01gauriबर्मा किंवा म्यानमार म्हटलं की आपल्याला मंडालेचा लोकमान्य टिळकांचा तुरुंगवास, आँग सान सू की या नेत्या आणि जुन्या हिंदी सिनेमात गाजलेलं ‘मेरे पिया गये रंगून’ हे गाणं या तीन गोष्टी हमखास आठवतात. पण त्यापलीकडेही म्यानमारची ओळख आहे.

वेगवेगळ्या मासिकांमधले म्यानमारचे फोटो पाहून म्यानमारविषयी मनात कुतूहल होतं. ‘मेरे पिया गये रंगून, वहाँ से किया है टेलीफून, तुम्हारी याद सताती है,’ या गाण्याने तर कधीचं रंगूनविषयी आकर्षण निर्माण झालेलं होतं. पाहता पाहता एके दिवशी खरंच रंगूनमध्ये येऊन थडकलो. पण आता ते रंगून नव्हे, तर ते आहे यांगॉन. म्यानमारचे सर्वात मोठे शहर व व्यापारी केंद्र. त्याला अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. बुद्ध धर्माचा उदय आपल्याकडे असला तरीही प्रामुख्याने पसरला व स्थिर झाला तो जपान, तिबेट, चीन, भूतान, थायलंड, कंबोडिया, लाओस, श्रीलंका व म्यानमारमध्ये. आपल्याकडील लडाख व तिबेट येथील बुद्धधर्म महायान पंथातला तर इथला थेरवादी. अकराव्या शतकाच्या अखेरीस कंबोडिया येथील ख्मेर राजवटीला उतरती कळा लागली आणि इथे बुद्ध धर्म जोर धरू लागला. त्या काळच्या राजांनी कंबोडियाच्या आँकोर वॉटच्या तोडीचे धम्मायनजी हे मोठे देऊळ बांधले. येथे बगो, पगान म्हणजे सध्याचे बगान, मँडले, इन्वा अशा अनेक भागांत शान, मॉन, प्यू, काचीन, कारेन व बामर अशा वेगवेगळ्या बारा जमाती होत्या. इरावडी, यांगान नदीच्या सुपीक खोऱ्यात शेती समृद्ध होती. एवढेच नव्हे तर मूल्यवान रत्नांच्या खाणीबरोबरच इरावडी नदीच्या पात्रातही सोने मिळू लागले. त्यामुळे भारत, मंगोलिया, तिबेट, कंबोडिया अशा सर्वच दिशांनी लोकांनी येण्यास सुरुवात केली.
आम्हाला सांगितलेला इतिहास तेराव्या शतकापासूनचा. अठराव्या शतकापर्यंत त्यांच्याच वेगवेगळ्या जमातींचे राज्य होते. तेथील मॉन राजवटीतला मिंडॉन राजा हा शेवटचा. अठराव्या शतकात व्यापाराच्या निमित्ताने शिरलेले इंग्रज इथे अठराव्या शतकापासून १९४८ पर्यंत राज्य करत होते. त्यानंतर हा देश लष्करी राजवटीत होता. त्यांचा बाहेरच्या जगाशी संबंधच नव्हता. स्वातंत्र्य मिळाल्यावर सरकारने इंग्रजांनी दिलेली नावे टाकून पुन्हा शहरांना जुनी नावेच दिली. जसे बर्माचे युनियन ऑफ म्यानमार, रंगूनचे यांगॉन, मँडलेचे मंडाले.
lp69म्यानमारमध्ये सतत अस्थिर जीवन. प्रथम त्यांच्यात आपसात लढाया, नंतर इंग्रजांबरोबर, पुढे दुसरे महायुद्ध. त्यानंतर इंग्रज व लष्करी राजवट. लष्करी राजवटीत जनतेचे अतोनात हाल होत असत. लोकांना शिक्षण, आरोग्यसेवा, अन्नधान्य मिळत नसे. सध्या ते रिपब्लिक होण्याच्या वाटेवर आहे. पण आताही फारसा फरक नाही. असे म्हणतात की, राज्यकर्ते तेच आहेत फक्त आता ते लष्करी गणवेशामध्ये नाहीत, एवढंच. त्या काळी मानवी अधिकारांसाठी लढणारे नेते आँग सान हे एकतर्फी लढा देत राहिले. स्वतंत्र म्यानमार हे त्यांचे स्वप्न होते. त्यांच्या मृत्यूच्या वेळेस आँग सान सू की चार-पाच वर्षांच्या होत्या. त्यांनीही मोठेपणी वडिलांचा कित्ता गिरवायला सुरू केल्याने तत्कालीन हुकूमशहाने त्यांना अठरा वर्षे घरात नजरकैदेत ठेवले होते. त्यादेखील आपल्या वडिलांप्रमाणेच लोकप्रिय आहेत आणि आता राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक लढवणार आहेत. तर अशा अजूनही मागास, पण बुद्धकालीन अवशेष व संस्कृतीने परिपूर्ण म्यानमारमध्ये पाहण्यासारखे भरपूर आहे. येथे पॅगोडा किंवा स्तूप, टेंपल, ऑर्डिनेशन म्हणजे बुद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर भिख्खूंनी शिक्षण घेण्यासाठी शाळा व धार्मिक साहित्य ठेवण्याची लायब्ररी आहेत. सर्वच स्तूप भरीव असून त्यात भगवान बुद्धांचा केस किंवा दात असतो, पण त्याच्या आत कुणी जाऊ शकत नाहीत. टेंपल हे बुद्धांचे चारही दिशांना पुतळे असलेले आपल्यासारखेच देऊळ. पॅगोडाला भेट देताना स्त्री-पुरुषांनी बिनबाह्यंचे टॉप्स्, शॉर्टस्, पायात चप्पल, बूट घालण्यास मज्जाव आहे.
lp75फार वर्षांपूर्वी डगान या गावातच वस्ती होती. हळूहळू ते यांगॉन नदीकाठी लोकसंख्या वाढत गेली व म्हणून तेच नाव पडले. येथील मुख्य आकर्षण हे श्वेडगान पॅगोडा. श्वे म्हणजे भगवान बुद्धाचे अवशेष व डगान सिटीमधला म्हणून श्वेडगान. त्याबद्दल एक गोष्ट सांगितली गेली ती अशी की गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाल्यावर येथील दोन व्यापारी बंधू गया येथे त्यांना भेटायला गेले असताना बुद्धांनी त्यांना आपले आठ केस भेट दिले, परतीच्या प्रवासात वाटेत त्यांना दरोडेखोरांनी लुटले. बुद्धांनी दिलेला अमूल्य ठेवाही या लूटमारीत गेला असे वाटून हे व्यापारी दु:खी होते, पण काय आश्चर्य, गावात परतल्यावर आपल्याजवळील सामानात बुद्धांची भेट सुरक्षित असल्याचे त्यांच्या लक्षात आले. गौतम बुद्धांअगोदर तीन बुद्धांचे अवशेष ज्या स्तूपात ठेवले होते तेथेच तत्कालीन राजा ओक्कालपा याने बुद्धांचे हे केसही ठेवून दिले. ख्रिस्तपूर्व ६०० वर्षांपूर्वी बांधलेल्या लहानशा पॅगोडाची, देवस्थानाची देखभाल पुढे झालेल्या ३४ राजांनी केली. १४५३ साली शिन् शा पू राणीने पॅगोडाची उंची ३०२ फूट एवढी वाढवली व आपल्या वजनाएवढे म्हणजे ८८ किलो सोने देऊन पॅगोडा सोन्याच्या पत्र्यांनी मढवला. त्यानंतर राजा धम्मझेदी आणि त्याच्या राणीने त्यांच्या वजनाच्या चौपट सोने देऊन घंटेच्या आकाराच्या स्तूपाची बांधणी केली. म्यानमार हे भूकंपाच्या पट्टय़ात असल्याने बरेच नुकसान झाले. पुढे प्रत्येक राजाने पॅगोडाची उंची हळूहळू वाढवत नेऊन मॉन राजा मिंग याने अठराव्या शतकात त्याची उंची ३२६ फूट पर्यंत नेली.
lp70समुद्रसपाटीपासून १९० फूट उंचीवर सिंगूतारा टेकडीवरील श्वेडगान स्तूप म्हणजे म्यानमारची शान आहे. चारही दिशांनी आत येण्यासाठी प्रवेशावर चिंते म्हणजे दोन भले मोठ्ठे सिंहाचे पुतळे आहेत. आपण पायऱ्या चढून वर येऊ शकतो, पण उत्तरेकडील प्रवेशासाठी लिफ्टची सोय आहे. आवारात बिहारमधील गया येथून आणलेल्या बोधिवृक्षाच्या फांदीचा प्रचंड विस्तार झाला आहे. स्तूपाच्या आवारात ककुसंधा, कोंगमाना, कस्सपा आणि गौतम अशा चार बुद्धांचे केस किंवा दात ठेवलेला आहे. पाचवा बुद्ध या युगात होणार अशी त्यांची पक्की समजूत आहे. प्रत्येक देवळात असे काही अवशेष रत्नजडित सागवानी लाकडी पेटीत ठेवलेले आहेत. असो.
lp74श्वेड्गान स्तूपाचा चौथरा, सज्जे येथे विटांचे बांधकाम असून सोन्याच्या पत्र्यांनी झाकले आहे. सज्जांमध्ये फक्त बौद्ध भिख्खू जाऊ शकतात. उपडय़ा ठेवलेल्या घंटेसारख्या स्तूपाचा वरच्या शिखरापर्यंतचा भाग सोन्याच्या मुलाम्याने मढवला आहे. मुकुटावरील छत्री, त्यावरील सर्व घंटा सोन्याच्या आहेत. वर रत्नजडित सुवर्णपंखा आणि सर्वात वर ७६ कॅरेटचा हिरा. अर्थात एवढय़ा उंचीवरील हिरा आपल्या नजरेस पडत नाही, पण जे काही डोळय़ांना दिसतं, ते मात्र अप्रतिम. दिवसभर सूर्यप्रकाशात तळपणारा पॅगोडा रात्री दिव्यांच्या रोषणाईत मात्र शांत व सुखद वाटतो. सूर्यास्तावेळेस त्यावर पडणारे किरण स्तूपाला एक वेगळीच छटा देतात. पॅगोडाभोवती आठवडय़ाच्या सर्व दिवसांची प्रवेशद्वारे आहेत.
lp71थेरवादी बुद्ध पंथात हिंदू धर्माप्रमाणे बरीच आचरणे असली तरी आपल्याकडील खगोल ग्रहशास्त्रातल्या सात ग्रहांऐवजी आठ ग्रह आहेत. केतू हा ग्रहांचा राजा मानला असून त्याच्यासाठी येथे देऊळ आहे. बुधवार हा सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एक व तेथून पुढे मध्यरात्रीपर्यंत दुसरा असे दोन दिवसांत विभागला गेला आहे. प्रत्येक दिवसाच्या प्रवेशद्वारावर त्या दिवसानुसार पक्ष्याचे निशाण त्यावर आहे. आपल्या जन्मवाराच्या दिवशी त्या प्रवेशद्वारातील बुद्धाच्या प्रतिमेवर अभिषेक करून पूजा करण्याची प्रथा आहे. आवारात जेड या अमूल्य रत्नाने बनवलेली बुद्धाची प्रतिमा, तसेच दात ठेवलेले लहानसे देऊळ, प्रार्थनेसाठी हॉल असे बरेच काही आहे. इंग्रजांनी जाताना बरेच काही लुटून नेले, मिंग राजाने बनवलेल्या ९० टन वजनाची तांब्याची घंटा ते नेऊ शकले नाहीत, पण ती त्यांनी इरावाडी नदीत सोडून दिली. त्या घंटेची प्रतिकृती येथे आहे.
यांगान येथे पाहण्यासारखे म्हणजे तॉक्यन वॉर सिमेट्री, सुले पॅगोडा, बोतोताँग पाया, कांडुगी लेक. शिवाय बरीच देवळं आहेत. वॉर सिमेट्रीमध्ये दुसऱ्या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या जगभरातील २२ हजार सैनिकांची नावे आहेत. आपल्या भारतीयांची नावे वाचून आमचे हात आपोआपच जोडले गेले. बोतोताँग पाया येथे अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धांचा केस आणला होता. त्या वेळी हजार सैनिक पहारा देत होते, म्हणून त्या जागेला हे बर्मीज् नाव देण्यात आले. या देवळाची रचना अष्टाकृती असून कमलदलाप्रमाणे दिसते. lp73देवळाबाहेर तलावात कासवं आहेत. आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर येथे कासव सोडण्याची प्रथा आहे.
कधी काळी अवकाशातून उल्का पडून येथे १५० एकर व्यासाच्या विवरात कांडुगी लेक झाला आहे. सूर्यास्तावेळी श्वेडगान पॅगोडाचे त्यात पडलेले प्रतिबिंब छानच दिसते. किनाऱ्यावर बाहेरील बाजूस छानसे लॉन असून फुलझाडांची मांडणी फार कल्पकतेने केलेली आहे, तर दुसरीकडे सोनेरी रंगाचे पक्ष्याचे तरंगते रेस्टॉरंट आहे. तेथे वेगवेगळे कार्यक्रम होतात.
सुले पॅगोडा हे यांगानमधले मध्यवर्ती ठिकाण. त्याभोवती शहर वसत गेले आहे. यांगान येथील सर्व रस्ते पॅगोडापासूनच सुरू होतात. बुद्धांचा केस असलेले हे सुवर्ण मंदिर १५१ फूट उंचीचे आहे. चौथरा अष्टकोनाकृती असून घंटेच्या आकाराचा पॅगोडा आहे. ब्रिटिशकालीन इमारती व हायकोर्ट, म्युझियम यांच्या सान्निध्यातले हे देऊळ संध्याकाळी दिव्यांनी झगमगते रस्त्यावर भरपूर दुकानं, फेरीवाले व खाद्यपदार्थाच्या गाडय़ा व त्याचा आस्वाद घेण्यासाठी फुटपाथवरच खवय्यांची गर्दी असते. या सर्व कार्यक्रमाने संध्याकाळी आसमंत अगदी गजबजून गेलेला असतो. म्यानमारमध्ये सर्वच प्रांतात खाद्यपदार्थ रस्त्यावर बसून खाण्याचे प्रमाण भरपूर आहे.
यांगान नदीकिनारी से ता मित् पाया येथे चायना येथून आणलेल्या बुद्धाच्या दाताची प्रतिमा सुंदरशा रत्नजडित कुपीमध्ये ठेवलेली आहे. नदीकिनारी हजार सैनिकांच्या देखरेखीत हा अवशेष होता म्हणून त्याला से ता मित् असे बर्मीज् नाव आहे.
lp72असे म्हणतात की गोल्डन रॉकजवळच्याच स्तूपात असलेल्या बुद्धाच्या केसामुळे क्याईक्तो डोंगराच्या कडेवर ही भली मोठ्ठी शिळा वर्षांनुवर्षे आपला तोल सांभाळत डौलाने उभी आहे. या पवित्र स्थानावर जाण्यासाठी बेस कॅम्पपर्यंत वाहनाने जाता येते. पण पुढचा सरळसोट चढ चढून जाणे खंद्या वीराचेच काम. पण आता अगदी शेंडय़ापर्यंत पीक अप ट्रकने जाऊ शकतो. गोल्ड रॉकचे दर्शन आपल्याला अचंब्यात पाडते. जवळून पाहिल्यावर अगदी नगण्य जागेवर ही शिळा कशी उभी आहे याचे आश्चर्य वाटत राहते. रॉकवर फक्त पुरुषच गोल्ड लीफ लावू शकतात. सूर्योदय, सूर्यास्तावेळेस त्यावर पडणाऱ्या सूर्यकिरणांमुळे सोन्याच्या वेगवेगळ्या छटा पाहायला मिळतात. हे दृश्य पाहण्यासाठी गॅलरीज् आहेत. पीक् अप ट्रकने खाली जाण्यासाठीच्या प्रवासात ट्रकमध्ये जागा पकडण्यासाठीचा सोहळा पाहण्यासारखा असतो.
यांगॉन येथून क्याईक्तो येथे जाताना ८० कि. मी.वर आपल्याला बगो, पूर्वीचे पेगु, हे गाव लागते. येथेही यांगॉनच्या श्वेड्गानसारखाच उंच श्वे मॉ डॉ पाया आहे. मॉन राजवटीत हे भरभराटीचे गाव होते. राजघराण्यातील दोन भावांनी स्थापलेली ही राजधानी होती. येथेही बुद्धाचे दोन केस आणि दात ठेवलेला आहे. त्याच काळात बनलेला श्वे था लिआँग पाया येथे भेट दिलीच पाहिजे. या देवळात महानिर्वाणापूर्वी सायंकाळी पहुडलेला असा गौतम बुद्धाचा ५५ मी. लांब व १६ मी. उंच सोनेरी पुतळा आहे. तसाच ८३ मी. लांबीचा पुतळा श्वे था लिआँग पाया येथे आहे. तो अगदी अलीकडचाच म्हणजे २००१ सालचा आहे. पण येथील पुतळा उघडय़ावर आहे. दोनही ठिकाणी सजावट अति उत्तम आहेच, शिवाय बुद्धाच्या पायावर १४४ वेगवेगळी चिन्हे आहेत. त्याभोवती फिरताना उन्हाने तापलेल्या फरशीमुळे पायाला चटके बसतात.
गौरी बोरकर

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
Bhool Bhulaiyaa 3 Singham again on OTT
सिंघम अगेन व भूल भुलैया थिएटरनंतर एकाच दिवशी OTT वर रिलीज होणार, कुठे येणार पाहता? वाचा
Story img Loader