मुंबईत रवींद्र नाटय़मंदिरमध्ये नुकताच तेरावा थर्ड आय एशिअन फिल्म फेस्टिव्हल झाला. त्यात चिनी, इराणी, जपानी, हिंदी, मराठी अशा सगळ्या भाषांतले सिनेमे बघण्यासाठी चित्रपटप्रेमींनी गर्दी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रत्येकाला काही ना काही वेड असतं. कुणाला चित्र काढण्याचं, कुणाला वाचनाचं, कुणाला गाणी ऐकण्याचं, तर कुणाला लिखाणाचं. अशीच सिनेमात हरवणारी माणसं गेल्या आठवडय़ात दादरच्या रवींद्र नाटय़मंदिर येथे एकत्र जमली होती. निमित्त होतं, तेराव्या थर्ड आय ‘एशिअन फिल्म फेस्टिव्हल’चं. मुंबईकरांची नवीन वर्षांची सुरुवात वेगवेगळ्या भाषांमधल्या विविध विषयांवरील सिनेमांनी होत असते. नववर्षांच्या पहिल्याच दिवशी या सोहळ्याचं मोठय़ा दिमाखात उद्घाटन झालं. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर, महोत्सवाचे संचालक सुधीर नांदगावकर असे मान्यवर उपस्थित होते. केवळ आशियातले सिनेमे दाखवणारा ‘एशिअन फिल्म फेस्टिव्हल’ हा पहिला महोत्सव. २००२ साली सुरू झालेल्या या महोत्सवात ‘बारान’, ‘चिल्ड्रन्स ऑफ हेवन’ या दोन सिनेमांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या सिनेमांनंतर या महोत्सवाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळायला लागला. यंदा तेराव्या महोत्सवातही विविध भाषिक सिनेमांनी बाजी मारली.
मराठीत वेगळा प्रयोग केलेल्या ‘बायोस्कोप’ या बहुचर्चित सिनेमाने फेस्टिव्हलची सुरुवात झाली. चार कवींच्या वेगवेगळ्या कवितांवर आधारित चार शॉर्ट्सफिल्म्स या सिनेमात दाखवल्या आहेत. गजेंद्र अहिरे, विजू माने, गिरीश मोहिते, रवी जाधव अशा लोकप्रिय दिग्दर्शकांनी या सिनेमात दिग्दर्शन केलंय. गजेंद्र अहिरे यांचा ‘दिले-ए-नादान’, विजू माने यांचा ‘एक होता काऊ’, गिरीश मोहिते यांचा ‘बैल’ आणि रवी जाधव यांचा ‘मित्रा’ अशा सिनेमांचा ‘बायोस्कोप’मध्ये समावेश आहे. मराठीतल्या या पहिल्या वेगळ्या प्रयत्नाला रसिक प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला. चारही सिनेमे वेगळ्या धाटणीचे आणि कवितेवर बेतलेले असल्यामुळे हा नवा प्रयोग बघण्यास प्रेक्षक उत्सुक होते. ‘दिल-ए-नादान’मध्ये दोन ज्येष्ठ संगीतकारांना एक पत्र सापडतं. ते पत्र बऱ्याच दिवसांनंतर आल्यामुळे त्यातल्या मजकुराविषयी दोघेही उत्सुक आहेत; असं आहे. मध्यमवर्गीय घरातल्या एका मुलाचं एका सुंदर गोऱ्या मुलीवर प्रेम बसतं. त्यांची प्रेमकहाणी ‘एक होता काऊ’मध्ये दाखवली आहे. तर ‘बैल’मध्ये एका शेतकऱ्याचा गरिबीशी चालू असलेला संघर्ष दाखवला आहे. ‘मित्रा’च्या माध्यमातून दिग्दर्शक रवी जाधव यांनी समलैंगिक हा विषय हाताळला आहे. चारही सिनेमे विविध धाटणीचे असल्यामुळे सादरीकरण, अभिनय, कलाकार अशा सगळ्याच बाबतीत ‘बायोस्कोप’ हा सिनेमा प्रभावी ठरतो.

महोत्सवाचा दुसरा दिवस उजाडला आणि साखळीने विविध भाषिक सिनेमे सुरू झाले. यामध्ये चीन, साऊथ कोरिआ, जपान, फ्रान्स, इराण, इस्राएल, ओरिया, तामीळ, मल्याळम यांसह काही हिंदी-मराठी सिनेमेही दाखवले गेले. भाषा अनोळखी असली तरी सिनेमा कळण्यासाठी त्याबद्दलची आवड पुरेशी असते हे फेस्टिव्हलमध्ये आलेल्या प्रेक्षकांवरून समजत होतं. सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत सलग सात दिवस सुरू असणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये प्रेक्षकांना वेगवेगळ्या विषयांची मेजवानीच मिळाली होती. महोत्सवातल्या सिनेमांमध्ये खूप फरक होता. सिनेमाचा विषय, वेग, मांडणी, सादरीकरण, कथा, संवाद, दिग्दर्शन अशा सगळ्याच विभागांत प्रत्येक सिनेमा वेगळा वाटत होता. प्रेक्षकांना काही सिनेमा लांब वाटला, तर काहींना ठरावीक सिनेमांचा वेग प्रचंड आवडला. काहींना सिनेमाची मांडणी पटली नाही, तर काहींना कथेत मजा होती, पण काहीतरी चुकलंय असं वाटत होतं. त्यामुळे सिनेमांमधलं वैविध्य मोठय़ा प्रमाणावर या महोत्सवात दिसत होतं.
‘डिसेंबर वन’ या कन्नड सिनेमाने प्रेक्षकांची प्रचंड वाहवा मिळवली. सवरेत्कृष्ट वैशिष्टय़पूर्ण कन्नड चित्रपट (बेस्ट फीचर कन्नड फिल्म)यासाठी ६१ वा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या या सिनेमाने एशिअन फिल्म फेस्टिव्हलमध्येही बाजी मारली. पिठाची गिरणी चालवणारा मादवप्पा, त्याची भाकऱ्या करून विकणारी बायको, देवक्का, त्यांची मुलं असं हे छोटं आणि समाधानी कुटुंब. १ डिसेंबरला त्यांच्या गावाला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री येतात. त्या वेळी मादवप्प्याच्या घरी राहण्याचा त्यांचा कार्यक्रम असतो. मुख्यमंत्री एखाद्याच्या घरी राहणार म्हणजे त्या व्यक्तीची प्रतिमा उंचावते. तसंच मादवप्प्याचंही होतं. पण, वास्तविक होतं काही वेगळंच. गावातल्या एका गिरणी चालवणाऱ्याकडे मुख्यमंत्री येऊन राहणार म्हणून मादवप्पाला समाजात मान मिळतो. मुख्यमंत्री राहायला येतात त्या वेळीही मादवप्पाच्या कुटुंबीयांना विशेष वागणूक मिळते. पण, मुख्यमंत्री एक दिवस राहून गेल्यानंतर मात्र बहुमान देणारा समाजच त्यांचा अपमान करतो. याचं कारण सुरुवातीला त्याच्या कुटुंबीयांनाही कळत नाही. हळूहळू गोष्टी उलगडू लागतात. मग त्यांना जाणीव होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी एक दिवस मादवप्पाकडे मुक्काम केलेला असतो. या घटनेने ते खचून जातात. पण, देवक्का ठाम उभी राहते. कोणत्याही प्रकारचं वाईट कृत्य केलं नसून त्यांच्यावर आलेल्या परिस्थितीशी झगडायचं ठरवते. त्यांच्या शाळकरी मुलालाही मंत्री घरी राहायला येणार म्हणून मिळालेली वागणूक आणि त्यानंतर मिळणारी वागणूक यातली तफावत दिग्दर्शक पी. शेशाद्री यांनी उत्तम रेखाटली आहे. या सिनेमाने प्रेक्षकांना गुंतवून ठेवलं. महोत्सवात प्रेक्षकांना आवडलेल्या सिनेमांपैकी हा एक सिनेमा होता. म्हणूनच हा सिनेमा पुन्हा दाखवण्याची प्रेक्षकांनी मागणी केली. आयोजकांनीही प्रेक्षकांच्या विनंतीचा मान राखून हा सिनेमा पुन्हा दाखवला. खूप साध्या विषयाच्या उत्तम सादरीकरणामुळे हा सिनेमा लक्षात राहिला आहे.
‘डिसेंबर वन’ या सिनेमासोबतच मागणी होती ती ‘सुपर टायफून’ या चिनी सिनेमाची. काही सिनेमांचा वेग जलदच असावा लागतो. कारण कथेची तशी मागणी असते. हेच या सिनेमाचे दिग्दर्शक फेंग क्सिऑनिंग (Feng Xiaoning) यांनी नेमकं हेरलं आहे. चीन देशात येणारं वादळ, त्याला सामोरं जाण्यासाठीचं प्रत्येकाचं धाडस, त्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन, एकमेकांना वाचवण्याची धडपड अशा सगळ्याच गोष्टी पडद्यावर दाखवण्यासाठी सिनेमा वेगवान असणं आवश्यक होतं. ते दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. ‘ब्ल्यू व्हेल’ नावाचं भयानक वादळ चीनच्या दक्षिण किनाऱ्यावर येत आहे. या वादळाचा सामना करण्यासाठी शहराचा मेयर यासाठी प्रयत्न करतोय. एकीकडे वादळामुळे होणारी शहराची हानी आणि दुसरीकडे वादळामुळे स्थायिकांना असलेला धोका अशा दोन्हीकडे मेयरचं लक्ष आहे. पण, नागरिकांचे प्राण कसे वाचतील यासाठी तो अधिक प्रयत्नशील आहे. एक माणूस एका बेटावर असलेल्या त्याच्या गर्भवती बायकोकडे कसा पोहोचेल या विचाराने त्रस्त आहे, राजकीय नेता याच वादळाच्या दरम्यान मुलीच्या लग्नाची तयारी करतोय हे बघून मेयरने त्याला त्याच्या पदावरून काढून टाकलंय, हे वादळ शूट करण्यासाठी आलेला एक परदेशी फोटोग्राफर या वादळाचे फोटो काढायला मिळणार म्हणून खूश आहे, एका चोराला या वादळाची चिंता नाही कारण तो त्याच्या चोरी करण्याच्या कामात मश्गूल आहे. अशा वेगवेगळ्या परिस्थितीत असलेली लोकं शेवटी नकळतपणे एकत्र येऊन या वादळाचा सामना करतात. सिनेमाला प्रचंड वेग असला तरी प्रेक्षक कुठेही हरवत नाही. एखादं मिशन पूर्ण करण्याची कथा असो किंवा विशिष्ट गोष्टीचा शोध घेणारी कथा असो अशामध्ये घटना एकामागे एक वेगाने घडल्या तरच त्या सिनेमात रंग चढतो आणि प्रेक्षकही त्यात गुंततो. तसंच काहीसं या सिनेमाचं झालं. म्हणूनच हा सिनेमा प्रेक्षकांनी एन्जॉय केला.
महोत्सवामध्ये विषयांमध्ये इराणी सिनेमांनीही बाजी मारली असं म्हणता येईल. ‘श्शऽऽ.. गर्ल्स डोंट स्क्रिम’, ‘अ फाइव्ह स्टार’, ‘अ क्रॅडल फॉर मदर’, ‘ट्रॅप्ड’ या इराणी सिनेमांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. याचे दिग्दर्शक अनुक्रमे पी. डेराखशंदेह, महशिद अफशर्झादेह, पी. रेझाई आणि परविज शाहबाजी यांनी कमाल केली आहे. फेस्टिव्हलमध्ये दाखवले जाणारे इराणी सिनेमे हे नेहमीच चर्चेचा विषय असतात. इतर महोत्सवांप्रमाणे याही महोत्सवात इराणी सिनेमांबाबत चर्चा होतीच. या सिनेमांचे विषय नवे नव्हते. तरी त्यांच्या साधेपणामुळे प्रेक्षकांना ते बघावेसे वाटले. कलाकारांचा अभिनय, दिग्दर्शन, मोजके संवाद अशा गोष्टींमुळे इराणी सिनेमे भुरळ घालतात. अशा प्रकारची चर्चा प्रेक्षकांमध्ये सिनेमा झाल्यावर रंगत होती. ‘..डोंट स्क्रिम’मध्ये लहान मुलांचे लैंगिक शोषण हा विषय दाखवला आहे. सिनेमा फ्लॅशबॅकमध्ये आहे. लहान मुलीवर झालेले परिणाम, त्यामुळे तिच्या वागणुकीतले बदल हे चित्रपटात रेखाटलं आहे. समाजात हा विषय वारंवार अनेक माध्यमांतून पुढे येतो. पण, यातल्या कथेमुळे तो प्रभावी वाटतो. ‘अ फाइव्ह स्टार’मध्ये परिस्थितीमुळे एका मुलीला फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये नोकरी करावी लागते. इतर क्षेत्रांप्रमाणेच हॉटेलिंग क्षेत्रातही राजकारण आहे. ते कोणत्या पातळीवर जाऊ शकतं, अखेरीस त्याला बळी कोण पडतं यावर भाष्य केलं आहे. ‘ट्रॅप्ड’ यामध्ये सहर नावाची मुलगी परदेशी स्थायिक होण्यासाठी पैसे आणते. पण, चुकीच्या मार्गाने ते पैसे आणल्यामुळे ती पकडली जाते. तिला सोडवण्यासाठी तिच्यासोबत राहत असलेली नाझनीन तिला सोडवण्याचा प्रयत्न करते. नाझनीन आणि सहर यांची ओळख खरंतर काही दिवसांपूर्वीच झालेली असते. सहरचा मोठा मित्रपरिवार त्याच शहरात राहत असतो. पण, अडचणीच्या वेळी मात्र एकही मित्र किंवा मैत्रीण तिला मदत करत नाही. मैत्रीचा वेगळा पैलू या सिनेमात दाखवला आहे. मैत्रीवर बेतलेले सिनेमे याआधी विविध भाषांतून आले आहेत. तरी ‘ट्रॅप्ड’ हा सिनेमाही लक्षात राहतो. ‘अ क्रॅडल फॉर मदर’ यामध्ये नायिका, नरगीस अत्यंत हुशार विद्यार्थिनी आहे. मॉस्को विद्यापीठाची रशियन साहित्यातली पदवीधर नरगीस धर्मशास्त्राचा अभ्यास करते आहे. इस्लामचा स्वीकार केलेल्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी तिला पुन्हा रशियात जायचे आहे. पण, घरी आजारी वृद्ध आई एकटीच असल्यामुळे तिला सोडून जावं की नाही या कात्रीत ती सापडली आहे. इराणी सिनेमा हे भावनिकदृष्टय़ा प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.
दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव आमरापुरकर यांना आदरांजली म्हणून दिग्दर्शक गोविंद निहलानी यांचा ‘अर्धसत्य’ या गाजलेल्या सिनेमाचाही महोत्सवात समावेश होता. आमरापुरकर आणि ओम पुरी यांच्यातलं द्वंद्व सिनेमाभर प्रेक्षकांना खिळवून ठेवतं. सिनेमाला तीस र्वष होऊन गेली असली तरी आजही हा सिनेमा बघावासा वाटतो. म्हणूनच या चित्रपटाच्या महोत्सवातल्या स्क्रीनिंगला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद होता. ‘एक हजाराची नोट’ याही सिनेमाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्पेशल ज्युरी आणि सेंटेनरी अशा पुरस्कारांचा मानकरी ठरलेला हा सिनेमा. श्रीहरी साठे या नवोदित दिग्दर्शकाच्या पहिल्याच सिनेमाला प्रेक्षक आणि इंडस्ट्रीतून वाहवा मिळाली. विदर्भातल्या शेतकऱ्यांची आत्महत्या हा एक गंभीर विषय आहे. सध्या राजकीय वर्तुळात याबाबत अनेकदा चर्चासत्रही केले जाते. याच अनुषंगाचा विषय सिनेमात दिसतो. आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या आईला विदर्भातल्या निवडणूक प्रचार दौऱ्यात एक नेता हजाराची नोट देतो. आणि तिथून घटनाचक्राला सुरुवात होते. या सिनेमाने महोत्सवात ‘सेंटर पीस’ची जागा पटकावली. ‘छोटी मोटी बातें’ या सिनेमाला मात्र प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद होता. ही कथा दोन बहिणींची. दोन बहिणी आणि त्यांचे वडील असे तिघं त्या घरात राहतात. वडिलांच्या मृत्यूनंतर दोघी बहिणी घरात स्वत:ला कोंडून घेतात. बालपणीच्या आठवणी, मनातल्या काही गोष्टी, आजूबाजूचं निरीक्षण, त्यांच्या दुनियेत सुखी असण्याची कारणं, बिनधास्तपणा असं सारं त्यांच्या संवाद, अभिनयातून चांगलं रंगवलं आहे. सिनेमाचा वेग संथ असल्यामुळे काही प्रेक्षकांना मात्र तो फारसा पसंतीस पडला नाही. तसंच काही प्रसंगांमध्ये तोचतोचपणा आढळल्याने शेवटाकडे सिनेमा कंटाळवाणाही वाटू लागला. दिग्दर्शक अनंत महादेवन यांच्या ‘गौर हरि दास्तां’ या सिनेमाने महोत्सवाचा समारोप करण्यात आला. स्वत: अनंत महादेवन या सिनेमाच्या स्क्रीनिंगच्या वेळी उपस्थित होते. हा सिनेमा बघण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. एका स्वातंत्र्यसैनिकाची कथा यामध्ये आहे. स्वातंत्र्यसैनिकाचं प्रमाणपत्र दिल्यासच गौर हरि दास या स्वातंत्र्यसैनिकाच्या मुलाला शिक्षणसंस्थेत प्रवेश दिला जाईल असं सांगण्यात येतं. पण, तो ओरिसातून स्वातंत्र्यलढा लढला असल्यामुळे त्याला प्रमाणपत्र देण्यास नकार दिला जातो. याबाबतच त्याचा संघर्ष सिनेमात दिसतो.
हिंदी, मराठी, इराणी चित्रपटांसह जपानी, चिनी, सारुथ कोरियन या सिनेमांनाही उत्तम प्रतिसाद होता. फेस्टिव्हल म्हटलं की गंभीर विषयांचे गंभीर मांडणीने केलेल्या सिनेमांचा समावेश असणार असा सर्वसाधारणपणे समज असतो. पण, त्याला छेद दिला तो महोत्सवातल्या काही जपानी सिनेमांनी. ‘रेंट अ कॅट’ आणि ‘टग ऑफ वॉर’ या जपानी सिनेमांचं भरपूर कौतुक झालं. ‘रेंट अ कॅट’ या सिनेमाचा विषय फार सुंदर आहे. एकटेपणामुळे कंटाळलेल्या लोकांना सोबत म्हणून मांजर भाडय़ाने देण्याचा अनोखा व्यवसाय सिनेमाची नायिका करते. एकटेपणा घालवण्यासाठी मांजरीची सोबत चांगली, अशी जाहिरात करत ती हा व्यवसाय चालवतेय. मांजर भाडय़ाने देताना ज्याला द्यायचं आहे त्याच्या घराची पाहणी करायला ती जाते, एका करारपत्रावर सहीसुद्धा घेते. अशा प्रकारे ती हा व्यवसाय चालवते. पण, इतरांचा एकटेपणा घालवताना ती स्वत:सुद्धा एकटी आहे आणि तिच्या घरीही ती एकटीच असून सोबतीला अनेक मांजरी आहेत असं दाखवलंय. काही ठिकाणी विनोदी संवादांनी मजा आणली आहे. असंच काहीसं ‘टग ऑफ वॉर’ या सिनेमाचं. या सिनेमातल्या नायिकेच्या आईची नोकरी जाण्याच्या बेतात आहे. ती वाचवण्यासाठी ‘टग ऑफ वॉर’ या स्पर्धेत जिंकावं लागणार आहे. तिच्या आईसोबत तिच्या काही मैत्रिणीही आहेत. त्या सगळ्यांची टीम बनवण्याचे अवघड काम नायिकेच्या हातात आहे. ही टीम तयार करताना अनेक अडचणी येतात. प्रत्येकीचा टीम बनवतानाचा संघर्ष आणि वैयक्तिक आयुष्यातला संघर्ष समांतर रेषेत दाखवला आहे. संपूर्ण सिनेमा प्रेक्षकांना हसवतो. छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधून चांगली विनोदनिर्मिती केली आहे.
‘क्लोज टू द सन’ आणि ‘कॅमल कॉलर’ या चिनी चित्रपटांचे विषयही आवडले. आजाराला कंटाळलेल्या, नैराश्यात गेलेली नायिका बेशुद्ध अवस्थेत एका लहान मुलीला एका गावात सापडते. शुद्धीवर आल्यावर गावातल्या लोकांसोबत वावरताना तिला ती जागा आवडू लागते. पण, तिचा आजार काही बरा होत नाही. शेवटी तो बरा करण्यासाठी गावातले लोक आटोकाट प्रयत्न करतात. कमी दिवसांची ओळख असूनही माणुसकीची भावना ‘क्लोज टू द सन’ या सिनेमात दाखवली आहे. ‘कॅमल कॉलर’ या सिनेमातही भावनिक विषय हाताळला आहे. स्वत:च्याच नवऱ्याला मारलेल्या महिलेची वीस वर्षांनी तुरुंगातून सुटका होते. पण, तुरुंगातून सुटका झाल्यानंतर ती आपल्या मुलीला भेटण्याचा प्रयत्न करते. पण, तिची मुलगी तिला ओळखत नाही. दरम्यान सिनेमाची नायिका एका दाम्पत्याकडे उंटांची देखभाल घेण्याचं काम करतं. तिथे खेळायला येणाऱ्या लहान मुलांपैकी एकाशी तिचं घट्ट नातं निर्माण होतं. कालांतराने ती तिच्या मुलीला पुन्हा भेटण्याचं थांबवते. आणि त्या मुलासोबत राहण्याचा निर्णय घेते. ‘हेल्पलेस’ आणि ‘डोंट क्लिक’ या साउथ कोरिअन चित्रपटांनीही प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. विशिष्ट प्रकाराची मांडणी हे साउथ कोरिअन सिनेमांचं वैशिष्टय़ म्हणता येईल. कारण हे दोन्ही सिनेमे वेगळ्या पद्धतीने सादर केले आहेत. सिनेमाच्या मधेच फ्लॅशबॅक, सद्यस्थिती, इफेक्ट्स अशा गोष्टींसह सिनेमा पुढे सरकतो. तसंच यामुळे सिनेमाचा वेगही जलद होतो. दोन्ही सिनेमे रहस्यपट आहेत. ‘हेल्पलेस’ सिनेमात नायकाची गर्लफ्रेंड एक दिवस गायब होते. तिचा शोध घेताना त्याच्या हाती एकेक गोष्टी लागत जातात आणि तिचं खरं रूप त्याच्यासमोर येतं. ‘डोंट क्लिक’ दोन बहिणींची कहाणी आहे. त्यातली एक मस्तीखोर आणि दुसरी गंभीर. धाकटय़ा मस्तीखोर बहिणीला वेगवेगळ्या व्हिडीओ क्लिप्स बघण्याची हौस असते. काही अपलोड करण्याचेही तिचे आणि तिच्या मैत्रिणींचे उद्योग असतात. अशातच तिच्या हाती अशी एक व्हिडीओ क्लिप लागते जी बघितल्यामुळे तिच्या आयुष्यावर भयानक परिणाम होतो. त्यातून मार्ग काढण्यासाठी तिची मोठी बहीण प्रयत्न करते.
संपूर्ण महोत्सव रवींद्र नाटय़मंदिरच्या पु. ल. अकादमी मिनी थिएटरमध्ये आयोजित केला होता. काही कारणांमुळे शनिवार आणि रविवार या दोन दिवशी सिनेमे आर्ट गॅलरीमध्ये दाखवले जात होते. आयोजकांनी तिथे प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था केली होती. पण थिएटरसारखी व्यवस्था नसल्यामुळे मागे बसणाऱ्या प्रेक्षकांना काहीशी अडचण होत होती. याबाबत काही प्रेक्षक नाराज झालेही. ती नाराजी सिनेमाचा आनंद घेता येऊ शकत नसल्यामुळेच होती हेही स्वाभाविक होतं, पण सिनेमाच्या प्रेमापुढे त्यांची नाराजी मागे सरली. थोडक्यात काय, तर चित्रपट कुठे दाखवता, कसा दाखवता यावरून चित्रपटावरचं प्रेम ठरत नाही. त्याचा आनंद घेता आला पाहिजे, जो महोत्सवात आलेल्या प्रेक्षकांनी घेतला. केवळ आनंदच घेतला नाही तर एखादा सिनेमा आवडला नसल्यास त्याबाबत त्यांनी उघडपणे चर्चाही केली. या चर्चेतला ‘द केज’ हा एक बंगाली सिनेमा. सिनेमाची कथा चांगली होती; पण मांडणीतला तोचतोचपणा, विनाकारण वाढलेली सिनेमाची लांबी, पुढे काय घडणार याबाबत येणारा अंदाज या सगळ्याबाबत हा सिनेमा कंटाळवाणा वाटू लागतो. यामुळे सिनेमात दाखवलेला एखादा गंभीर प्रसंग असला तरी त्याला हशा मिळत होता. एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये मोठय़ा हुद्दय़ावर असलेली एक मुलगी एका तरुणीला काही गुंडांपासून वाचवते. त्या मुलीला नायिका तिच्या घरी घेऊन जाते. ते गुंड तिच्या मागावर असतात. या सगळ्याचा परिणाम तिच्या व्यक्तिगत आयुष्यावर होतो. मांडणीही आकर्षक वाटत नाही. ‘ऑथेल्लो’ या आसामी सिनेमाचंही तसंच झालं. यातली मुख्य घटना मध्यंतरानंतर घडते. त्यामुळे सिनेमा पकड घेत नाही. मध्यंतरापर्यंतचा वेळ सगळ्या व्यक्तिरेखा प्रस्थापित करण्यासाठी आणि त्या एकमेकांत कशा गुंफल्या आहेत हे दाखवण्यात वेळ गेलाय. त्यामुळे सिनेमाचा मुख्य टप्पा आटोपशीर घेतला म्हणून सिनेमा प्रेक्षकांना कंटाळवाणा वाटू लागला. ‘हनी पुपू’ या तैवान सिनेमाच्या बाबतीतही असंच झालं. सिनेमातल्या नायिकेचा बॉयफ्रेंड हरवतो आणि ती त्याचा शोध त्यानेच तयार केलेल्या मिसिंग डॉट कॉम या साइटवर घेते. त्या वेळी तिथे तिला इतर काही हरवलेली माणसंही भेटतात. हा सिनेमा बघताना प्रेक्षकांचा नापसंतीचा सूर होता. पुष्पेंद्र सिंग यांचा ‘लाजवंती’ हा चित्रपट तांत्रिक कारणांमुळे दाखवण्याचं रद्द केल्याबाबत प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू होती.
एकुणात, यंदाचा महोत्सव दरवर्षीप्रमाणेच विविधतेने रंगला. वेगवेगळ्या भाषांमधल्या सिनेमांनी महोत्सवात प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. प्रेक्षकही जे सिनेमे आवडले त्यांचे कौतुक आणि जे नाही आवडले त्याबाबत नाराजी स्पष्टपणे व्यक्त करत होते. रवींद्र नाटय़मंदिराच्या आवारात आवडलेल्या सिनेमांवर चर्चा होतच होती, पण न आवडलेल्या सिनेमांवरही प्रतिक्रिया, चर्चा, मतभेद सुरू होते. पण सिनेमांचे विषय, कथा, मांडणी, सादरीकरण, अभिनय अशा सगळ्यामुळे तेरावा थर्ड आय एशिअन फिल्म फेस्टिव्हल वैविध्यपूर्ण ठरला आहे.
चैताली जोशी