गोष्ट तशी जुनीच. मी चौथी-पाचवीत असेन. त्या काळी आम्ही दूरदर्शनचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसॅडर होतो. म्हणजे, आज की सभा में हार्दिक  स्वागतपासून अब हमें आज्ञा दिजिएपर्यंत, बुडाला डिंक लावून आम्ही टीव्हीला चिकटायचो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तेव्हा दूरदर्शनवर  एक कथाकथीसारखी मालिका चालायची. दर भागात एक नवीन कथा. काही उमगायच्या, काही डोक्यावरून टॅन्जंट. काहीही असो आम्ही रेटून बघायचो.

त्यातलीच एक गोष्ट. बहुतेक चंद्रकांत गोखल्यांनी काम केलं असावं. पन्नाशीचा एक चाळकरी माणूस. चौकोनी कुटुंब. मिलमध्ये कामाला. महिनाअखेरीस पैशाची ठरावीक ओढाताण. एक दिवस अचानक म्हणतो की आजपासून मी  मेलोय असं समजायचं. मी नोकरीला जाणार पण माझ्याकडून पगाराची अपेक्षा करायची  नाही.

घरी हलकल्लोळ. महिना सरतो. घरभाडे थकते. वाणी दारावर येऊन जातो. मालक येऊन कल्ला करतो. तरी हा ढिम्म. त्या जान्हवीच्या बापासारखा. शेवटी बायको पोळ्या लाटण्याची कामे सुरू करते. आधी उनाडक्या करणारा पोरगा कुठेतरी  हातपाय चालवून दोन पैसे मिळवू लागतो. कसाबसा महिना निभावून जातो. शेवटपर्यंत हा असून नसल्यासारखा.

एक तारीख उजाडते. पगाराचा दिवस. बायको पोराला नवऱ्यामागे गुपचूप पाठवते. पगार घेऊन तो अशाच एका चाळीत शिरतो. खोलीत एक तरुण विधवा. कडेवर तान्हे बाळ.  तो पगार बाईच्या हाती ठेवतो आणि परत फिरतो. पोराला वाटतं, आपल्या बापाची नक्की काहीतरी भानगड असावी.

रात्री घरी भावनिक भूकंप होतो. बायको नवऱ्याला नको नको ते बोलते. शेवटी हा आपलं मौन सोडतो.

‘‘मी असं का वागतो असा प्रश्न पडलाय ना तुम्हाला? सांगतो. सगळं सांगतो. मागच्या एक तारखेची गोष्ट.  खिशात पगार घेऊन घरी निघालो होतो. लोकलला तुफान गर्दी. तसाच दरवाज्याला लटकलो. आत एक पंचविशीचा पोरगा होता. मला म्हणाला, काका तुम्ही कशाला बाहेर लटकताय? तुम्ही आत या. मी दरवाज्यात उभा राहतो. मला सवय आहे.

..पाचच मिनिटांत बाहेरच्या खांबाला धडकून ते पोरगं मेलं रे. त्या दिवशी खरं मीच जायचो, पण तो गेला. मी गेलो असतो तर फारसा फरक पडला नसता, पण त्याचं काय?  म्हणून माझा पगार त्या माऊलीला नेऊन देतो.’’

गोष्ट संपली. तेव्हा फारशी भिडली नव्हती. पण आता डोक्यात गेली. आठवली ती परवाच्या लोकल अपघताच्या बातमीमुळे.

किती वर्षे मुंबईत हे असं चालणार? लोकलचे दरवाजे आहेत की स्वर्गाचे दरवाजे?

इथे जगण्यासाठी रोजच मरावं लागतं? कशाला? या असल्या मृत्यूचा सोहळा बघण्यासाठी?
कौस्तुभ केळकर – response.lokprabha@expressindia.com