’’ मधूने प्रेमाने लेकीकडे पाहिले. खरंच खूप थकल्यासारखी वाटत होती ती.. डोळ्याखाली काळी वर्तुळे आली. होती. तिचे हात दूर करत मधू बोलली, ‘‘खरंच आराम कर आता. तुझी झोप झाली की, चहा ठेवते, तोपर्यंत बाबाही येतील.’’
त्यानंतरचे चार-पाच दिवस अमिता जणू हवेतच तरंगत होती. मित्रमैत्रिणींशी भरभरून होणाऱ्या गप्पा. एखादा छान पिक्चर, मनासारखे शॉपिंग या सगळ्याचा मनसोक्त आनंद घेत होती. चार दिवसांनंतर मात्र सकाळी ब्रेकफास्ट करताना नीरज तिला म्हणाला, ‘‘अमू, आज संध्याकाळी घरीच आहेस ना? तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे.’’ त्याच्या बोलण्यातलं गांभीर्य अमिताच्या लक्षात आलं नाही. ‘‘हो पप्पा, मी घरीच आहे. बोलू आपण संध्याकाळी. काही सरप्राइज गिफ्ट तर नाही ना माझ्यासाठी?’’ मिस्किलपणे तिने प्रश्न केला आणि गुणगुणत आपल्या खोलीच्या दिशेने गेली. सगळे माहीत असूनही नीरजच्या या बोलण्याने मधूच्या छातीत धस्स झाले. डायनिंग टेबलावरच्या डिशेस एकत्र करून ती स्वैपाकघराकडे वळली.
संध्याकाळी नेहमीप्रमाणे नीरज सात वाजता ऑफिसमधून घरी आला. अमिता पप्पांची वाट बघत घरीच थांबली होती. मधूने तिघांसाठी गरमागरम चहा केला. पप्पांच्या तोंडून ती सरप्राइज गोष्ट ऐकायची तिला उत्सुकता लागली होती आणि तीच गोष्ट कशी सांगावी असा नीरज व मधूला प्रश्न पडला होता. पण कधीतरी हे सांगायलाच लागणार होतं आणि म्हणून नीरजने बोलायला सुरुवात केली, ‘‘हे बघ मी काय बोलतोय ते नीटपणे ऐकून घे आणि मग काय तो निर्णय घे..’’
‘‘पप्पा असं सगळं बोलून तुम्ही माझी उत्सुकता आणखी वाढवताय. बोला ना काय झालंय.’’ आता मात्र अमिताच्या चेहऱ्यावर त्या अनामिक गोष्टीची हुरहुर दिसू लागली.
‘‘अमिता तू अगदी लहान असल्यापासून तुझ्या आईने तुला खूप जपलंय. मी करतो त्यापेक्षा काकणभर जास्तच प्रेम करते ती तुझ्यावर,’’ नीरजचे बोलणे मध्येच तोडत ती म्हणाली, ‘‘पप्पा तुम्हाला हे सांगायचंय? मला हे आधीपासूनच माहिती आहे, मग आता नव्याने सांगायची काय गरज आहे पप्पा?’’ प्रश्नार्थक चेहऱ्यानं अमिता बोलली.
‘‘नव्याने सांगायची गरज आहे. बेटा तुझा जन्म झाल्यावर तीन महिन्यांनीच तुझी आई बिंदू हे घर सोडून गेली आणि तिने दुसरं लग्न केले. आमच्या लग्नाआधीच तिचं अशोकवर प्रेम होतं. पण आईबाबांच्या आग्रहाखातर तिने माझ्याशी लग्न केलं. इन मिन दीड वर्षे आमचा संसार कसाबसा टिकला. मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मला वाटलं होतं तुझा जन्म झाल्यावर ती संसारात रुळेल. पण माझे दुर्दैव.. तसं झालं नाही आणि तिने घर सोडले..’’
नीरज भूतकाळात गेला आणि एकदम स्तब्धच झाला. तो शून्यात गेलेला पाहून मधू तिला पुढे सांगू लागली. ‘‘मी आणि नीरज एकाच ऑफिसमध्ये होतो. त्यामुळे मला ही बातमी लगेच कळली. तुला सांभाळण्याचा मोठा प्रश्न होता. शेजारच्या घरात तुला सांभाळण्याची तात्पुरती सोय झाली होती. मला जमेल तशी मी इथे येऊन नीरजला मदत करायचे. तुला बघायचे. हळूहळू मला तुझा लळा लागला..’’
‘‘बिंदू गेली तो काळ माझ्यासाठी खूप अवघड होता, पण मधूने माझी साथ दिली आणि आम्ही लग्नाचा निर्णय घेतला, तू एक वर्षांची झालीस आणि आम्ही लग्न केलं.. आता मुख्य सांगायची गोष्ट म्हणजे त्ांुझ्या बिंदू आईला कॅन्सर झालाय व ती सारखी तुझी आठवण काढते आहे. तिच्याकडे जास्त दिवस नाहीयेत, तेव्हा आम्हाला असं वाटतंय की तू तिला एकदा भेटावंस, पण आम्ही जबरदस्ती करणार नाही. निर्णय पूर्णत: तुझाच राहील. आणखी एक, तिला भेटायला मी येणार नाही तुझ्यासोबत, तुला जायचे असेल तर मधू तुला घेऊन जाईल.’’ नीरजने बोलणं संपवलं आणि तो अमिताच्या बोलण्याची वाट पाहू लागला.
अमिताला हे सत्य पचवणं खूप कठीण होतं. पाच मिनिटांच्या पप्पांच्या बोलण्यानं तिचं पूर्ण जीवन विस्कळीत झालं होतं. मधू आपली खरी आई नाही याच्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. ती जागेवरून उठली व हळुवार पावलं टाकत मधूजवळ येऊन बसली. मधूच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवत तिच्या डोळ्यात बघत म्हणाली, ‘‘ममा खरं आहे हे? मी कसा विश्वास ठेवू? तुझ्याशिवाय आईचा विचार मी करूच शकत नाही. इतक्या प्रेमाने तू मला वाढवलंस की एक क्षणही विचार मनात आला नाही, की तू माझी खरी आई नसशील. कशाला सांगितलंत मला हे सगळं? किती आनंदात होते मी..’’ बोलताना तिचा चेहरा कसानुसा झाला होता.
‘‘बिंदूचं काही बरंवाईट झालं तर तिची शेवटची इच्छा राहायला नको. एकदा तिला तू भेटून यावं असं आम्हाला दोघांनाही वाटतंय आणि म्हणूनच एवढय़ा घाईने तुला हे सांगितलं. आता अमू निर्णय तुला घ्यायचा आहे.. तुझ्यासाठी हे सोपं नाही, पण जीवनात काही निर्णय तडकाफडकी घ्यावेच लागतात..’’ नीरजचं बोलणं अमिताला पटत होतं, पण तरी अनपेक्षितपणे आलेल्या या सत्याला सामोरं जाताना तिच्या जिवाची घालमेल होत होती.
अमिताला जवळ घेत मधूने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, पण मनातून मात्र ती खूप घाबरली होती. सत्य कळल्यावर अमिताचं आपल्यावरचं प्रेम कमी तर नाही ना होणार, या प्रश्नाची टांगती तलवार सतत तिला सतावत होती.
घरात तणावाचं वातावरण झालं होतं. त्या रात्री कुणी जेवलंच नाही. अमिताला बळजबरीने एक ग्लास दूध मधूने प्यायलाच लावलं. अमिताने मग झोपेपर्यंत बराच विचार केला व ममी पप्पांच्या बेडरूममध्ये येऊन तिने तिचा निर्णय दिला, ‘‘तुमच्या दोघांसाठी मी त्या आईला भेटायला जायला तयार आहे.’’ नीरज व मधूला एकदम मोकळे झाल्यासारखे वाटले.
अमिता झोपायला बेडरूममध्ये आली खरी पण, तिच्या डोळ्यात झोप मात्र अजिबात नव्हती. उलटसुलट विचारांनी तिचं डोकं भणभणायला लागलं. समजा बिंदू आईला भेटल्यावर आपल्या मनात तिच्याबद्दल माया किंवा आपुलकी निर्माण झाली तर? तिला आपल्याला भेटायची इच्छा का आहे? ती मरणाच्या दारात उभी आहे म्हणून की तिला एकदम एवढय़ा वर्षांनंतर आपल्याबद्दल प्रेम वाटायला लागलं म्हणून? दुसरी शक्यता कमीच आहे. कारण इतक्या वर्षांनी तिला आपल्याबद्दल प्रेम कसं वाटेल? आणि आपल्या आईचं काय?
मधूची मन:स्थिती काही वेगळी नव्हती. तिने अमिताला जन्म दिला नव्हता एवढंच, पण १४ वर्षे तिचे संगोपन करताना आईची कमतरता कुठेच भासू दिली नव्हती..
सकाळी मधू व नीरजला जाग आली ती दारावर पडत असलेल्या थापेमुळे. दार वाजवून अमिता म्हणत होती, ‘‘ममा-पप्पा उठा.. आज मी चहा केला आहे, लवकर डायनिंग टेबलवर या..’’ अमिताच्या वागण्यातली सहजता दोघांचंही मन सुखावून गेली. तोंड धुऊन दोघंही चहा प्यायला डायनिंग टेबलपाशी आली. दोघांना अमिताने ‘‘गुड मॉर्निग’’ केले. दोघांपुढे चहाचा कप ठेवून ती बोलू लागली, ‘‘ममा, पप्पा काल बराच वेळ विचार करून मी एक निर्णय घेतलाय.. मी त्या आईला भेटायला अजिबात जाणार नाही.. मला आतून सारखी भीती वाटते आहे, की तिला प्रत्यक्ष पाहिल्यावर आणि भेटल्यावर एखाद वेळेस मला तिच्याबद्दल काहीतरी वाटायला लागेल. मी जर तिच्याकडे ओढले गेले तर हा माझ्या ममावर अन्याय होईल. माझं ममावरचं प्रेम मला अजिबात कमी होऊ द्यायचं नाहीये. मला आईची गरज होती तेव्हा माझा जराही विचार न करता मला सोडून गेलेल्या बाईचा विचार मी का करू? नाही भेटायचं मला..’’ बोलताना नकळत तिच्या डोळ्यात अश्रू तरळले, आपलं बोलणं पुढं चालू ठेवत ती म्हणाली, ‘‘जसं पप्पांना तिला भेटायची इच्छा नाही तशी मलाही नाही, आता हा विषय इथेच संपला..’’
मधू व नीरज अवाक् होऊन तिचं बोलणं ऐकत राहिले. आपली लाडकी लेक एकदम मोठी झाली आहे.. अगदी ठाम निर्णय घेण्यालायक समजूतदार झाली आहे याची त्यांना नव्यानेच जाणीव झाली होती.
(समाप्त)
वर्षां भावे