मे आणि जून महिन्यांमध्ये अक्षयकुमारचा चित्रपट वगळता सर्व अकरा-बारा चित्रपट बडे स्टार नसलेल्या कलावंतांचे आणि काही नवोदित कलावंतांचे चित्रपट असून त्यांचे विषयवैविध्य हेच या महिन्याचे वैशिष्टय़ म्हणता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दर महिन्याला बॉलीवूडमध्ये किमान एक बिग बजेट, बडय़ा स्टारकास्टचा सिनेमा प्रदर्शित होतो किंवा त्याची हवा बऱ्याच आधीपासून तयार झालेली असते, परंतु मे आणि जून महिन्यांमध्ये अक्षयकुमारचा चित्रपट वगळता सर्व अकरा-बारा चित्रपट बडे स्टार नसलेल्या कलावंतांचे आणि काही नवोदित कलावंतांचे चित्रपट असून त्यांचे विषयवैविध्य हेच या महिन्याचे वैशिष्टय़ म्हणता येईल. त्यापैकी मोजक्या चित्रपटांविषयी थोडेसे..
मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांच्या उदयानंतर बॉलीवूडचे बिग बजेट, बडे स्टार कलावंत, फॉम्र्युलाबाज कथानके, गाण्यांचा अतिरेक यामध्ये चांगले बदल झाले आहेत. त्याचबरोबर बडी मंडळी नसलेले, वेगवेगळ्या विषयांना निदान स्पर्श करण्याचा प्रयत्न करणारे छोटय़ा कलावंतांचे नॉन ग्लॅमरस चित्रपटही झळकू लागले. मे-जून महिन्यात ‘फग्ली’ आणि ‘हॉलिडे’, ‘हिरोपन्ती’ असे तीन चित्रपट वगळले तर अन्य चित्रपटांची नावेसुद्धा प्रेक्षकांनी केवळ ऐकलेलीच असतील. मे-जून महिन्यांत प्रदर्शित होणाऱ्या पुढील बॉलीवूडपटांची नावेच पाहा – ‘मस्तराम’, ‘द एक्स्पोज’, ‘सिटी लाइट्स’, ‘ये है बकरापूर’, ‘कोयलांचल’, ‘ख्वाब’, ‘कूकू माथूर की झंड हो गई’, ‘फिल्मीस्तान’, ‘हमशकल्स’, ‘एक व्हिलन’, ‘क्रिएचर थ्रीडी’. चित्रपटांच्या या शीर्षकांवरूनच वाचकांच्या मनात ‘हे कुठले सिनेमे बरे’, असा प्रश्न उभा राहील. म्हणूनच तुलनेने कमी बजेटच्या आणि स्टार कलावंत नसलेल्या काही चित्रपटांच्या विषयाबद्दल सांगावेसे वाटते.
‘मस्तराम’ या चित्रपटाच्या शीर्षकावरूनच अचाट नावाचा बोध होतो. राजाराम नावाचा एक बँकेतला कारकून दिल्लीसारख्या शहरात जाऊन लेखक बनण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी नोकरी सोडतो. त्याची कादंबरी प्रकाशित करण्याचे एक प्रकाशक मान्य करतो, परंतु त्या कादंबरीत भरपूर चटपटीत मसाला घालण्याचे त्याला सांगतो. राजारामला अचानक एक चाचा भेटतो, त्याच्याकडून प्रेरणा घेऊन मग नाइलाजास्तव राजाराम हिंदीमध्ये अश्लील गोष्टी, कथामालिका, शृंगाराची रसभरीत वर्णने अशा प्रकारचे पिवळे साहित्य लिहू लागतो. त्यासाठी तो मस्तराम असे नाव घेतो. अखिलेश जयस्वाल या तरुण लेखकाचा दिग्दर्शक म्हणून असलेला पहिला चित्रपट आहे. राहुल बग्गा या कलावंताने मस्तराम ही प्रमुख भूमिका साकारली असून बॉलीवूडमधील ‘फिक्शनल बायोग्राफी’ या प्रकारातला हा चित्रपट आहे. बॉलीवूडमधला हा अतिशय वेगळ्या विषयावरचा गमतीदार चित्रपट ठरणार आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधले उत्तम कलावंत या चित्रपटात असतील. ९ मे रोजी ‘ख्वाब’ नावाचा चित्रपट प्रदर्शित होत असून मोराद अली खान या अर्जुन पुरस्कार विजेत्या नेमबाज लिखित व निर्मित हा क्रीडाविषयक चित्रपट आहे. नवदीप सिंग आणि सिमेर मोतियानी हे कलावंत यात प्रमुख भूमिकेत आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक-दिग्दर्शक हंसल मेहता यांचा ‘सिटी लाइट्स’ हा चित्रपट ३० मे रोजी प्रदर्शित होईल. राजकुमार रावचा हा हंसल मेहता यांच्यासोबतचा दुसरा चित्रपट आहे. एक गरीब शेतकरी उपजीविकेच्या शोधार्थ मुंबईत येतो असे कथानक आहे. ‘मेट्रो मनिला’ गाजलेल्या ब्रिटिश चित्रपटाचा हा अधिकृत रिमेक आहे.
‘फिल्मीस्तान’ हा नितीन कक्कर लिखित दिग्दर्शित चित्रपट बूसान, दिल्ली, जयपूर, केरळ, स्टुटगार्ट इत्यादी ठिकाणच्या चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेला चित्रपट असून २०१२ साली साठाव्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सवरेत्कृष्ट हिंदी चित्रपटाचे पारितोषिक मिळविलेला चित्रपट आहे. शारीब हाश्मी, इनाम उल हक, कुमुद मिश्रा, गोपाल दत्त या कलावंतांच्या प्रमुख भूमिका यात आहेत. ‘फिल्मीस्तान’ या चित्रपटावरून बॉलीवूड चित्रपटांचा कथानकातील संबंध स्पष्ट होतो. भारत, पाकिस्तान व अन्य भारतीय उपखंडांतील देशांची संस्कृती, चित्रपट-नाटक याबाबतचा नोस्टॅल्जिया या दोन्हीमुळे तयार झालेला बंध हा या चित्रपटाचा गाभा आहे. दोन देशांमध्ये वैरभाव असला तरी काही समान धाग्यांनी त्या देशांचे नागरिक एकमेकांशी भावनिकदृष्टय़ा अतूटपणे जोडले गेलेले असतात असा विषय हाताळणारा हा चित्रपट ६ जूनला प्रदर्शित होईल.