शाळेत भूगोलमध्ये स्वित्झर्लंड हे जगाचे नंदनवन आहे असा उल्लेख असायचा. तेव्हापासून मी मनाशी स्वित्झर्लंडला जाण्याचं स्वप्न जपलं होतं. त्यातच हा सर्वात सुखी माणसांचा देश आहे असाही अलीकडेच प्रसिद्ध झालाय. माझं स्वप्न मला खुणावू लागलं. मी स्वित्र्झलडला जायचा मनसुबा जाहीर केला. बरोबर यायला कोणाला वेळ नव्हता. अखेरीस माझी नात जी स्वीस बँकेतच इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम करत होती, ती तयार झाली. पण डॉक्टरांकडे जा व त्यांनी म्हटलं तरच जाऊ, ही अट घातली.

स्वित्झर्लंडचा व्हिसा मिळण्यासाठी लागणारे सर्व सोपस्कार पार पडले. गंमत म्हणजे जर नवरा-बायको बरोबर जाणार नसतील तर न जाणाऱ्याचे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी समोर करावे लागते.

Marathi Actress Vishakha Subhedar wrote a special post for son abhinay subhedar birthday
अभिनेत्री विशाखा सुभेदारने लेकाच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिली खास पोस्ट, म्हणाली, “जे शिकायला परदेशी गेलायस…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
adventure tourism in india
सफरनामा : साहसी पर्यटन!
Nagpur Kolkata bomb threat
आकाशात झेपावलेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन अन्…
Revanth Reddy Express Adda
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी एक्स्प्रेस अड्डावर, पाहा मुलाखत लाईव्ह
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
Sun Planet Transit In Scorpio
५ दिवसांनंतर सुर्य करणार मंगळाच्या घरात प्रवेश, या राशींचे सुरु होणार चांगले दिवस, प्रत्येक कामात मिळणार यश!

आता बॅग भरणे. भरपूर थंडी आहे. तेव्हा गरम कपडे घ्या सांगणारे, प्रेमळ संदेश व्हॉटस् अ‍ॅपवर आले. अर्धी बॅग तर गरम कपडय़ांनीच भरली. जे संपूर्ण प्रवासात एकदाही लागले नाहीत. लेकीला भारतातून पाहिजे असलेल्या वस्तूंची लांबलचक लिस्ट आली. त्यातल्या शक्य तेवढय़ा घेतल्या व उरलेल्या जागेत कपडे.

तिथलं चलन स्वीस फ्रॅक्स पण डॉलर्स्ही तिथे चालतात. सर्व महाग असल्यानं काहीही खरेदी न करण्याचं ठरवलं होतं. तरी पैसे हवेतच. डॉलर्सच घेतले.

सर्व करून तीन जूनला दुबईमार्गे प्रस्थान ठेवलं. नात अमेरिकेतून परस्पर झुरिचलाच येणार होती. प्रवास यात्रा कंपनीबरोबरच होता. विमान झुरिचला उतरताना झालेलं स्वित्र्झलडचं दर्शन! आपल्याकडे पहिला पाऊस पडल्यावर माळरानावर हिरवेगार गवत उगवतं तशी हिरवी कुरणं दिसत होती.

इथून पुढचा प्रवास बसनं होता. आता आम्ही ल्युसर्नला निघालो. ल्युसर्नकडे जाताना वाटेत ऱ्हाईन नदीवरील Sehaffhausen Nauraiyen येथील धबधबा पाहिला. फार उंचावरून कोसळत नसला तरी पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळं खाली कोसळणारं पांढरं फेसाळ पाणी व त्याचे अंगावर उडणारे तुषार मन प्रसन्न करतं. हा धबधबा जवळून पाहाता यावा यासाठी बोट राइडपण आहे. बोट राइड घेऊन बसकडे जाताना आश्चर्याचा धक्काच बसला. चक्क रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलमध्ये गरम गरम वडापाव आणि मसाला चहा मिळत होता. एक भारतीय गृहस्थ हा स्टॉल चालवत होते. झुरिच लेक बघून एंजलबर्ग येथे आम्ही मुक्कामासाठी टेरेस या हॉटेलवर गेलो. आम्हाला पाचव्या मजल्यावरील रूम मिळाली होती. फ्रेश होऊन जेवून वर खोलीत गेल्यावर गरमी आहे, उकडतंय याची जाणीव झाली. रिसेप्शनला चौकशी केल्यावर सांगितले की स्वीस गव्हर्न्मेंटने उन्हाळा चालू झाला असे अजून जाहीर केले नसल्याने एसी चालू करता येत नाही. हा नियम संपूर्ण देशामध्ये कसोशीने पाळला जातो. गरम होत असल्याने आम्ही खिडकी उघडून टाकली व झोपलो.

सकाळी पडदा बाजूला करून बाहेर नजर टाकली आणि आहाऽऽऽहा  डोळ्यांचे पारणे फिटणारे दृश्य होते. बर्फाच्छादित डोंगर रांगा त्यावर पडलेले कोवळे ऊन, त्यावर तरंगणारे ढग. पायथ्याशी हिरवेगार कुरण, बाजूला कोवळ्या पिवळ्या उन्हात चमकणारे झाडांचे शेंडे. व्वा! बाहेर वाकून हात जरा बाहेर काढला तर डोंगराला हात लागेल इतके जवळ वाटत होते ते डोंगर.

आज माऊंट टिटलिस्ला जाणार होतो. रोटेर टीटीज (Rotair Tittis) म्हणजेच रिव्हॉलव्हिंग केबलने माऊंट टिटलिस्च्या शिखरावर गेलो. या केबल कारची केबिन सर्व बाजूंनी पारदर्शक काचेची असून स्वत: भोवती सावकाश फिरत असल्यामुळे आपण चहूबाजूचा नजरा पाहू शकतो. वर बऱ्याच राइडस आहेत, शिवाय दुकानेही आहेत. आम्ही फक्त विंडो शॉपिंग केलं. राइड मात्र सर्व घेतल्या. वय विसरून नातीबरोबर व सहप्रवाशांबरोबर सर्व मस्त एन्जॉय केलं.

दुपारी शहरातच फेरफटका मारला. स्वीसचा राष्ट्रीय प्रतीक असलेलं सिंहाचं चित्र एका बागेतल्या खडकावर खोदलंय. याची अशी आख्यायिका आहे की, राजानं एका प्रसिद्ध शिल्पकाराला हे काम देऊन बक्षीस म्हणून मोठी रक्कम देण्याचे कबूल केलं. मात्र काम झाल्यावर पैसे देण्याचं नाकारलं म्हणून त्या शिल्पकारानं सिंहाच्या प्रतिमेला डुकराचे कान खोदले. ही बाग मला खूप दुर्लक्षित वाटली. कदाचित आदल्याच आठवडय़ात खूप बर्फ पडल्यानं झाडं मलूल झाली असतील. शहराच्या मधे एक मोठं तळं आहे. त्याच्या आजूबाजूला दुकानं, ऑफिसेस व हॉटेल्स आहेत. सर्व दुकानं बरोबर पाच वाजता बंद होतात. रस्त्यावर हॉकर्स, फेरीवाले कुठेही नाहीत.

दुसऱ्या दिवशी आम्ही आप्स पर्वताचे सर्वात उंच शिखर जुंगफ्रॅजोच (Jungfraujoch) ला गेलो. हे युरोपमधील सर्वात उंच शिखर. जवळजवळ चार हजार फुट उंचीवर गेलो. तेथे  रेल्वेनं जाण्यासाठी कॉगव्हील ट्रेन (Cogwheel Train ) घ्यावी लागते. माथेरानला जशी छोटी ट्रेन असते तशीच, पण दोन रुळांमध्ये एक चेन असते. ती ट्रेनच्या डब्याच्या खालच्या बाजूला असलेल्या दात्यामध्ये अडकते व चढावावर ट्रेन खाली येत नाही. जुंगफ्रॅजोच (Jungfraujoch)  हे युरोपमधील सर्वात उंच रेल्वे स्टेशन आहे. तिथे आइस पॅलेस असून त्यात बर्फाची शिल्पे आहेत तसंच स्फिंक्स टेरेस  (Sphnix Terrace) आहे. तिथून सर्व बाजूचा देखावा पाहाता येतो.

स्वित्र्झलडची राजधानी असलेल्या बर्नमध्ये चालत फिरलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच इमारती असून मधे मोठय़ा झाडाच्या फुलांच्या कुंडय़ा आहेत. याच रस्त्यावर आइनस्टाइनचे घर आहे. पण स्मारक वगैरे काही नाही. पुढे नक्षत्राप्रमाणे चालणारे घडय़ाळ. पार्लमेंट हाऊस व प्रसिद्ध स्वीस बँक पाहिली. या बँकेच्या प्रशस्त इमारती सर्व शहरात आहेत. पार्लमेंट हाऊस व ही बँक यांच्यामध्ये मोठा चौक वगैरेसारखे ग्राऊंड आहे. पण कोठेही भिंत, गार्डस, पोलीस किंवा वॉचमन नाहीत. खरंतर कुठेच पोलीस दिसले नाहीत.

नंतर लावसेन (Laussane) हे स्वित्र्झलडमध्ये महत्त्वाचे शहर आहे. तिथे जगातील सर्व मल्टी नॅशनल कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. लावसेन (Laussane)ला जाताना वाटेत नेसले चॉकलेट फॅक्टरी पाहिली. तिचा १८९८ पासूनचा इतिहास मनोरंजकरीत्या सांगितला आहे. तसेच चीज फॅक्टरीला पण भेट दिली. फॅक्टरी बघून निघायच्या आधी माझ्याकडचे पाणी संपल्याचे लक्षात आले. पिण्याचं पाणी कुठं मिळेल अशी चौकशी केली असता (Rest Room / Toilet) स्वच्छतागृहाच्या  नळाचे पाणी पिऊ शकता असे सांगितले गेले.

वेव्हेरी (Vevery) या गावी गाइडबरोबर चालतच फिरलो. बोलता बोलता गाइडनं रवींद्रनाथ टागोर येथे येत असत असे सांगितलं, पण त्यांच्याविषयी तिला काहीच माहिती नव्हती. तसेच होळकर महाराजा, इंदौर व गायकवाड महाराजा, बडोदा यांनी बांधलेल्या बिल्डिंग्ज पण दाखवल्या. त्यापैकी होळकरांच्या इमारतीमध्ये आता शाळा असून त्यांनी स्वत:साठी सर्वात वरचा मजला राखून ठेवला आहे. प्रसिद्ध विनोदी नट चार्ली चॅपलिन हेसुद्धा निवृत्त झाल्यावर इथे राहात होते. तेथील सरकारबरोबर न पटल्याने ते न्यूयॉर्कला गेले. त्यांचा पूर्णाकृती पुतळा इथं आहे.

ग्लेशियर थ्री थाऊजंड (Glacier 3000) इथं शिखरावर केबल कारनंच जावं लागतं. वर गेल्यावर आइस एक्स्प्रेस, अलपिनो कोस्टर, स्नो बस अशा अनेक राइडस् घेता येतात. शिवाय व्ह्य़ूू पॉइंटवरून प्रसिद्ध आल्फ्स अल्पाइन अलाइन शिखरे आपण पाहू शकतो. युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साइट असलेल्या वाइन यार्डला भेट दिली. वाइन निर्मिती प्रक्रियेविषयीची फिल्म पाहिली. वाइनही टेस्ट केली.

शेवटच्या दिवशीही जिनेव्हाला भेट दिली. इथं जगातील सर्व महत्त्वाची कार्यालये आहेत. जगातील सर्वात उंच उडणारा (१६० मि.) कारंजा आहे. फ्लॉरल घडय़ाळ आहे.

स्वित्र्झलडमध्ये यश चोप्रा यांचं नाव खूपच आहे. त्यांच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’सारख्या चित्रपटांचे अनेक शूटिंग इथे झालेली आहेत. त्यांचं घरही इथे आहे. भारतीयांचे स्वित्र्झलड हे आवडते ठिकाण आहे. येथे येणारे ९० टक्के पर्यटक भारतीय आहेत. त्यामुळे अनेक हॉटेल्समध्ये भारतीय जेवण मिळते. दही व फळे इथे खूपच छान मिळतात.

स्वित्र्झलड हा मूळचा आल्फ्स पर्वत रांगेतील छोटासा देश. डोंगरदऱ्यांनी भरलेला. पण डोंगरातील सपाट जागा बिल्डिंगसाठी वापरल्या आहेत. डोंगराचा नैसर्गिक आकार, झाडेझुडपे कायम ठेवून. पायथ्यापासून शिखराकडे जाण्यासाठी त्यांनी केवळ कारचा उपयोग केलेला आहे. तसेच डोंगराच्या सपाट जागेवर ज्याला स्टेप्स म्हणतात तिथे जाण्यासाठी उभे, आडवे (Horizontal and Vertical) बोगदे आहेत व लिफ्टचा वापर उभ्या बोगद्यात केला आहे.

भारतीय बनावटीच्या टाटा कंपनीच्या नॅनो (Nano) कार्स जिनेव्हात पाहिल्या. इथे माणसांची व गाईंची संख्या सारखीच असल्याचं वाचलं होतं. पण कुरणात चरताना १०-१५ गायीच दिसल्या.

स्वित्र्झलड जगाचं नंदनवन आहेच, पण एका उर्दू शायराने काश्मिरविषयी लिहिलं आहे ‘‘स्वर्ग कुठे, स्वर्ग कुठे स्वर्ग इथे पृथ्वीवर’’ हे अगदी खरं. काश्मिरची सर स्वित्र्झलडला नाही. पण जगातील नंदनवनला भेट दिल्याचे, स्वप्नपूर्तीचा आनंदही झाला.
उषा परांजपे – response.lokprabha@expressindia.com