पाकिस्तानी अभिनेत्री झेबा बख्तियारने चार लग्नं केली आहेत. तिचे दोन पती भारतीय (जावेद जाफरी आणि अदनान सामी) आणि दोन पाकिस्तानी (सलमान गिलानी आणि सोहेल लगारी) होते. १९८२ मध्ये पहिलं लग्न झालं, पण ते फक्त ५ वर्षे टिकले. जावेद जाफरीशी १९८९ मध्ये लग्न केलं, पण दोन वर्षातच घटस्फोट झाला. अदनान सामीशी १९९३ मध्ये लग्न केलं, पण ४ वर्षांनी तेही संपलं. २००८ मध्ये तिने सोहेल लगारीशी चौथं लग्न केलं.