साहित्य : १ वाटी बारीक चिरलेली फरसबी, १ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, अमूल बटर, चीज, टॉमेटो प्यूरी अर्धी वाटी.

कृती : प्रथम कढईत अमूल बटर घालावे. त्यात चिरलेला कांदा परतावा, मग त्यात फरसबी घालावी ती परतून घ्यावी . त्यातच मग टोमॅटो प्यूरी घालावी. मग धुतलेले तांदूळ घालावे. हे सर्व परतून घ्यावे व मग त्यामध्ये आधण पाणी घालावे. मीठ व चवीनुसार साखर घालावी व भात शिजला की त्यावर किसलेले चीज घालावे व वर झाकण ठेवून द्यावे. त्या वाफेत चीज छान वितळते व रिसोटो गरम सव्‍‌र्ह करावा.

गार्लिक ब्रेड

साहित्य : ब्रेड, अमूल बटर, २, ३ चीज क्यूब, चिली फ्लॅक्स, बारीक चिरलेली अगर कुटलेली लसूण

कृती : एका बाऊलमध्ये अमूल बटर, किसलेले चीज, चिली फ्लॅक्स, बारीक चिरलेली अगर कुटलेली लसूण हे सर्व मिश्रण एकत्र करावे. ब्रेडला बटर लावून ब्रेड लालसर भाजून घ्यावेत व ब्रेडच्या एका बाजूला हे मिश्रण लावावे व ब्रेड गरम करून घ्यावा. गार्लिक ब्रेड तयार. हे गरम गरम खावे.

रसलिंबू

साहित्य : लिंबाचा रस, साखर, तिखट अगर लोणचे मसाला व मीठ.

कृती : एका कढईत लिंबाचा रस, साखर व तिखट अगर लोणचे मसाला घालून हे सर्व मिश्रण उकळत ठेवावे व साखर विरघळली की मीठ टाकून परत एक उकळी काढावी व गॅस बंद करावा. चविष्ट रसलिंबू तयार.
प्रियंका जोशी – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader