सिद्धार्थ खांडेकर – response.lokprabha@expressindia.com
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये शेवटच्या दिवशी भालाफेकीत नीरज चोप्रा आणि कुस्तीमध्ये बजरंग पुनिया यांनी पदके जिंकली नसती, तर लंडनमधील सर्वोत्तम कामगिरीची पुनरावृत्ती करणे किंवा ती ओलांडणे जवळपास अशक्यच होते. नीरज चोप्राने बरेचसे अपेक्षित असे सुवर्णपदक अॅथलेटिक्समध्ये आणि तेही फील्ड प्रकारात जिंकले, त्याच्या जरा आधी बजरंगने कांस्यपदकाची लढत जिंकली. त्यात झालेल्या जल्लोषात आपला पदकांचा आकडा अवघा सात(च) राहिला याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या जल्लोषाला हॉकीतील बऱ्याचशा अनपेक्षित कांस्यपदकाची काहीशी भावनोत्कट किनारही आहे. खाशाबा जाधवांचे १९५२ मधील कुस्तीतले अत्यंत कौतुकास्पद कांस्यपदक वगळल्यास वैयक्तिक पदकासाठी आपल्याला १९९६ पर्यंत वाट पाहावी लागली. सन १९०० मध्ये पॅरिस येथे नॉर्मन प्रीचार्ड यांनी भारताच्या वतीने ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक (दोन रौप्यपदके अॅथलेटिक्समध्ये) जिंकले असे म्हटले जाते. याविषयी वाद आहे. कारण आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स संघटनेच्या नोंदीनुसार प्रीचार्ड यांनी त्या स्पर्धेत ब्रिटनचे प्रतिनिधित्व केले होते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या मते मात्र प्रीचार्ड हे भारताकडून स्पर्धेत उतरले. गंमत म्हणजे, ज्या ऑलिम्पिकमध्ये आपण पहिल्यांदाच एक संघ म्हणून उतरलो, ते होते १९२० मधील अँटवर्प ऑलिम्पिक!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा