कधी कधी एखाद्या वास्तूची भव्यता इतकी अफाट असते की वर्णनासाठी शब्द कमी पडतात. अशीच एक कलाकृती म्हणजे कंबोडियातील अंकोरवाट मंदिर समूह. आपल्या पर्यटनाच्या व्याख्येत निसर्गरम्य प्रदेश
१२ व्या शतकाच्या सुरुवातीस राजा सूर्यवर्मन(दुसरा)याने अंकोरवाट हे विष्णूचं भव्य मंदिर उभारलं. त्या काळातील हिंदू धर्माचा विस्तार आणि पगडा त्यातून जाणवतो. समुद्रमंथनाची भव्य दृश्यं जागोजागी दिसून येतात. तर मंदिर आवाराच्या बाजूने असणाऱ्या पडव्यांमधून कित्येक मीटर लांब अशा भिंतींवर महाभारतादी कथा कोरल्या आहेत. अंकोरवाटच्या मुख्य मंदिरात तलावावर बांधलेल्या पुलावरून प्रवेश करावा लागतो. मंदिराच्या भोवती अशा तळ्यांचे जाळेच आहे. (ही तळी खंदकासारखी नाहीत हे विशेष.) त्याचबरोबर एक-दीड किलोमीटर इतकी लांब तटबंदीदेखील आहे. अंकोरवाट हे मुख्य मंदिर जवळपास एक चौरस किलोमीटरवर विस्तारलं आहे. तर अंकोर थॉम हे साधारण त्यापेक्षा निम्म्या क्षेत्रावर वसलं आहे. तिसरं ता फ्रोम मंदिर याच परिसरात आहे. राजा जयवर्मन (सातवा) याने या मंदिर परिसरात स्वत:ची प्रतिमादेखील जागोजागी भव्य पुतळ्यांच्या आधारे कोरलेली दिसून येते.
चौथं मंदिर हे जंगलात मातीखालीच गाडलं गेलं होतं. पोर्तुगीजांनी हे शोधून काढलं. आज या वास्तू उद्ध्वस्त स्वरूपातच आढळतात. ते रौलसचे अवशेष म्हणून ओळखलं जातं. येथे आजही उत्खनन सुरू आहे. साधारण १४ व्या शतकात बुद्ध धर्माचा पगडा वाढला तशा या चारही मंदिरांत बुद्धाच्या मूर्तीदेखील दिसू लागल्या.
अंकोरवाट हे कंबोडियाचं मानाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. अर्थात आज या मंदिर समूहाच्या संवर्धनासाठी कंबोडियन पुरातत्त्व खातं सक्रिय आहे, त्यांना भारताचं पुरातत्त्व खातंदेखील सहकार्य करत असतं. हा मंदिरसमूह व्यवस्थित पाहण्यासाठी कंबोडियातील सिएमरीप या शहरात किमान तीन रात्रींचा मुक्काम करावा लागेल. सिएमरीप शहरात जाण्यासाठी जगभरातून विमानसेवा उपलब्ध आहे. मंदिर पाहण्यासाठी गाइडेड टूर्स उपलब्ध आहेत. जगभरातून लाखो पर्यटक येथे भेट देतात. पण आश्चर्याची बाब म्हणजे या पर्यटकांमध्ये भारतीयांचं प्रमाण केवळ पाच टक्के इतकं आहे.
आत्माराम परब
पर्यटन विशेष : भव्यदिव्य वारसा…
कधी कधी एखाद्या वास्तूची भव्यता इतकी अफाट असते की वर्णनासाठी शब्द कमी पडतात. अशीच एक कलाकृती म्हणजे कंबोडियातील अंकोरवाट मंदिर समूह. आपल्या पर्यटनाच्या व्याख्येत निसर्गरम्य प्रदेश...
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-02-2015 at 01:03 IST
मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Travel special