इंडोनेशियात जावाच्या पूर्वेला असलेला माउंट ब्रोमो हा एक जिवंत ज्वालामुखी. त्याचं मूळ नाव ब्रह्मा. गेली अनेक वर्षे धुमसत असलेल्या या ज्वालामुखीचा परिसर म्हणजे इंडोनेशियातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.
‘सिंगापूर काय ४०-४५ कि. मी.चे शहर. जास्तीतजास्त एक महिन्यात पालथे घालशील. मग काय करणार? एक काम कर. आजूबाजूच्या शहरांमध्ये जाऊन ये,’ असा एक फुकटचा सल्ला काही मित्रांनी दिला. मलेशिया, बॅकाँक, पट्टाया, फुकेट, बाली, बातम आणि िबताना अशा नावांचा पाढाच वाचला होता सर्वानी. माझ्यासाठी यामधील काही शहरांची नावे फक्त ऐकूनच माहिती होती. मात्र यामध्ये ‘माउंट ब्रोमो’ला जाऊन ये असा सल्ला देणारा एकही जण मला आजपर्यंत भेटला नाही. अन् देणारही कसा, लोक मुळातच गर्दीच्या ठिकाणी जास्त आकर्षति होतात. माझा पिंड मूळचा ट्रेकिंगचा. त्यामुळे जिथे कमीतकमी गर्दी असेल तिथे जाण्याचा आमचा नेहमीच कल. म्हणूनच इंडियाशी केवळ नामसाधम्र्य नव्हे तर संस्कृतीच्या बाबतीतही अनेक गोष्टींशी साधम्र्य असलेल्या इंडोनेशियामधील ईस्ट जावाला जाण्याचे मी आणि सीमाने पक्के केले. ‘माउंट ब्रोमो’बद्दल महिती काढणे चालू झाले. अनेकांना विचारुन झाले, पण पदरी निराशाच आली. पण मित्र गुगलच्या आधारे ‘माउंट ब्रोमो’चे बुकिंग पक्के करून टाकले.
कॅमेरा, लेन्स, ट्रॉयपॅड, बॅटरी, कपडेलत्ता सॅकमध्ये भरले आणि आमची सात दिवसांची माउंट ब्रोमो, कावा इजेन, बालीची मुक्त भटकंतीची सुरुवात चांगी आंतराष्ट्रीय विमानतळापासून झाली. चांगीवरून आमचे विमान सुरबायाच्या दिशेला झेपावले. इंडोनेशिया पाच वेगवेगळ्या खंडांमध्ये विभागला आहे. सुमात्रा, जावा, बाली, सुलावेसी आणि कलीमंतान. ब्रोमो हा पूर्व जावामध्ये येतो. सिंगापूर ते सुरबाया अवघे दोन तासांचे अंतर. कधी विमानात बसलो आणि कधी उतरलो याचा पत्ताच लागत नाही. नवा देश, नवी माणसे, नवी जमीन कशी असेल या सर्वाचा विचार करतानाच सुरबाया एअरपोर्टवर आमचे विमान उतरले. भारतीय नागरिकाला इंडोनेशियामध्ये ऑन अरायव्हल व्हिसा मिळतो. आधीपासून व्हिसा काढण्याची कटकट नव्हती. आमच्यासाठी गाडी बुकींग केलेला रनी आम्हाला विमानतळावर भेटला. ब्रोमो आणि कावा इजेनबद्दलची माहिती तो सांगू लागला. तिथल्या हवामानाची चौकशी झाली. सिंगापूरचे चलन आणि इंडोनेशियाचे चलन यात मोठा फरक असल्याचे रनी सांगत होता. ‘वी आर मिलिनेयर बट नॉट रिच’ हे रनीचे वाक्य पुरेशी कल्पना देणारे होते. यानंतर आमचा ताबा घेतला चालक इमामने.
जावा विभाग जकार्ता, पूर्व जावा, आणि मध्य जावा अशा भागांमध्ये विभागला आहे. पूर्व जावा हा सर्व डोंगराळ भाग आहे. यामध्ये माउंट ब्रोमो आणि सुमेरूसारखे जिवंत ज्वालामुखी पर्वत आहेत. सुरबायावरून आमची गाडी ब्रोमोच्या दिशेला निघाली. चार ते पाच तासांचा प्रवास असल्याने वेळही बराच होता.
डोंगराच्या कुशीत असलेले ब्रोमो पाहण्यासाठी कॅमेरो लवांग नावाचे गाव गाठावे लागते. हे गाव खुद्द एका ज्वालामुखी पर्वतावर वसलेले आहे. गावापर्यंत जाणारा वळणावळणांचा रस्ता, डोंगरउतारावर केलेली भातशेती आणि त्यामध्ये काम करणारी ठिपक्याएवढी दिसणारी माणसे खास करून आपले लक्ष वेधून घेतात. गेल्या पाच-सहा वर्षांत ब्रोमोला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या बरीच वाढली आहे. कारण इथे झालेले ‘जावा बनाना’सारखे पंचतारांकित हॉटेल आणि ‘कॅफे लाव्हा’सारखे लो बजेट हॉटेल. यामुळे पर्यटकांची चांगलीच सोय झालेली आहे.
पाचच्या सुमारास कॅमेरो लवांगला पोहचलो. तापमान चार ते पाच अंश असल्याने उतरल्या उतरल्या थंडीचा मोठा झटका बसला. भराभर जॅकेट, कानटोपी घातली आणि रूम गाठली. ब्रोमोला जाण्यासाठी कार किंवा जीप चालत नाही. संपूर्ण रस्ता चढाचा आणि रेताड असल्याने इथे फोर व्हील ड्राइव्हच लागते. आमच्या गाडीवाल्याने ही सोयदेखील तीन लाख इंडोनेशियन रुपयांमध्ये करून दिली असल्याने आम्ही निश्चिंत होतो. ब्रोमो आणि सुमेराचा डोंगर ज्या परिसरामध्ये त्याला सुमेरू नॅशनल पार्क असे म्हणतात. त्याची प्रवेश फी दीड लाख इंडोनेशियन रुपये एवढी आहे.
सुरुवातीला आपल्याला असे वाटते की, माउंट ब्रोमो हा इथला सर्वात उंच पर्वत असावा, मात्र प्रत्यक्षात सुमेरू हा इथला सर्वात उंच पर्वत आहे. तो पाहण्यासाठी तीन दिवसांचा ट्रेक करून जावे लागते. पहाटे कडाक्याच्या थंडीत तीन वाजता ब्रोमो पाहण्यासाठी आम्ही सज्ज झालो. हॉटेलबाहेर फोर व्हील ड्राइव्हर आमची वाट पाहतच होता. अंधारात कुठून कुठे जातो आहे, वाट कशी आहे काहीच समजत नव्हते. पाऊण तासांनी आमची गाडी एका पाìकगमध्ये विसावली. काही पायऱ्या चढून ‘पेननजॅकिंग’ पॉइंटपाशी पोहोचलो. इथून ब्रोमो, सुमेरू आणि आजूबाजूच्या पर्वतरांगांचे सुरेख दृश्य दिसते. धुक्याच्या वलयाने या सर्वाना लपेटून घेतले होते. हळूहळू ढगांआडून सूर्यकिरणे ब्रोमोवर पडू लागली तेव्हा विवरामधून येणारा धूर स्पष्ट दिसू लागला. क्षितिजावर भगव्या रंगाची उधळण चालू होती तेवढय़ात सुमेरूमधून धुराचा एक महाकाय लोट आकाशाकडे झेपावला. अर्थात हे दृश्य कॅमेरामध्ये न टिपून कसे चालेल.
इथे ब्रोमोबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. माउंट ब्रोमो हा पर्वत पूर्व जावामधील सुमेरू नॅशनल पार्कमध्ये स्थित आहे. या पर्वताचे मूळचे जावानीज नाव ‘ब्रह्मा’. कालांतराने त्याचा अपभ्रंश होऊन त्याचे नाव ‘ब्रोमो’ झाले असे स्थानिकांकडून समजले. हा ज्वालामुखी पर्वत नागडसरी या नावाने ओळखला जात असून तो ४२ हजार वर्षांपूर्वीचा आहे. याचा उगम ज्वालतप्त रसातून आणि राखेमधून झाला आहे. पुढे याच नागडसरीमधून सध्या प्रचलित असलेले ब्रोमोचे विवर निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून हा ज्वालामुखी धुमसत आहे. १७२८ मध्ये या ज्वालामुखीचा अनेक वेळा उद्रेक झाला आणि साधारणपणे २००१ पर्यंत अधूनमधून उद्रेक चालूच होता. २००१ च्या उद्रेकाच्या वेळी इथे दोन माणसे मरण पावली. या वेळी कॅमेरो, लवांग व आजूबाजूच्या शहरांवर धुराचे साम्राज्य पसरले होते.
एव्हाना सूर्य बराच वर आला होता. धुक्याची जागा आता प्रखर प्रकाशाच्या किरणांनी घेतली होती. सकाळचे सात वाजले होते, मागून आमचा ड्रायव्हर म्हणाला, ‘लेट अस गो टू माउंट ब्रोमो’ आता आमची गाडी डोंगर उतारावरून निघाली. रेताड जमिनीवरचा थोडय़ाशा प्रवासानंतर आम्ही ब्रोमोच्या पायथ्याच्या पाìकगमध्ये होतो. इथून वर ‘पेनेनजॅकिंग’च्या पॉइंटकडे नजर टाकली तर तो सर्व भाग आता धुक्यात गुंडाळला गेला होता. पाìकगपासून ब्रोमोच्या पायथ्यापर्यंत घोडय़ावरून जाता येते. मात्र आम्ही पायीच जाण्याचा निर्णय घेतला. वीस मिनिटांत पायऱ्यांपाशी पोहोचलो. साधारण दीडशे पायऱ्या चढून गेल्यावर आम्ही ब्रोमोच्या विवराजवळ पोहोचलो. विवरामधून मोठय़ा प्रमाणावर धुराचा लोट येत असल्याने सर्व आसमंत सल्फरच्या वासाने भरून गेला होता.
ब्रोमोच्या या विवराला प्रदक्षिणादेखील मारता येते, पण सध्या तरी वाट खराब झाल्याने हा मार्ग बंद केला आहे. ब्रोमोच्या या विवराला कुठेही रेलिंग लावलेले नाही. त्यामुळे इथे उभे राहणे किंवा थोडीदेखील हालचाल करणे फारच कठीण आहे. थोडा जरी तोल गेला तरी विवरात घसरून पडू शकतो. खरं तर सुमेरू नॅशनल पार्कची प्रवेश फी बरीच आहे आणि इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्यादेखील खूप असल्याने पार्कच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षिततेसाठी रेलिंग बांधायला काहीच हरकत नाही. मात्र इंडोनेशियाचे सरकार आणि भारतीय सरकार यात बऱ्याच बाबतीत साम्य असावे असे वाटते.
आजवर अनेक ठिकाणची गरम पाण्याची कुंडे पाहिली होती, पण प्रथमच जिवंत ज्वालामुखीच्या तोंडावर उभे राहून एका वेगळ्याच अनुभवाची प्रचीती आली. क्षणभर आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटत होते. पाय निघता निघत नव्हता, पण संध्याकाळच्या आत ‘कावा ईजेन’ या आणखी एका अद्भुत स्थळी पोहोचायचे असल्याने माघारी फिरण्याशिवाय काही पर्याय नव्हताच.
अमित बोरोले – response.lokprabha@expressindia.com