01-vachak-lekhakकल, स्वभाव आणि माणूस पाहायला गेलं तर इन मीन तीन शब्द आहेत. मनाचा कल ज्या दिशेने झुकलेला आहे तसा आपला स्वभाव असतो आणि या स्वभावातून माणूस घडत असतो. जर कुणी सारखा हसत असेल तर त्याला हसतमुख म्हणतात, रडणाऱ्याला दु:खी म्हटले जाते, चेहऱ्यावरची माशी न हलू देणाऱ्यास आपण मख्ख असे कुत्सितपणे बोलून जातो. ही कशाची प्रक्रिया झाली? ज्याचा कल हसण्याकडे असतो तो हसतमुख आणि असेच बाकी सर्व वृत्तींबद्दल म्हणावं लागेल; पण ही अगदीच निरागस, निष्पाप आणि साधी गोष्ट आहे. पण यातून निर्माण होणाऱ्या गोष्टी मात्र भयंकर परिणाम करून जाऊ शकतात बरे. म्हणून अनेकदा कुणाच्या कलाकलाने घ्यायला गेलो की हबकून आपलीच दमछाक होते. या गोष्टी मेंदू नव्हे, थेट मनासही जोडल्या असल्याने फार जपून आणि सांभाळून वागवाव्या लागतात.

या सर्व वृत्ती मिळून आपला स्वभाव बनवतात, ठरवतात. लोक किंवा अगदी वैद्य, डॉक्टर, आई, बाबा, काकू, मैत्रीण आपल्या वृत्तींचा अभ्यास करून आपला स्वभाव ओळखण्याचा प्रयत्न करतात. स्वभाव, बाबा रे, हा खूप अवघड प्रकार आहे हो! कारण ही चमत्कारिक अदृश्य, न जाणवणारी, परंतु आत्म्यातून वावरणारी एक गोष्ट आहे, म्हणजे स्वभाव. काही लोक खरंच वेडसर असतात. हो, अहो, ही गोष्ट ज्याची असते ना त्याची त्याला जाणवायला लागेपर्यंत इतर लोकांना समजते आणि ते त्याबद्दल मतही बनवून टाकतात. किती विचित्र आहे नाही, हा म्हणजे अतिशहाणपणा, असा प्रकार का करतात लोक?

Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Amitabh Bachchan talks about intercultural marriages in his family
“भावाचं लग्न सिंधी मुलीशी, मुलगी पंजाबी कुटुंबात अन् मुलगा…”; अमिताभ बच्चन यांचे कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Mann Ka Geet, Mann Ki Baat, Narendra Modi,
‘मन की बात’नंतर आता ‘मन का गीत’; गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कवितांचा कार्यक्रम

आपल्या आवडी, आपल्या सवयी, या अनेकदा अनेक जण पाळत असतो, पण कधी इतका खोल विचार करत नाही, की या गोष्टी माझा स्वभाव ठरवतात, अनेकांना अनेक लोकांनी त्यांच्या स्वभावाबद्दल अपशब्द तसे गौरवोद्गार दिले असतील, नम्रपणे त्यांचा स्वीकार करणे इतकंच कर्तव्य मानायचे, दुसरे काय. स्वभावाबद्दल माझे जनासाठी मत असे आहे की, कुणीही एखाद्याला आतून-बाहेरून संपूर्ण पोखरल्याखेरीज या या अमुकचा स्वभाव असा, त्याचा तसा; असे पूर्वग्रह मनात बनवूच नयेत. कारणही देतो. कुणी एखाद्या गोष्टीवर कशीही प्रतिक्रिया देऊ शकतो, ती फसवीपण असू शकते. त्यामुळेच जगात कुणी कुणाचा स्वभाव ठरवत बसू नये. हो, पण जगताना सावध बरे. उगाच एखाद्याचा पडताळलेला स्वभाव आपल्याच अंगाशी वाईटपणा देऊन जायचा.

कलोत्त्पतीतून अनेक वेगळे असे परिणाम घडतात. मग ते अशा गोष्टी घडल्यावरच होतात. आपण उगा कुणाचा स्वभाव ठरवून बसतो आणि धोका खाऊन मनाचे ढोपर फोडून घेतो. प्रेमात ज्यांना धोका मिळतो ना त्यांना विचारा की, त्याने किंवा तिने आपल्या जोडीदारात सर्वप्रथम काय पाहिले, की एवढं प्रेम वाहून जाऊ लागलं. पटकन उत्तर येते (बऱ्याचदा) – स्वभाव! आता मला सांगा, खरंच स्वभाव कळलेला असतो का? बऱ्याचदा लोक आपला स्वभाव बदलायचा आहे, असे म्हणतात, सवयी बदलू पाहतात; पण मला नाही वाटत, की स्वभावही बदलत असेल त्यांचा. आपला स्वभाव काय हे आपण ठरवत नसतो. दुसऱ्याविषयी कितीही खात्रीने सांगितले तरी स्वभाव कधी बदलेल असे साशंक मनात संचित ठेवतोच. मला वाटतं इतके सोशीक नसावे माणसाने, दुसऱ्याचे पार स्वभाव ठरवणारे. त्याने काय होतं, आपलं आपल्यावर होते दुर्लक्ष आणि मग सतत वेगवेगळे विचार करण्याने मेंदूचा प्रोसेसर स्लो काम करायला लागतो. दुष्परिणामी आरोग्याचे असंतुलन, अध:पतन.

स्वभाव आणि कल यांतील समन्वय अभ्यासल्यानंतर आता आपण सुरुवातीला अतिशय गंभीर, अत्यंत सर्जन आणि मुख्यही म्हणता येईल अशा मुद्दय़ावर लक्ष देऊ, तो म्हणजे माणूस. माणूस म्हणजे काय, तर व्यक्ती. व्यक्ती आली की ओघानेच तिचं व्यक्तिमत्त्वही येतंच. बालपणात माणूस घडण्याच्या त्याच्या अगदी सुरुवातीच्या पायरीवर असतो. त्या वेळी तिथे जर योग्य हाताळले गेलो नाही, योग्य संस्कार रुजले नाहीत, तर गफलत ही तेव्हा नाही तर पुढे पौगंडावस्थेत, किशोर, कुमार, युवावस्थेत होत जाते. या वेळेस नेमके लहानपणी शिकलेले दुर्लक्षिले जाते, विसरले जाते आणि कॅरेक्टर, चारित्र्य, माणूस म्हणून आपण निराळाच आकार घेतो आणि हे असे होत असताना कल, स्वभाव अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात. ज्या वेगळ्या गोष्टींचा आपल्याला नाद लागतो त्याकडेच मग आपला कल जातो; जसे वाचन, लेखन, व्यसन (सिगारेट, दारू, तंबाखू इत्यादी) यात बऱ्याचदा दुर्दैवाने लैंगिक आकर्षणाकडे कल गेला, की मग एखादे व्यक्तिमत्त्व हे अत्यंत वाईट असे घडू शकते. त्याचा स्वभाव बदलतो, स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टी बदलते. परिणामी, आज सगळीकडेच घडत जाणारे बलात्कारासारखे गुन्हे, छेडछाड, त्रास देणे, लैंगिक हावभाव करणे इ. प्रकार घडतात. हे सर्व भान कोवळ्या वयातून मुलांना दिले गेले पाहिजे. त्यांना नीट शिकवूनच भविष्यात हे गुन्हे थांबवू शकतील. पालकांनी गंभीर विचार करावा.

लहानपणी आपण बाळाचा कल बघत असतो. मग त्यातून ठरवतो त्याला कसं वेगळं वागवायचं. तरुण वयात प्रेयसीला स्वभाव नंतर खटकू लागतो. कदाचित अशी परिस्थिती निर्माण होत असेल. संपूर्ण स्वभाव जेव्हा बदलतो त्यामागे नक्कीच काही खोटे आहे असेच समजायचे. स्वभाव जाणे कधी तरी शक्य आहे का? स्वभावावरून घडतो तो माणूस. जर त्याचा कल बदलला, की त्याचे व्यक्तिमत्त्वही बदलायला सुरुवात होते. मला असे वाटते, पुढची पिढी घडवताना, पालनपोषण करताना पालकांनी या गोष्टी ध्यानात घेऊन निर्णय घ्यायला पाहिजेत.

Story img Loader