मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटर सेवा विनामूल्य वापरली जाते. दरम्यान, ट्विटर लवकरच ट्विटर ब्लू ही नवीन सेवा सुरू करणार आहे. ही सशुल्क सदस्यता आधारित सेवा असेल, ज्यासाठी वापरकर्त्यांना दरमहा २.९९ डॉलर द्यावे लागतील. यापूर्वी ट्विटरने सशुल्क सदस्यता मॉडेल सादर करण्याविषयी स्पष्ट केले होते. शनिवारी अॅप संशोधक जेन मंचन वोंग यांनी ट्विटर ब्लू नावाचे ट्विटर पेड सबस्क्रिप्शन मॉडेल सादर केले. यात बुकमार्क संग्रह वैशिष्ट्य देखील जाहीर केले. या सेवेसाठी भारतात दरमहा 200 मोजोवे लागणार आहेत. ट्विटर ब्लू प्रथम अमेरिकेत लाँच केले जाईल. त्यानंतर ते इतर देशांमध्ये सुरू करण्याची तयारी करत आहे.
ट्विटर ब्लूमध्ये काय असेल खास
द व्हर्जच्या माहितीनुसार, ट्विटर ब्लू अनेक वैशिष्ट्यांचा संग्रह आहे. ही वैशिष्ट्ये ट्विटरच्या विनामूल्य आवृत्तीमध्ये उपलब्ध होणार नाहीत. त्या ट्विटला एडिट करण्याचा पर्यायही असेल, ज्याची मागणी बर्याच काळापासून केली जात होती. म्हणजे वापरकर्त्यांना कोणतेही ट्विट प्रकाशित झाल्यानंतर 5 ते 30 सेकंदात ते हटविण्याचा पर्याय असेल. तसेच ट्विटर ब्लू फीचरमध्ये वापरकर्त्यांना ट्विट सेव्ह करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. जेणेकरुन वापरकर्त्यांना ते नंतर शोधता येतील. सरळ शब्दात सांगायचे तर ट्विटर आपल्याला आपले ट्विट गोळा करण्याचा पर्याय देईल.
Twitter is calling their upcoming Subscription Service “Twitter Blue”, priced at $2.99/month for now, including paid features like:
Undo Tweets: https://t.co/CrqnzIPcOH
Collections: https://t.co/qfFfAXHp1o pic.twitter.com/yyMStpCkpr
— Jane Manchun Wong (@wongmjane) May 15, 2021
ट्विटर इतर अनेक वैशिष्ट्यांवर काम करत आहे. त्याअंतर्गत फोटो काढणे सुलभ केली जाईल. तसंच फोटोला डिस्प्ले व्ह्यू पर्यायही दिला जाऊ शकतो. तसेच कन्टेन्ट क्रिएटर्स, पत्रकार, तज्ञ, नॉन प्रॉफिट आर्गेनाइजेशन यांना देणगी देण्याची सुविधा असेल.