हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
घरी आल्यावर दैनंदिन कार्यक्रमाबरोबरच सुरू होतं दूरदर्शन. या दूरदर्शन सागरातून पाठोपाठ धडकणारे ‘रिअॅलिटी शोज’. संगीत, नृत्य, विनोद हे आणि असे विविध विषयांवरचे रिअॅलिटी शोज या दूरदर्शन सागरातून उसळत असतात.
हे शोज् म्हणजे भव्यदिव्य सेट्स, दिव्यांचा झगमगाट, लाल-पांढरे हार्ट झेपमधील बलून्स, बरसणारे रंगीबेरंगी कागदाचे कपटे, स्मार्ट आणि आकर्षक वेशभूषेतला हुशार, तरतरीत निवेदक. त्या त्या विषयातले तज्ज्ञ परीक्षक आणि त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांचा पाऊस. या सगळय़ामुळे देखणा झालेला हा शो. यातील इमोशनल, विनोदी रंगसुद्धा आपल्या चांगलेच परिचयाचे झाले आहेत. पण आता त्यातली उत्सुकता, गंमत मात्र पहिल्याइतकी ताजी राहिली नाही, ओसरू लागलीय. करमणूक, कला यांचा अतिरेक होऊन त्याची चव हरवतेय की काय, या संभ्रमात प्रेक्षक सापडलाय.
अशीच काहीशी अवस्था असतानाच एका ‘रिअॅलिटी शो’मधील एक नृत्याविष्कार पाहण्यात आला. कारण रिमोटवर ‘तू नही और सही, और नही और सही’ हे गाणं गुणगुणत आपली बोटं नाचत असतात ना, त्यामुळे कुठल्याही चॅनलवर आपण धडकतोच. तसंच झालं. चॅनलवरील तो नृत्याविष्कार पाहताच रिमोटवरचं बोट जणू गोठून गेलं. पाहता पाहता त्यात रंगून गेले.
नृत्याचा विषय होता- अंडय़ातून नवीन जीवाचा, एका पक्ष्याच्या पिलाचा या जगात प्रवेश. त्या इवल्याशा पिलाच्या मांसल अवयवाच्या हालचाली, त्यातील बारकावे, त्याची उभं राहण्याची धडपड, त्या प्रयत्नात त्याचं धडपडणं, पुन्हा प्रयत्न, पुन्हा पडणं, अखेर यश. मग घरटय़ातून बाहेरच्या जगात झेप घेण्यासाठी उत्सुक असलेल्या त्या पक्ष्याचे प्रयत्न आपल्या कोवळय़ा पंखातील बळ अजमावून आपल्या सामर्थ्यांचा पूर्ण अंदाज घेत पूर्ण आत्मविश्वासाने त्याने आकाशात घेतलेली समर्थ, यशस्वी झेप. आकाशातील मुक्त संचार त्याचा आनंददायी अनुभव- मुक्त, स्वतंत्र जीवनाचा आनंददायी विहार आणि या परम आनंदात असतानाच एकाएकी बंदिस्त पिंजऱ्यात अडकण्याचं दुर्दैव त्यातून सुटण्याची पराकोटीची धडपड, पण अयशस्वी-
होय, इतकंच- इतकंच त्या नृत्याचं सादरीकरण होतं. पण इतकं अप्रतिम की नजर हलली नाही. इतकंच नव्हे तर शरीर-मनाचा अणू-रेणू जणू त्यात गुंतला होता. या आविष्काराने कलेचाच गौरव झाल्याचा अनुभव आला होता. हे नेत्रदीपक सादरीकण संपल्यावर क्षण-दोन क्षण सर्व वातावरण एकदम स्तब्ध झालं होतं. जणू काही कलाकाराबरोबर, प्रेक्षक, परीक्षक सर्वच जण समाधिस्थ होते. या अवस्थेतून बाहेर आल्यावर साऱ्यांनी टाळय़ांचा एकच गजर केला. भारावलेल्या वातावरणात ती टाळी ब्रह्मानंदाची वाटली. विलक्षण म्हणा, अद्भुत म्हणा, पण या नृत्यात दिव्यत्वाची प्रचीती होती, हे मात्र खरे.
खरंच नृत्यविषय वेगळा तर होताच, पण अर्थपूर्ण होता. सादरीकरणही तितकंच कलात्मक. नवजात पिलाची प्रत्येक हालचाल स्पष्ट, विलोभनीय दिसावी अशी वेषभूषा. नृत्यदिग्दर्शकांच्या कौशल्याची तर कमाल होती. प्रत्येक स्टेप पूर्ण परफेक्ट. विशेष म्हणजे भावाविष्कारही अप्रतिम होता. त्यामुळे ओढ, आनंद, मुक्त स्वातंत्र्यातील श्वास, नंतरची केविलवाणी धडपड सर्व सर्व कलावतीने अतिशय सफाईने सादर केले. स्पष्ट, स्वच्छ हे सर्व समजून-उमजून जाणिवेने करणारी ही नृत्यांगना कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरली. या नृत्यात एक पूर्ण कलाविष्कार होता. कलाकृतीत ‘आत्मा’ असल्याची ती साक्ष होती. कलाकार, नृत्यदिग्दर्शक, वेशभूषाकार सर्वाचाच सहभाग शंभर टक्के प्युअर होता. म्हणूनच हा नृत्याविष्कार एक आगळावेगळा नव्हे उच्च प्रतीची अनुभूती देणारा ठरला.
समुद्राच्या लाटेसारखाच निखळ, खळाळता आनंद देणारा हा परफॉर्मन्स खराखुरा ‘रिअॅलिटी शो’ होता.