करिअर निवडीसारख्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर टॅरो कार्ड तुम्हाला निर्णय घेण्यास मदत करू शकते. पण त्यासाठी गरज आहे ती अचूक आणि योग्य प्रश्न विचारण्याची.
प्रत्येकाला आयुष्याच्या टप्प्यावर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतात. आपण कोणते करिअर निवडावे हा त्यापैकीच एक सर्वात महत्त्वाचा निर्णय असतो. योग्य आणि मनाला समाधानी करणारे करिअर निवडले तर त्याचा आपल्याला फायदाच होतो. मात्र कोणते करिअर निवडावे, याबाबत आपला नेहमीच गोंधळ उडालेला असतो. त्या वेळी आपण व्यावसायिक तज्ज्ञ, आपले शिक्षक, मित्र, कुटुंबातील सदस्य यांचे मार्गदर्शन घेतो. प्रत्येकाकडून मिळणाऱ्या वेगवेगळ्या मार्गदर्शनामुळे आपला गोंधळ आणखी वाढतो.
आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्यांचे ऐकून आपण करिअर निवडले, तरी आपण त्यात पूर्णपणे समाधानी होतोच असे नाही. आला दिवस ढकलणं इतकंच कधी कधी आपल्या हातात राहते. हे करिअर आकर्षक आणि संतोषजनक असतेच असेही नाही. अशा वेळी खूपच निराशेमुळे कामाचा कंटाळा येतो, कधी एकदा साप्ताहिक सुट्टीचा दिवस येईल, असे वाटत राहते. आज नाही तर उद्या काही तरी बदल होईल आणि आपल्या कामातून समाधान मिळू शकेल, असा विचार सारखा आपण करीत राहतो. निराशाजनक करिअरमुळे सातत्याने तणावात राहू लागतो. जबाबदारी आणि कौटुंबिक दबाव यांमुळे आपण हे करिअर सोडूही शकत नाही. त्यामुळे एका निराशाजनक करिअरमध्ये आपण अडकून राहतो.
करिअर निवडण्यात तुम्हाला चुकीचे मार्गदर्शन मिळाले असे मी म्हणणार नाही. तुमचे मार्गदर्शक तुमच्या करिअरच्या विरोधात आहेत आणि त्यांनी तुम्हाला चुकीचा सल्ला दिला आहे, असेही नाही. तुमचे सर्व काही चांगले व्हावे, अशीच त्यांची इच्छा असते. पण ते केवळ त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करीत असतात. तुमच्या करिअरचा विचार करताना तुमचा दृष्टिकोन, तुमच्या आवडी-निवडी, इच्छा-आकांक्षा काय आहेत, याचा विचार करणेही गरजेचे आहे.
टॅरो कार्ड तुमचा मानसिक तणाव कमी करून तुम्हाला तुमच्या करिअरबाबत योग्य मागदर्शन करील. मात्र टॅरो कार्ड वाचणाऱ्यांना तुम्ही कशा प्रकारचे प्रश्न विचारणार, तुमचा प्रश्न, त्यातील शब्दरचना योग्य असली पाहिजे, तरच टॅरो कार्ड तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकते.
‘मला नोकरी कधी मिळेल?’ हा प्रश्न टॅरो कार्ड रीडरची दिशाभूल करणारा आहे. मला माझ्या मनात असलेली नोकरी मिळण्यासाठी काय करण्याची गरज आहे? माझ्या मनातील नोकरी मला आता मिळू शकते? माझी बलस्थाने आणि कमकुवतपणा काय आहे? माझ्या मनातील नोकरी मिळवण्यासाठी मी कशावर लक्ष केंद्रित केले पाहिजे? हे प्रश्न योग्य आणि दिशादर्शक आहेत. चुकीच्या प्रश्नांमुळे किंवा चुकीची शब्दरचना असलेल्या प्रश्नांमुळे तुम्हाला अयोग्य आणि खूपच सामान्य माहिती मिळू शकते. तुम्हाला काय हवे आहे, तुमची गरज काय आहे, याबाबत कोणतेही मार्गदर्शन त्यामुळे होऊ शकणार नाही. योग्य आणि बरोबर प्रश्न विचारल्यास टॅरो कार्ड तुम्हाला यश प्राप्त करणारे मार्गदर्शन करू शकेल, यात शंकाच नाही.
तुम्ही प्रश्नच चुकीचा विचारला आणि त्याआधारे तुम्ही टॅरो कार्ड वाचणाऱ्यांना चुकीचे ठरवत असाल, तर योग्य उत्तरे मिळणार नाहीत आणि केवळ असमाधानच मिळेल.
टॅरो कार्ड तुम्हाला तुमचे करिअर, नोकरी निवडण्यासाठी कसे मार्गदर्शन करते ते पाहू या..
१. तुमची नेमकी आवड कशात आहे? कोणत्या प्रकारचे काम करण्यास तुम्हाला अधिक आवडेल? तुम्ही मित्रांशी तुमच्या आवडत्या कोणत्या गोष्टींची चर्चा करता? तुमची आवड नेमकी कशात आहे, हे आधी शोधण्याचा प्रयत्न करा. त्याआधारे टॅरो कार्ड वाचणारा तुम्हाला तीन टॅरो कार्ड काढून देईल, त्याद्वारे तुम्हाला नेमके काय पाहिजे आहे, हे समजेल.
२. आवडती क्षेत्रे ओळखणे.
तुम्हाला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, ते आधी ओळखा. तुमची आवडती क्षेत्रे कळल्यास तुम्हाला योग्य नोकरी मिळू शकेल किंवा योग्य व्यवसाय करता येऊ शकेल.
३. तुमचे करिअर निवडायला मदत करील, असा दिशादर्शक मार्ग तयार करणे.
टॅरो कार्डमुळे तुम्हाला करिअर वा नोकरी निवडण्यासाठी योग्य दिशा मिळेल. करिअर निवडण्यासाठी किंवा आहे त्या करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी टॅरो कार्ड महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. उदा. ‘ळँी ळँ१ी ऋ हंल्ल२ि’ हे कार्ड आल्यास तुम्ही ऑनलाइन जॉब शोधू शकता, असे सांगण्यात येईल. ‘एम्परर’ हे कार्ड आल्यास ते प्लेसमेंट सेंटरकडे निर्देश करणारे असेल.
४. तुम्हाला योग्य संधी कधी मिळणार ते ओळखणे.
टॅरो कार्डमुळे तुम्हाला योग्य संधी कधी मिळणार, हे समजू शकते. तुम्हाला कोणत्या प्रकारची कंपनी पाहिजे, कोणता उद्योग करणे सोयीचे पडेल, तुमचा बॉस कसा असावा, तुम्हाला सोयीस्कर पडेल अशा ठिकाणी तुम्हाला जॉब मिळू शकेल का, आदी प्रश्नांची उत्तरे टॅरो कार्ड देते. या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी एकेक टॅरो कार्ड काढावे लागेल.
५. मुलाखतीसाठी तयार राहा.
नोकरी मिळवण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या मुलाखतीला जाण्यापूर्वी तुम्ही टॅरो कार्डची मदत घेऊ शकता. मुलाखतीची तयारी कशी करायची, मुलाखतीसाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींची गरज आहे, मुलाखत देणाऱ्याकडे कोणती गुणवत्ता आणि कौशल्य हवे, तुम्ही तुमच्यातील गुणवत्ता मुलाखतीत कशी दाखवणार, तुमचा आत्मविश्वास कसा वाढेल आदी प्रश्नांची उत्तरे देऊन टॅरो कार्ड तुम्हाला मार्गदर्शन करील.
आयुष्यात आपण अनेकदा गोंधळलेले असतो. योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्यात नसते. नशिबाने किंवा देवाने आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे, हे आपल्याला माहीत नसते. अशा वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी टॅरो कार्ड आपल्याला मदत करते.
अनुवाद : संदीप नलावडे