अंदमानचं निसर्गसौंदर्य आणि सावरकरांच्या देशभक्तीचं प्रतीक असलेलं सेल्युलर जेल पाहण्यासाठी एकदा तरी अंदमानला जायलाच हवं.
बंगालच्या उपसागरात असलेला, निळ्याशार पाण्याने वेढलेला अंदमान-निकोबार हा द्वीपसमूह. हजारो देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण बनलेला. भारताच्या पर्यटनातील एक माणिक. कल्पनातीत सौंदर्याने नटलेलं एक अनोखं जग.
हॉलीवूडच्या चित्रपटातून अशी भुरळ पाडणारी बेटं पाहताना आपल्या देशातदेखील याच्याच तोडीस तोड निसर्गसौंदर्य आहे हेच कधी कधी आपण विसरलेलो असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे जोडीला ‘सेल्युलर जेल’च्या रूपाने आपल्या धगधगत्या इतिहासाची साददेखील असते. मराठी माणूस सावरकरांमुळे या बेटांशी खूप भावनिकरीत्या जोडलेला असतो. सावरकरांनी आणि इतर अनेक क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी भोगलेल्या यातनांचं प्रतीक म्हणजे तेथील सेल्युलर जेल. शाळेत असताना सेल्युलर जेलबद्दल वाचलं होतं. तेव्हापासून अंदमानच्या भूमीला एकदा तरी भेट द्यायची इच्छा होती.
असं सांगितलं जातं की हनुमान सीतेच्या शोधात येथे येऊन गेला होता. मलय भाषेत हनुमानाला लोक हंडूमान म्हणत. त्याचा अपभ्रंश होऊन या बेटांना अंडमान /अंदमान असे म्हटले जाते. शेकडो वर्षांपासून येथे नेग्रिटोज आणि मंगोलॉइड्स या दोन जमातींचे वास्तव्य होते. ग्रेट अंदमानीज, ओंगेस, जारावाझ, शोम्पेंस यासारख्या जमाती येथे आजही आहेत. इथल्या ५७२ बेटांपैकी फक्त ३६ बेटांवरच मनुष्यवस्ती आहे. वस्ती असलेल्या बेटांपैकी २६ बेटे अंदमानची आणि १० बेटे निकोबारची. ९० टक्के भाग जंगलाने व्यापलेला.
पोर्ट ब्लेयर या राजधानीच्या शहरात पोहोचल्या पोहोचल्याच ‘सेल्युलर जेल’च आपलं स्वागत करते. तीन मजली असा सात इमारतीत आणि ६९६ सेल मध्ये विभागलेला हा अवाढव्य जेल. सध्या सातपैकी तीनच इमारती शिल्लक आहेत. इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील शेवटची कोठडी सावरकरांची आहे. आत जाऊन पाहिल्यावर प्रश्न पडतो की अशा ठिकाणी माणूस राहू कसा शकतो? तिथेच राहायचं, तेथेच सर्व नैसर्गिक विधी. केवळ नरक. नारळ आणि मोहरीचे तेल काढायचा तो घाणा ही पाहिला. केवळ पाहूनच त्यांच्या कष्टाची जाणीव झाली. जेलमधली फाशी देण्याची जागा पाहिली. हे सारं पाहून मनात ब्रिटिशांविरुद्ध चीड आणि क्रांतिवीरांच्या आठवणीने डोळ्यात पाणीच तरळलं.
११ फेब्रुवारी १९७९ ला सेल्युलर जेलला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलं. आज येथे क्रांतिवीरांची छायाचित्रे, पहिल्या मजल्यावर आर्ट गॅलरी, नेताजी गॅलरी आणि ग्रंथालय आहे. सेल्युलरच्या जवळच सर्व क्रांतिवीरांच्या स्मरणार्थ एक स्वातंत्र्य ज्योत अखंड तेवत असते. अनेक क्रांतिकारकांच्या शौर्याची, सहनशीलतेची राष्ट्रप्रेमाची ‘काळया पाण्या’च्या शिक्षेची, बलिदानाची मूकपणे साक्ष देते. बटुकेश्वर दत्त, बरिंदर कुमार घोष, उपेंद्रनाथ बॅनर्जी, बिभूती भूषण सरकार, हृषीकेश कांजीलाल, सुधीन कुमार सरकार, वामनराव जोशी, सावरकरांचे मोठे भाऊ गणेश सावरकर येथेच बंदिस्त होते. शौर्याची साक्ष देणारं आणि त्यागाची कहाणी सांगणारं सेल्युलर जेल म्हणजे भारतीयांसाठी एक आधुनिक तीर्थस्थळच म्हणावे लागेल. सेल्युलर जेलमधला संध्याकाळी साडेसहाला असलेला अत्युत्कृष्ट असा लाइट अॅण्ड साऊंड शो आपल्याला अंतर्मुख करतो.
जेल पाहून मग पोर्ट ब्लेयर शहराचा फेरफटका झाला. लेफ्टनंट आर्चीबाल्ड ब्लेयर यांच्यामुळे या शहराला ‘पोर्ट ब्लेयर’ हे नाव मिळालं. अंदमानच्या मुख्य एअरपोर्टला वीर सावरकरांचे नाव आहे. भारतीय नौदल आणि नौदलाशी निगडित हवाई कारवायांसाठी आयएनएस उत्कर्ष याच विमानतळाचा वापर करते.
विपुल नैसर्गिक वारशाबरोबरच अंदमानमध्ये मानवी इतिहासाचेदेखील अनेक दुर्मीळ दुवे आहेत. पोर्ट ब्लेयरला अॅन्थ्रोपोलोजिकल, समुद्रिका आणि झूऑलॉजिकल अशी तीन म्युझिअम आहेत. अॅन्थ्रोपोलोजिकल म्युझियममध्ये अंदमानमधील चार निग्रेटोज आदिवासी जमाती आणि दोन मंगोलाइड्स जमातींविषयी सविस्तर माहिती घेता आली. भारतीय नौदलाने चालवलेल्या समुद्रिका म्युझिअमध्ये सागरी जीवनाविषयी, रंगबेरंगी माशांच्या, इतर जीव जंतूंच्या जीवनचक्राची माहितीमुळे ज्ञानात भर पडली. झूऑलॉजिकल म्युझियममध्ये वेगवेगळे स्पॉन्जेस, कोरल्स, फुलपाखरे आणि गोम आहेत. तसेच जवळच असलेल्या फिशरीज म्युझियममध्ये बंगालच्या उपसागरात सापडणाऱ्या ३५० दुर्मीळ सागरी प्रजातींचे समुद्री जीव आपणास बघावयास मिळतात.
पोर्टब्लेयरपासून २५-३० किलोमीटरच्या परिसरात सिप्पिघाट फार्म, चॅथम सॉ मिल, महात्मा गांधी नॅशनल मरीन पार्क आहे. पाच किलोमीटरवरच्या चॅथम बेटावर १८८३ सालची लाकडाची वखार आहे. दुसऱ्या महायुद्धात ती नष्ट झाली होती पण ५०च्या दरम्यान पुन्हा सुरू करण्यात आली. आज अंदमानमध्ये मिळणारे पदौक लाकूड प्रामुख्याने तेथूनच येते. १५ बेटांचे मिळून तयार केलेलं महात्मा गांधी नॅशनल मरीन पार्क म्हणजे एक भन्नाट प्रकार आहे. पोर्ट ब्लेयरपासून २९ किमी अंतरावर असलेले पार्कमध्ये काचेचा तळ असलेल्या बोटीतून भटकता येते.
पोर्ट ब्लेयरची भटकंती झाल्यावर द्वीप समूहातील इतर बेटांवर जायचे वेध लागले. द्वीपसमूहातील ५७२ बेटांपैकी ३६ बेटांवरच आपल्याला जाता येते. सर्व काही शक्य नव्हतं, पण रॉस, व्हायपर, नॉर्थ बे, बारातांग, पॅरट आयलंड, हॅवलॉक आयलंड आणि नॉर्थ आणि साऊथ हट बे इतकं तरी करायचंच ठरवलं. पोर्ट ब्लेयरमधील फिनिक्स बे जेट्टीवरून व्हायपर, रॉस, नॉर्थ बे या बेटांवर जाण्यासाठी सकाळी नऊपासून येथे बोटी सज्ज असतात.
सुरुवात रॉसपासून केली. सर डॅनियल रॉस नावाच्या एका सागरी सर्वेक्षकाच्या नावावरून ओळखल्या जाणारं रॉस हे बेट ब्रिटिशांची राजधानी होतं. १९४१ सालच्या भूकंपानंतर ब्रिटिशांनी ही राजधानी पोर्ट ब्लेयर येथे हलवली. त्या काळात बांधल्या गेलेल्या इमारती, बाजारपेठ, बेकरी, चर्च, टेनिस कोर्ट, पाणी शुद्धीकरणासाठी यंत्रसामुग्री हे सर्व भग्नावस्थेत पाहावयास मिळते. येथूनच व्हायपर बेटावर जाण्यासाठी बोट घेतली. व्हायपर बेटावर सेल्युलर जेल बांधायच्या अगोदर खुले कारागृह होते. पोर्ट ब्लेयर येथील फिनिक्स बे जेट्टीवरून व्हायपर बेट येथे जाण्यासाठी क्रुझदेखील आहे.
आता आमचा मोर्चा वळला तो समुद्रतळाशी असलेले कोरल्स बघण्यासाठी नॉर्थ बेकडे. कोरल्ससाठी नॉर्थ बे या बेटासारखा दुसरा पर्याय नाही. स्नोर्केलिंग, स्कूबा डायव्हिंग यांसारख्या खेळांचा मनमुराद आनंद लुटायचा तर नॉर्थ बे बेट हा सर्वोत्तम पर्याय.
तिसऱ्या दिवशी मोर्चा वळवला तो बारातांग, पॅरट आयलंड, हॅवलॉक आयलंड. हॅवलॉक हे अंदमान समूहातील सर्वात मोठं बेट. पोर्ट ब्लेयरपासून जलमार्गाने ५० किमी अंतरावर असलेल्या या बेटावर राधानगर बीच आणि एलिफंट बीच हे अतिशय सुंदर समुद्रकिनारे आहेत. राधानगर हा तर आशियातील सवरेत्कृष्ट बीच आहे. एलिफंट बीचवर आपण हत्तींना पोहताना आणि प्रशिक्षण देताना पाहू शकतो. पोर्ट ब्लेयरपासून येथे जाण्यासाठी दोन सांगाडय़ाचे गलबत (Catamaran) आहे.
अंदमानच्या अगदी उत्तर टोकाकडून ते निकोबारमधील शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे इंदिरा पॉइंटपर्यंत सर्वच, मानव वस्ती असलेली पर्यटनस्थळं पर्यटकांना भुरळ घालतात. बारातांग बेटावर चुनखडीच्या गुंफा खूप बघण्यासारख्या आहेत. येथे खारफुटीच्या खाडीतून छोटय़ा बोटीने प्रवास करत जाता येते. ही मजाच निराळी. येथे चिखलाचे छोटे छोटे ज्वालामुखीदेखील बघायला मिळाले. बारातांग बेटाजवळच केवळ पक्ष्यांचंच राज्य असणारं पॅरोट आयलंड आहे. येथील पोपटांना पॅराकिट्स म्हणजे लांब शेपूट असलेले पोपट असे म्हणतात.
पर्यटनाच्या बाबतीत अंदमान जेवढा विकसित आहे तेवढी निकोबार बेटं नाहीत. तेथे समुद्री मार्गाने जायचं म्हटलं की उंचच उंच लाटांच्या समुद्रातून प्रवास करावा लागतो. निकोबारमध्ये उल्लेख करण्याजोगी ठिकाणं म्हणजे कार निकोबार, ग्रेट निकोबार आणि भारताचं शेवटचं टोक ‘इंदिरा पॉइंट’.
लिटल अंदमान आणि नानकौरी बेटांच्यामध्ये कार निकोबार हे बेट आहे. स्थानिक भाषेत या बेटाला ‘पु’ असं म्हणतात. हे बेट बऱ्यापैकी सपाट आणि सुपीक आहे. या बेटावर १५ खेडी आहेत. येथे भारतीय वायुदलाचा मोठा तळ आहे. ग्रेट निकोबार हे निकोबार बेट समूहामध्ये सर्वात मोठं (सुमारे १०४५ चौरस किमी) बेट. बेटाचा खूप मोठा भाग हा जंगलव्याप्तच आहे आणि येथे लोकवस्तीदेखील अतिशय कमी.
स्वातंत्र्यपूर्व काळात जरी ‘काला पानी’ म्हणून ही बेटं कुख्यात असली तरी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या बेटांना ‘स्वराज शहीद बेटे’ असं नावाजलेलं होतं. नारळ-खजुरांच्या झाडांनी समृद्ध, ८० फुटांपर्यंत खोलवर स्पष्ट दिसेल इतकं पारदर्शक, नितळ पाणी असलेले सुंदर आणि आकर्षक समुद्रकिनारे, नितांतसुंदर असे कोरल्स व अन्य समुद्री जीव यांना कवेत घेऊन सांभाळणारं अंदमान-निकोबार द्वीपसमूह आज निसर्गसौंदर्यामुळे भारतातील सर्वात सुंदर पर्यटनस्थळ म्हणून जगप्रसिद्ध आहेत.
अर्थात दोन-चार दिवसांच्या काळात हे सारं काही पाहून होणं शक्यच नव्हतं. अजून कॉर्बिन कोव्ह बीच, चिडिया टापू, वान्दूर बीच, रेड स्कीन आयलंड, जॉली बॉय बेट, नील बेट, माऊंट हॅरीएट, हम्फेगंज हुतात्मा स्मारक, मायाबंदर, रंगत बीच, दिगलीपूर, कालीपूर बीच, बॅरन बेट, लिटल अंदमान, कॅम्बल बे असं खूप काही पाहायचं बाकी होतं. एखाद्या बेटावर अंदमानी लोकांमध्ये राहायचं होतं. पण हाताशी वेळ कमी होता. सेल्युलर जेल एकदा पाहायचाच ही मनोमन असणारी ऊर्मीच खरं तर अंदमानला येण्यास प्रवृत्त करणारी होती.
कसं जाणार?
कोलकाता ते पोर्ट ब्लेयर : जलमार्ग अंतर : १२५५ किमी. हवाई मार्ग अंतर : १३०३ किमी.
चेन्नई (मद्रास) ते पोर्ट ब्लेयर : जलमार्ग अंतर : ११९० किमी, हवाई मार्ग अंतर : १३३० किमी.
विशाखापट्टणम ते पोर्ट ब्लेयर : जलमार्ग अंतर : १२०० किमी, हवाई मार्ग अंतर : ९२६ किमी.
जाण्यासाठी योग्य कालावधी : सप्टेंबर ते फेब्रुवारी
नीलेश गायकवाड – response.lokprabha@expressindia.com