लालबुंद कलिंगड कापून (खाऊन) उरलेल्या कापामधून हिरवी टणक पाठ काढून पांढरा रसाळ बहुउपयोगी कलिंगड पुन्हा उपयोगात आणावा. त्याची १) भाजी, २) चटणी, ३) सॅलड (तिखटमीठ, क्रीम, दही.. जिरेपूड वगैरे चवीनुसार हलकिशी फोडणी व थोडीसाखर, लिंबू वापरून चव इच्छेनुसार सुधारावी.)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

४) सूपसाठी : कलिंगडच्या बारीक फोडी मिक्सरमध्ये टाकाव्यात. त्यात ओली हळद, ओवा, लसूण पाकळ्या मिक्सरमधून बारीक करून घ्याव्यात. गॅस, कढई गरम झाली की मग थोडंसं तूप सगळं जिरं, कलमी तुकडे, हिरवी मिर्ची तुकडे चांगले परतून, टोमॅटो फोडी चांगले परतून, मिक्सर वाटय़ास, फोडणी द्यावी.

वरून उकळते पाणी वापरून आणि छान उकळल्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि बारीक धने-कोथिंबीर घालून गरमगरम बाऊलमध्ये सव्‍‌र्ह करावे. चवीनुसार वरून गरजेप्रमाणे घ्यावे व लज्जत वाढवावी.

विजय ठाकरे – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व वाचक शेफ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recipes