lp09देशातल्या कोणत्याही लोकप्रिय पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सगळ्यात जास्त संख्या असते ती बंगाली, मराठी आणि गुजराती पर्यटकांची. देशाबाहेर जाणाऱ्या पर्यटकांमध्येही या तीन राज्यांमधले नागरिकच मोठय़ा संख्येने असतात. पण मग फिरून आल्यावर पॅरिसमध्ये आयफेल टॉवरखाली आम्हाला तुपाची धार सोडलेली पुरणपोळी कशी खायला मिळाली किंवा काश्मीरमध्ये शिकाऱ्यात बसून आम्ही आमरस कसा चापला याची रसभरित वर्णनं यातल्या काही मंडळींकडून ऐकायला मिळतात. खरं तर आपल्याकडे दर दहा कोसांवर भाषा बदलते तसेच पदार्थ बदलतात आणि चवही बदलते, फक्त महाराष्ट्रापुरता विचार केला तरी इतकी विविधता आहे तर देशाचं काय..? महाराष्ट्रातच विविध ठिकाणी फिरणाऱ्यांनी त्यांची वेगवेगळी ठिकाणं बघून झाल्यावर स्थानिक खाद्यपदार्थाचा आस्वाद घ्यावा यासाठी राज्यातल्या काही ठिकाणांची ही खाद्यमुशाफिरी…

Story img Loader