बऱ्याच दिवसांनी शाळेतला ग्रुप भेटलो.. ‘‘दोन पिझ्झा, एक गाíलक ब्रेड आणि एक कोिल्ड्रक’’ – एका पिझाच्या दुकानात आम्ही ऑर्डर देत अगदी सहजपणे १२०० रुपयांचं बिल हातात घेत असताना माझ्या मत्रिणीने मला खुणावलं की तिथे काम करणारी मुलगी आपल्या शाळेत होती. मी पण चमकून बघितलं तिच्याकडे.. सुलोचनानेसुद्धा आमच्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं, ते माझ्या नजरेनं लगेच टिपलं.. तिने कामात बिझी असल्यासारखं दाखवलं तरी मात्र तिच्या आणि आमच्या डोक्यात सुरू असलेलं विचारचक्र क्षणातच बिझी झालं हे आम्हाला लगेच कळलं! एवढी हुशार, सुंदर, चांगल्या घरातली मुलगी का बरं असं हॉटेल मध्ये काम करते? हा विचार काही शांत बसू देत नव्हता. ‘‘सुलोचना’’- तशी अंगकाठीने बेताचीच, पण दिसायला सुंदर, नावाप्रमाणेच बोलके पाणीदार डोळे, शाळेत तर मोठी विचारवंत असल्यासारखी मोजकीच पण आशयघन बोलणारी, साधे-सुटसुटीत कपडे- त्यात कधी बडेजाव नाही; घरची परिस्थिती मध्यमवर्गीय तरी चांगलीच, नियमित अभ्यास करणारी अशी तिची शाळेतली प्रतिमा! खरं तर शाळेत आमचं चांगलं पटत असलं तरी शाळेनंतर तसा फारसा काहीच संबंध नाही, अगदी फेसबुकवरसुद्धा आम्ही फ्रेंड्स नाही- त्यामुळे तिची शाळेतलीच इमेज माझ्या डोळ्यांसमोर होती. पण आज तिला तिकडे असं ‘वेटर’सारखं काम करताना बघून कुठेतरी ह्य इमेजला धक्का लागला एवढं मात्र खरं! अर्थातच विषय चच्रेत आला.. व्हॉट्स अॅप ग्रुपवर चौकशी सुरू झाली. चौकशी कसली ‘गॉसिपच’ ते!!.. आमच्या ग्रुपमधलं विशेष कुणीच तिच्या संपर्कात नसल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला.. काही जणांना ती तिथे काम करतेय यापेक्षा तिने आम्हाला बघून ओळख दाखवली नाही, याचं जास्त आश्चर्य वाटलं. काही दिवस चर्चा झाली आणि मग इतर विषयांप्रमाणे हा विषय पण मावळला. परवा शाळेतली एक वेगळी मत्रीण भेटली, सुलोचनाशी तिचा संपर्क आहे हे कळल्याबरोबरच मी तिला ह्य प्रकाराबद्दल विचारलं आणि जे मला कळलं त्यानंतर स्वत:चीच इतकी लाज वाटायला लागली की अक्षरश: स्वत:ला एक थप्पड मारावीशी वाटली मला!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा