हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सोनीची एक्सपिरिआ ही स्मार्टफोन मालिका केवळ भारतातच नव्हे तर जगभरात गाजली. मात्र नंतर आलेल्या आयफोनच्या वादळापुढे त्यांचा फार काही टिकाव लागला नाही. तरीदेखील आजही असे अनेकजण सापडतात की, ते केवळ आणि केवळ सोनीच्याच विविध हँडसेटस्च्या प्रेमामध्ये आहेत. अशांसाठीच सोनीने अलीकडेच सप्टेंबर महिन्यांत झालेल्या त्यांच्या वार्षिक प्रदर्शनामध्ये जाहीर केलेले नवे उत्पादन अर्थात सोनी एक्सपिरिआ झेड थ्री आणि झेड थ्री कॉम्पॅक्ट बाजारात आणले आहे.
सध्या अनेकांना वेड आहे ते फोटो आणि टिपलेल्या फोटोंचे अपडेटस् याचे. तर अनेकांना एकाच वेळेस आपला फोन व्यावसायिक कामांसाठी आणि त्याच बरोबर वैयक्तिक कामासाठीही वापरायचा असतो. हे गृहीत धरूनच आता सोनीने त्यांच्या नव्या एक्सपिरिआ झेड थ्री मालिकेत अनेक वैशिष्टय़े एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे.
यातील एक्सपिरिआ झेड थ्रीचा स्क्रीन ५.२ इंचाचा तर कॉम्पॅक्टचा स्क्रीन ४.६ इंचाचा आहे. झेड थ्रीचे वजन अवघे १५२ ग्रॅम्स तर कॉम्पॅक्टचे वजन केवळ १२९ ग्रॅम्स एवढेच आहे. केवळ आकार आणि वजन हाच यांच्यातील महत्त्वाचा फरक आहे. उर्वरित सर्व महत्त्वाच्या बाबींमध्ये कंपनीने कोणतीही तडजोड केलेली नाही. या दोन्ही स्मार्टफोन्ससाठी २.५ गिगाहर्टझ् क्षमतेचे क्वाड कोअर प्रोसेसर वापरण्यात आले आहेत. हे अद्ययावत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८०१ प्रोसेसर आहेत. इंटरनेट ब्राऊझिंग वेगात शक्य व्हावे, यासाठी ४जी एलटीए मोडेमची सोय असून त्यासाठी ३ जीबी रॅम स्वतंत्रपणे देण्यात आले आहे. या फोनचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे तब्बल २०.७ मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि त्यासाठी वापरण्यात आलेली सर्वोत्तम लेन्स. त्यामुळे कमी प्रकाशातही उत्तम डिजिटल कॅमेऱ्याप्रमाणेच या स्मार्टफोनवरही चांगले फोटो टिपता येतात.
प्ले स्टेशन फोरसाठीही या स्मार्टफोनचा वापर थेट करता येतो. आणि एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे धूळ आणि पाणी यांचा परिणाम या फोनवर होत नाही. त्यामुळे त्यापांसून फोनचा बचाव करण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत.
सोनी हे नाव अगदी पूर्वीपासून प्रसिद्ध आहे ते त्यांच्या साऊंड म्हणजेच आवाजाच्या गुणवत्तेसाठी ती गुणवत्ता त्यांनी या स्मार्टफोनमध्येही टिकवून ठेवलेली दिसते.
(एक्सपिरिआ झेड थ्री : भारतीय बाजारपेठेतील किंमत – रु. ५१,९९० /-
एक्सपिरिआ कॉम्पॅक्ट झेड थ्री : भारतीय बाजारपेठेतील किंमत – रु. ४४,९९०/- )
पूर्वी डेस्कटॉप पीसी मोठय़ा प्रमाणावर वापरले जायचे, मात्र आता गेल्या अनेक वर्षांमध्ये प्रमाण वाढले आहे ते लॅपटॉप्सच्या विक्रीचे. त्यातही दसरा- दिवाळीसारख्या सणासुदीच्या वेळेस लॅपटॉप्सची विक्री तडाखेबंद होत असते, असा गेल्या चार- पाच वर्षांचा अनुभव आहे. मध्यंतरी एक वर्ष असे गेले की, त्या वेळेस टॅब्लेटस्ची तडाखेबंद विक्री झाली आणि त्याचा परिणाम लॅपटॉप्सच्या विक्रीवर झाला. मात्र नंतरच्या काळात अनेकांच्या असे लक्षात आले की, काही कामांसाठी लॅपटॉप्स हेच आजही उत्तम आहेत. खास करून ज्यांना टायिपग मोठय़ा प्रमाणावर करावे लागते, त्यांच्यासाठी लॅपटॉप्स अधिक चांगले असतात. विद्यार्थ्यांना त्याचा फायदा अधिक होतो. सिनेमा तर टॅब्लेटवरही पाहता येतो पण मित्र- मैत्रिणींसह आनंद
भारतातील हा बदल आणि दसरा- दिवाळीचे औचित्य, त्या वेळेस होणारी मोठी खरेदी हे सारे लक्षात घेऊन यंदाच्या दिवाळीमध्ये लिनोवो या कंपनीने एक विशेष रेंज भारतात आणण्याचे जाहीर केले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी दिवाळीपूर्वीच्या आठवडय़ात फुल एचडी (एफएचडी) डिस्प्ले असलेले लॅपटॉप्स भारतीय बाजारपेठेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. फुल एचडी हेच त्याचे प्रमुख वैशिष्टय़ असणार आहे. अशा प्रकारे फुल एचडी डिस्प्ले असलेले लॅपटॉप्स आणणारी ती भारतातील पहिलीच कंपनी असेल, असाही कंपनीचा दावा आहे.
फुल एचडी लॅपटॉप्स आणि त्यांची मॉडेल्स
लिनोवो झेड ५०
किंमत : रु. ५४,९९०
वैशिष्टय़ं : डॉल्बी अॅडव्हान्स ऑडिओ सिस्टिमसह मल्टिमीडिया पॉवरहाऊस, सोबत ब्लूरे डीव्हीडी, ४ जीबी एनव्हीडीआ ग्राफिक कार्ड, अॅक्यूटाइप कीबोर्ड
लिनोवो – वाय ५०
किंमत : रु, ७९,९९०
गेमिंगसाठी वापरण्यासाठी उत्तम लॅपटॉप, ४ जीबी डीडीआर५ डिस्क्रीट ग्राफिक्स, जेबीएलचे उत्तम स्पीकर्स वूफर्ससह, बॅकलाइट कीबोर्ड,
लिनोवो फ्लेक्स २
किंमत : रु, ४१,९९०
स्टायलिश मल्टिमोड, १० पॉइंटस् मल्टिटच स्क्रीन, बॅकलाइट कीबोर्ड
लिनोवो योगा २
किंमत : रु, ५९,९९०
३६० फ्लिप्स असलेले इंटेलिजन्ट मल्टिमोड उपकरण, हायब्रीड ड्राइव्ह (५०० जीबी अधिक ८ जीबी एसएसडी), दीर्घकाळ चालणारी बॅटरी
‘नो उल्लू बनािवग’ या जाहिरातीच्या माध्यमातून तरुणाईमध्ये लोकप्रिय ठरलेल्या आयडिया कंपनीने इंटरनेट सर्फिंगसाठी अनेक चांगली पॅकेजेस बाजारपेठेत आणली आहेत. ते करत असताना त्यांना असेही लक्षात आले की, बाजारात स्वस्तातील स्मार्टफोन्सची कमी नसली तरी नाव असलेला म्हणजेच ब्रॅण्डेड स्मार्टफोन मात्र फार कमी किमतीत उपलब्ध नाही. तरुणाईला मोबाईलचा ब्रॅण्डही मिरवायचा असतो. हे सारे ध्यानात घेऊनच त्यांनी आता थ्रीजी पॅकेज स्वस्तात देणारे स्वस्तातील स्मार्टफोन्स बाजारात आणले आहेत.
आयडियाने बाजारात आणलेल्या या स्मार्टफोन्सपैकी कोणताही फोन विकत घेतलात तर तुम्हाला त्यासोबत तब्बल १६ जीबीचा थ्रीजी डेटा मिळणार असून त्या थ्रीजी डेटाची किंमत साधारणपणे तीन हजारांच्या आसपास असणार आहे. आणि तो मिळवायचा तर मॅग्ना एल किंवा मॅग्ना या दोनपैकी कोणता तरी एक स्मार्टफोन विकत घ्यावा लागेल. विदेशामध्ये अशा ऑफर्स देण्याची परंपरा आहे. आयडियानेही आता तोच मार्ग अनुसरला आहे.
आयडियाने बाजारात आणलेले हे दोन्ही स्मार्टफोन्स अँड्रॉइड किटकॅट या नव्या अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणारे आहेत. त्यापैकी मॅग्ना एल हा ४.५ इंची तर मॅग्ना हा ४ इंची स्मार्टफोन आहे. या ऑफरनुसार, २६१ रुपयांचे रिचार्ज केल्यानंतर हा १६ जीबीचा थ्रीजी डेटा मिळणार असून तो प्रत्येक महिन्याला ४ जीबी याप्रमाणे पुढील चार महिने मिळणार आहे. याशिवाय आयडिया टीव्हीदेखील चार महिने मोफत पाहायला मिळेल. प्रथमच स्मार्टफोन वापरणाऱ्या वर्गाला लक्ष्य ठरवून हे स्मार्टफोन बाजारात आणण्यात आले आहेत. आयडिया मॅग्ना एलमध्ये १.३ गिगाहर्टझ् क्वाड कोअर प्रोसेसर वापरण्यात आला असून त्यात एचडी रेकॉर्डिंग व व्हिडिओ स्ट्रीमिंगची सोयही देण्यात आली आहे. पाच मेगापिक्सेलचा कॅमेरा मागच्या बाजूस फ्लॅशसह देण्यात आला आहे. तर समोरच्या बाजूस व्हीजीए कॅमेरा देण्यात आला आहे. आयडियानेच या सोबत मोफत कव्हर दिले आहे.
आयडिया मॅग्ना हा १.३ गिगाहर्टझ्चा डय़ुएल कोअर प्रोसेसरवर चालणारा फोन असून त्याचा स्क्रीन ४ इंचाचा आहे. यालाही मागच्या बाजूस पाच मेगापिक्सेलचा कॅमेरा मागच्या बाजूस फ्लॅशसह देण्यात आला आहे. तर समोरच्या बाजूस व्हीजीए कॅमेरा देण्यात आला आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत –
मॅग्ना एल – रु. ६,२५०/-
मॅग्ना – रु. ४,९९९/-
डेस्कटॉपच्या क्षेत्रामध्ये आजही जगभरात मायक्रोसॉफ्टच्या विंडोज प्रणालीचा वापर सर्वाधिक केला जातो. तसाच सुरुवातीच्या काळात इंटरनेटसाठीही ब्राऊझरमध्ये इंटरनेट एक्स्प्लोररलाच सर्वाधिक महत्त्व होते. मात्र नंतरच्या काळात गुगलचे क्रोम आले. मात्र त्याही आधीपासून फ्री सॉफ्टवेअरची चळवळ सुरू झाली आणि त्या चळवळीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून फायरफॉक्स या फ्री सॉफ्टवेअर प्रणालीतील ब्राऊझरची निर्मिती करण्यात आली. आता त्यालाही जगभरात चांगला प्रतिसाद मिळतो आहे. खासकरून या ब्राऊझरमध्ये व्हायरस हल्ले फार कमी होत असल्याचे लक्षात आल्याने त्याचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढच अधिक झाली. आता या फ्री सॉफ्टवेअर चळवळीने सर्वाधिक वापर होत असलेल्या स्मार्टफोन्सकडे आपला मोहरा वळविला असून स्वस्तातील स्मार्टफोन सर्वाना उपलब्ध करून देण्याचा विडा उचलला आहे.
त्याची पहिली पायरी म्हणून काही महिन्यांपूर्वीच फायरफॉक्सने जगातील पहिला सर्वात स्वस्त असा स्मार्टफोन बाजारात आणला. आता स्पाइस या मोबाइल कंपनीने फायरफॉक्ससोबत करार केला असून तो सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतीयांना उपलब्ध करून दिला आहे. हा खऱ्या अर्थाने स्वस्तातील स्मार्टफोन असून त्याची किंमत केवळ रु. २,२९९ एवढी आहे. चांगल्यातील फीचर फोनसाठीही यापेक्षा अधिक पैसे मोजावे लागतात. त्यामुळेच फीचर फोन वापरणारा असा वर्ग ज्याला स्मार्टफोनच्या किंमती परवडत नाहीत, तो या स्मार्टफोनकडे वळेल, असा कंपनीचा होरा आहे. युरोप, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील १७ देशांमध्ये सध्या हा स्मार्टफोन कंपनीने उपलब्ध करून दिला आहे. फोन करण्याबरोबरच मेसेजेस, इ-मेल आदी बाबीही करणे यावरून सहज शक्य आहे. त्याचप्रमाणे यामध्ये मागच्या बाजूस २ मेगापिक्सेल तर समोरच्या बाजूस १.३ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा टूजी वर्गातील डय़ुएल सिम प्रकारात मोडणारा फोन आहे. त्यासाठी १ गिगाहर्टझ्चा प्रोसेसर वापरण्यात आला आहे. ८.८९ सेमी. चा स्क्रीन त्यासाठी देण्यात आला असून तो एचव्हीजीए क पॅसिटीव्ह टचस्क्रीन प्रकारात मोडणारा आहे. महत्त्वाचे म्हणजे यात काही भारतीय भाषांचाही समावेश असून त्यात हिंदी, तामिळ आदींचा समावेश आहे. याशिवाय फेसबुक, ट्विटर आदी सोशल नेटवर्किंग साईटस्चा वापरही सहजशक्य होणार आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत :
रु. २,२९९/-
स्वस्तातील स्मार्टफोन्सच्या ब्रॅण्डमध्ये मायक्रोमॅक्स कंपनी सर्वात अग्रेसर आहे. दिवाळीच्या निमित्ताने या कंपनीने आता मध्यमर्गाला परवडेल, असा कॅनव्हम्स मालिकेतील नवा फोन बाजारात आणला आहे. या मालिकेमध्ये यापूर्वी बाजारात आणलेल्या सर्व उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या नव्या स्मार्टफोनची खास वैशिष्टय़े
* डय़ुएल सिम
* आयपीएस डिस्प्ले, कपॅसिटिव्ह टचस्क्रीन
* रिझोल्युशन : ७२० १२८० पिक्सेल्स
* इंटर्नल मेमरी : ८ जीबी
* एक्स्टर्नल मेमरी : मायक्रोएसडी कार्डाद्वारे ३२ जीबीपर्यंत वाढविण्याची सोय
* रॅम : १ जीबी
* कनेक्टिव्हिटी : जीपीआरएस, एज, वायफाय हॉटस्पॉट, ब्लूटूथ, यूएसबी
* कॅमेरा : मागच्या बाजूस ८ मेगापिक्सेल (फ्लॅशसह)
* कॅमेऱ्याचे रिझोल्युशन : ३२६४ २४४८ पिक्सेल्स
* कॅमेऱ्याची वैशिष्टय़े : जिओटॅगिंग व पॅनोरमा
* समोरचा कॅमेरा : २ मेगापिक्सेल
* ऑपरेटिंग सिस्टिम : विंडोज ८.१
* प्रोसेसर : १.२ गिगाहर्टझ्, क्वाड कोअर,
कोर्टेक्स ए ७
* चिपसेट : क्वालकॉम एमएसएम८२१२
स्नॅपड्रॅगन २००
* बॅटरी क्षमता : लिथिअम आयन २००० एमएएच
ह्य़ुआवी या कंपनीनेही मध्यंतरीच्या काळात भारतात चांगलेच बस्तान बसवले. त्यांनीही खास दिवाळी निमित्ताने आता नवीन ऑनर सिक्स हा नवा स्मार्टफोन बाजारात आणत असल्याचे जाहीर केले आहे. हल्ली काही कंपन्यांनी आताऑनलाइन कंपन्यांसोबत करार केले असून त्यांचे स्मार्टफोन्स हे केवळ ऑनलाइन खरेदीसाठीच उपलब्धच आहेत. ह्य़ुआवीनेही आता फ्लिपकार्टवर आपला हा नवा स्मार्टफोन उपलब्ध असेल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर या नव्या स्मार्टफोनची वैशिष्टय़े पाहाता येतात..
या नव्या स्मार्टफोनची महत्त्वाची वैशिटय़ं
* आतापर्यंत डय़ुएल कोअर किंवा क्वाड कोअरपर्यंत अनेक स्मार्टफोन्सनी मजल मारली होती. हा नवा स्मार्टफोन ऑक्टाकोअर असेल. त्यासाठी हिसिलिकॉन कायलिन ९२० एसओसी चिप वापरण्यात आली आहे.
* कमीत कमी ऊर्जेचा वापर करून सर्वाधित क्षमतेने काम करण्यासाठी यामध्ये एक विशिष्ट असा बिल्टइन कोप्रोसेसरही बसविण्यात आला आहे.
* स्मार्टफोनचा स्क्रीन ५ इंचाचा असून तो फूलएचडी प्रकारात मोडणारा आहे. त्याची रिझोल्युशन क्षमता ४४५ पीपीआय एवढी असणार आहे.
* या स्क्रीनसाठी ओरखडे न उमटणारी कोर्निंग गोरिला ग्लास थ्री वापरण्यात आली आहे.
* हा ८०० मेगाहर्टझ् तरंगक्षमतेवर काम करणारा डय़ुएल चॅनल फोन असणार आहे.
* याची बॅटरी क्षमता तब्बल ३१०० एमएएचची असणार आहे. त्यामुळे बॅटरीचा वापर इतर फोनपेक्षा सुमारे ३० टक्क्य़ांनी कमी होईल म्हणजेच तेवढी बॅटरी अधिक वापरता येईल, असा कंपनीचा दावा आहे.
* मागच्या बाजूस १३ मेगापिक्सेल तर समोरच्या बाजूस ५ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. याच अतिवेगात फोटो टिपण्याची क्षमताही आहे, सहा सेकंदाला एक फोटो याप्रमाणे फोटो टिपला जातो.
(भारतीय बाजारपेठेतीस किंमत – मजकूर प्रसिद्धीस जाईपर्यंत उपलब्ध नव्हती. मात्र दिवाळीपूर्वी दीड आठवडा आधी स्मार्टफोन भारतीय बाजारात उपलब्ध असेल.)