नारदाला गंप्याकडील नवनव्या वस्तूंचे फारच आकर्षण वाटू लागले होते. दोन वेळा त्याची आणि गंप्याची भेट झाली होती. त्याने तो फारच प्रभावित झाला होता. नारदाला आता तंबोरा घेऊन फिरणे, ‘नारायण, नारायण’ करणे नकोसे झाले होते. गंप्यासारख्या टाइट जीन्स, टी शर्ट, चांगली हेअर स्टाइल करून मोटार सायकल फिरवण्याची इच्छा प्रबळ झाली होती; पण देवांना हे सांगायचे कसे? समजा चार-आठ दिवस पृथ्वीतलावर जाऊन चांगली कटिंग वगैरे करून घेतली, तर परत जाताना केस कसे उगवणार? त्याला वाटले, या सर्व गोष्टी गंप्याला सांगाव्यात. तो यावर काही तरी तोडगा काढेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नारद भल्या पहाटे गंप्याच्या घरी पोचले तेव्हा गंप्या जॉगिंगला जाण्यासाठी जॉगिंग सूट, बूट घालून तयार होता. नारदाकडे लक्ष जाताच गंप्या म्हणाला, मी तुला अमृततुल्य चहा देतो, मग आपण बोलू. गंप्याचे ऐटदार कपडे, बूट पाहून नारदास आपल्या प्राचीन काळच्या खडावा, कपडे व गळय़ा-हातातल्या ‘माळा’ पाहून ओशाळवाणे झाले. गंप्या चहा घेऊन येताच नारदाने चहा पीत पीत गंप्याला आपल्या येण्याचे कारण सांगितले व मी तुझ्यासारखे कपडे, कटिंग केले, तर मला परत स्वर्गात जाताना त्रास होईल. यावर गंप्या म्हणाला, तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना. गंप्याने नारदाचा तंबोरा, चिपळय़ा, गळय़ा-हातातल्या माळा काढून ठेवण्यास सांगितले व डोक्याचे केस मोकळे ठेवण्यास सांगितले.
गंप्याने नारदास आपले कपडे, टी शर्ट, जीन्स घालण्यास दिले व त्याच्या पायात आपले स्पोर्ट शूज चढवले. त्याला इंग्लिश कॅप घालण्यास दिली व गॉगल लावण्यास सांगितले, त्यामुळे नारद एकदम वेगळाच दिसू लागला. गंप्या म्हणाला, आजपासून तुझे नाव ‘नाद’, नारद हे नाव फारच जुनाट आहे. नारदाला आपले नवीन नाव ऐकून फारच आनंद झाला. गंप्या ‘नाद’ला घेऊन जॉगिंगला गेला. गंप्याने पळण्यास सुरुवात केली; पण नारदास बूट, टाइट कपडे यामुळे पळता येईना. तो बागेतल्या बाकावर बसला.
गंप्या ‘नाद’ला घेऊन ब्युटिसलूनमध्ये गेला व सलूनवाल्याला सांगितले, हा माझा मित्र गावातून आला आहे. त्याला साजेशी हेअर स्टाइल करून एकदम मॉड कर. सलूनवाल्याने नादचे केस पाहून म्हटले, तुम्ही शँपू करत नाही का? केस कसे राठ झाले आहेत.. तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला एकदम झकास ट्रीटमेंट देतो. सलूनवाल्याने नादच्या डोक्यास शँपूने धुऊन मसाज, हेअर कट करून फेशियल, आरोमा थेरेपी करून आपले काम पूर्ण केले. नारदाने जेव्हा आरशात पाहिले, तेव्हा आपण किती सुंदर, तरुण दिसू लागलो आहोत याची त्याला जाणीव झाली. तेथून निघाल्यावर गंप्या त्याला एका ‘मॉल’मध्ये घेऊन गेला. तेथील असंख्य तऱ्हेच्या वस्तू पाहून नारद भांबावून गेला. गंप्याने त्याला जीन्स, टी शर्ट, बूट, बेल्ट सर्व घेऊन दिले व वेगवेगळे डीओ कसे वापरायचे ते सांगितले व ते दोघे घरी परतले.
जेवणाकरिता गंप्या त्याला घेऊन एका मोठय़ा हॉटेलमध्ये गेला. नारदाला ‘नवे कपडे, नवे बूट’ घालून आपण फारच देखणे दिसत आहोत असे जाणवले. गंप्याने जेवणाची ऑर्डर दिली. त्याच्या शेजारच्या टेबलाभोवती बसलेल्या तरुण मुलींनी- ‘हाय गंप्या, हा चिकणा कोण’ असे म्हणून नारदास हाय केले. नारदाला वाटले त्यांना गरम लागले असेल म्हणून त्या हाय, हाय करत आहेत. पुढे आलेले चमचमीत पदार्थ पाहून नारदाला काय खाऊ काय नको असे झाले. जेवणानंतर गंप्याने त्याला मसालापान दिले. त्याची ती अद्भुत चव पाहून नारदाची पृथ्वीवरच वास्तव्य करण्याची इच्छा प्रबळ झाली. गंप्या त्याला घेऊन घरी आला. रात्र बरीच झाली होती. सर्वत्र अंधार होता. घरी येताच गंप्याने विजेचे बटण दाबले त्याबरोबर घर उजेडाने उजळून निघाले, त्यावर नारद एकदम घाबरून गेला. तो गंप्याला म्हणाला, सूर्यनारायण केव्हाच अस्ताला गेले, मग हा प्रकाश कोणाचा? येथे मशालीदेखील दिसत नाहीत. गंप्या म्हणाला, हा आम्ही मानवाने लावलेला महत्त्वाचा शोध आहे. हा सर्व विजेचा चमत्कार आहे. त्याच वेळी वीज गेली. गंप्याने खिशातला लायटर काढून लगेच मेणबत्ती पेटवली. बटण दाबताच लायटरमधून जाळ झाल्याचे बघताच नारद आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, एका क्षणात तू जाळ कसा उत्पन्न केलास? आम्हाला आधी अग्निदेवतेला आवाहन करावे लागते तेव्हा महत्प्रयासाने आम्ही जाळ उत्पन्न करू शकतो.
नारदाला आता गंप्याबरोबर राहणे फारच आवडू लागले होते. रोज नवे कपडे, मोटारसायकलवर फिरणे, मॉलमध्ये फिरणे त्याला फारच आवडू लागले होते. रती, रंभापेक्षा सुंदर सुंदर तरुणी, त्यांचे हावभाव, त्यांचे रंगबिरंगी कपडे याचे त्याला फारच आकर्षण वाटू लागले होते; पण आता स्वर्गात जाणे आवश्यक होते. तो तेथून काहीच न सांगता पृथ्वीतलावावर आला होता. स्वर्गात पोहोचल्यावर देवांना काय सांगायचे हे त्याला काहीच सुचत नव्हते. डोक्याची बारीक कटिंग केलेले रूप देवांना कसे आवडेल? ते आपल्याला क्षमा करतील का? असे असंख्य प्रश्न त्याला पडले. नारदाचा काळजीयुक्त चेहरा पाहून गंप्या म्हणाला, अरे नाद, काय झाले? तू असा घाबराघुबरा कसा झालास? नारद म्हणाला, आता मी स्वर्गात जायचे म्हणतो आहे; पण हे असले रूप घेऊन मला तेथे जाता येणार नाही. तुलाच यातून काही मार्ग काढावा लागेल. गंप्या म्हणाला, एवढेच ना? घाबरू नकोस. चल. गंप्या त्याला घेऊन नाटकाचे सामान मिळणाऱ्या दुकानात गेला. तेथून नारदासारखा विग व बाकीच्या सर्व वस्तू घेऊन घरी आला. तेथे त्याचा मेकअप करणारा मित्र आलेला होता. त्याने नारदास विग वगैरे लावून नारदासारखा मेकअप करून दिला. नारदाने आरशात पाहिले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आनंद व आश्चर्याचा संमिश्र भाव उमटला. आपण आधीच्या नारदापेक्षा सुंदर दिसत आहोत असे त्याला वाटले. त्याने आता गंप्याचा निरोप घ्यायचे ठरवले; पण जीन्स, टी शर्ट, बुटांचा मोह काही सुटेना. तेव्हा त्याने आपल्या तंबोऱ्यात जीन्स, टी शर्ट, बूट कसेबसे कोंबले. डीओ घेण्यास तो विसरला नाही. गंप्याने त्याचा टीशर्ट जीन्समध्ये काढलेला फोटो त्याने विगमध्ये लपवला.
स्वर्गात पोहोचताच नारद ‘नारायण नारायण’ करत बावळट चेहरा करून हिंडू लागला; पण त्याचा फेशियल केलेला चेहरा वेगळाच दिसत होता. देवांना नारद चार दिवस कोठे होता याची काहीच कल्पना नव्हती. याचे नक्की काय कारण असावे हे त्यांना समजेना. त्याचे चालणे, बोलणे थोडे बदलल्यासारखे देवांना वाटत होते. त्यांनी या गोष्टीचा छडा लावण्यासाठी आपल्या विश्वासू अप्सरेला नारदावर लक्ष ठेवण्यास सांगितले. देवांची अशी कल्पना होती की, नारद अप्सरेला सर्व सांगेल. ठरल्याप्रमाणे अप्सरा नारदाकडे गेली. नारदाचे तिच्याकडे लक्ष जाताच त्यांना पृथ्वीवरील सुंदर-सुंदर तरुणींची आठवण झाली. त्याने अप्सरेकडे अजिबात पाहिलेसुद्धा नाही. अप्सरेला त्याचा फारच राग आला. जो नारद सतत अप्सरांच्या मागेपुढे करत असे, तोच आता बघायलादेखील तयार नाही म्हणजे काय?
अप्सरा नारदाच्या नकळत त्याच्या घरात जाऊन पडद्यामागे लपून बसली. थोडय़ा वेळातच नारद घरात आले. आल्याबरोबर त्यांनी आरशासमोर उभे राहून गळय़ातल्या माळा, हातांना बांधलेले गजरे, आपला तंबोरा बाजूला ठेवला व आपला विग काढून त्यातला फोटो हातात घेऊन निरखून बघू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. अप्सरा पडद्यामागून हे सर्व आश्चर्याने बघत होती. नारद आपल्या हातातील फोटो तेथे ठेवून आंघोळीसाठी आत गेला. नारद आत गेल्याचे पाहून अप्सरा पडद्याआडून बाहेर आली. तिने नारदाने ठेवलेला फोटो हातात घेऊन बघण्यास सुरुवात केली. तिने आजपर्यंत एवढा देखणा पुरुष पाहिलाच नव्हता. तो कोण असावा? नारदाने अद्याप लग्न केलेले नाही. त्याचा या पुरुषाशी काही संबंध तर नसावा, असे असंख्य प्रश्न तिला पडले.
नारदाची चाहूल लागताच अप्सरा पूर्ववत पडद्याआड लाजून बसली. आतून नारदाऐवजी फोटोतला पुरुष बाहेर आलेला पाहून अप्सरेस आश्चर्य वाटले. पुरुषाने आपल्या केसात कंगवा घालून सुंदर वळण दिले तेव्हा तो फारच देखणा दिसू लागला. त्या पुरुषाने जेव्हा अंगावर डीओ स्प्रे केला तेव्हा त्या मादक सुगंधाने बेभान होऊन अप्सरा पडद्यामागून येऊन त्या पुरुषासमोर मंत्रमुग्ध होऊन उभी राहिली. जवळ जाताच तिच्या लक्षात आले, अरे, हात तर नारदच आहे. आपल्यासमोर अचानक अप्सरा आल्याने नारद गोंधळून गेला व त्याचा चेहरा पांढराफट्ट पडला.
अप्सरा म्हणाली, घाबरू नकोस. मला फक्त इतकेच जाणून घ्यायचे आहे की, तुझ्यात इतका बदल कसा झाला. तू फारच मादक दिसू लागला आहेस. तू काही मायाजाल शिकून आला आहेस का? तू क्षणात तुझे केस कसे बदलू शकला व हे मादक द्रव्य कोठून प्राप्त केलेस? तेवढे मला सांग. मी कोणासही याबाबतीत काही सांगणार नाही. मी तसे वचन देते. तुझ्या मायाजालाने मलासुद्धा सुंदर कपडे, केशविन्यास व सुगंधित काया करून दे. यासाठी मी वाट्टेल ते करण्यास तयार आहे. नारदाने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला; पण ती काहीच ऐकेना. उलट नारदाला ती धमकी देऊ लागली की, माझे म्हणणे ऐकले नाही, तर मी देवासमोर तुझे खरे रूप उघडे करीन. या धमकीने नारद फारच घाबरून गेला व तिला म्हणाला, तुला माझ्याबरोबर चार दिवस यावे लागेल. त्यावर अप्सरेने त्याचे म्हणणे मान्य करून त्याला होकार दिला. नारदाला प्रश्न पडला की, मी गंप्याला काय सांगू? आधीच मी त्याच्याकडे जातो, आता अप्सरेला बरोबर घेऊन गेलो, तर त्याला काय वाटेल? पण दुसरीकडे त्याला अप्सरा आपले बिंग फोडेल ही भीती होती म्हणून त्याने मनाचा हिय्या करून अप्सरेला गंप्याकडे नेण्याचे ठरवले.
ठरल्याप्रमाणे भल्या पहाटे नारद अप्सरेसह गंप्याच्या घरी पोहोचले. ते गंप्याला म्हणाले, मी तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेत आहे असे तुला वाटेल; पण माझा नाइलाज झाला. मी तुला नंतर सविस्तर सांगतो. नेहमीप्रमाणे गंप्याने चहा देऊन दोघांचे स्वागत केले. अप्सरेने आयुष्यात पहिल्यांदाच चहा पाहिला होता. हे गरम पेय कसे प्यायचे याचा तिला प्रश्न पडला. नारदाचे पाहून आपणही तसेच प्यावे असे तिने ठरवले. नक्षीदार सुंदर पांढऱ्या कपात चहा होता. असे पात्र तिने कधीच पाहिले नव्हते. सोन्या-चांदीपेक्षा हे वेगळय़ा धातूचे पात्र असावे असे तिला वाटले.
गंप्याने त्या दोघांना आपल्या ‘कारमध्ये’ बसण्यास सांगितले. नारद एक-दोन वेळा कारमध्ये बसला होता; पण अप्सरेला भीती वाटू लागली. दोघे आत बसताच गंप्याने कारचे दार बंद करून घेतले व कार सुरू केली. अप्सरेला वाटले बिनाघोडे जुंपता हे वाहन कसे चालू झाले. बाहेर गरम असता आत थंडगार कसे आहे. हा काही तरी मायावी प्रकार असावा व नारद याच माणसांकडून हे सर्व शिकून आला असावा. गंप्या दोघांना घेऊन ब्युटी पार्लरमध्ये गेला. तेथील महिलेला त्याने अप्सरेची ओळख करून सांगितले, की हिला तुम्ही योग्य ट्रीटमेंट द्या. आम्ही दोन तासांनी येतो. अप्सरा पार्लरमध्ये जाण्यास घाबरू लागली. आत वातानुकूलित वातावरणात वावरणाऱ्या बऱ्याच मुलींना पाहून तिला धीर आला; पण नारद आपल्याला सोडून निघून तर नाही ना जाणार, अशी शंका तिला येऊ लागली. तेथे असलेल्या ३-४ तरुणींनी अप्सरेचा ताबा घेतला. पेडिक्युअर, व्ॉक्सिंग, कटिंग, मसाज करून तिला ‘आरशा’समोर उभे केले. अप्सरेला आपले बदललेले रूप पाहून फारच आनंद झाला. आपले केसाळ पाय इतके मऊ, सुंदर कसे झाले? चेहऱ्यावर किती चमक आली. केस किती मुलायम झाले याचे तिला फारच आश्चर्य वाटले. पार्लरवालीने शेजारच्या ब्युटीकमधून तिला साजेसे कपडे घेऊन दिले.
गंप्या व नारद तिला घ्यायला पार्लरमध्ये गेले तेव्हा तेथे त्यांना अप्सरा दिसली नाही. ते काही विचार करतात तेवढय़ात एक बॉयकट, स्लीव्हलेस टॉप घातलेली तरुणी तेथे आली. नारद तिला अप्सरेबद्दल विचारणार तोच ती म्हणाली, अरे नारदा, मला ओळखले नाहीस? त्याबरोबर नारद व गंप्या आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. अप्सरेत असा आमूलाग्र बदल होईल असे त्यांना वाटले नव्हते. गंप्या तिला म्हणाला, फारच सुंदर. तूसुद्धा स्वत:ला ओळखू शकणार नाहीस, मग आमचे काय? तुझे नाव आजपासून मी स्वरा ठेवले आहे. नारदाला आम्ही नाद म्हणतो. ती दोन्ही नावे अप्सराला फारच आवडली.
तीन दिवस उलटून गेले तरी स्वरा परत स्वर्गात जाण्यास तयार होईना. ती म्हणाली, आता मी कायम येथेच राहणार आहे. मला स्वर्ग तुच्छ भासतो. हे ऐकून गंप्या तिला म्हणाला, तू तेथे कशी राहशील? तुला तुझा खर्च कसा भागविता येईल? स्वरा म्हणाली, खर्च म्हणजे काय? गंप्या म्हणाला, अगं, राहणे, जेवणखाण, कपडेलत्ते याकरिता पैशांची गरज असते. स्वरा म्हणाली, म्हणजे येथे स्वत:ला हे सर्व करावे लागते? स्वर्गात हे देव इंद्र करतात. काहीही असो, मी काही काम करून पैसे कमवीन; पण येथेच राहीन. गंप्या म्हणाला, तू काय शिकली आहेस? स्वरा म्हणाली, मी नृत्य शिकले आहे. स्वर्गात सर्व बाया नृत्यच शिकतात. बाकी कोणतेही शास्त्र स्त्रियांना शिकता येत नाही. गंप्या म्हणाला, मग असे करू. तू नृत्य शिकवू शकशील का? आपण नृत्याचे क्लास काढू.
नारदाने या वेळेस जरा मोठा तंबोरा आणला होता. त्याला वाटले होते की, अप्सरेचे कपडेदेखील न्यावे लागतील; पण अप्सरा येण्यास तयार नव्हती म्हणून नारदाने स्वत:साठी जास्त कपडे घेऊन जाण्याचे ठरवले.
ठरल्याप्रमाणे नारद एकटेच स्वर्गात पोहोचले. ‘नारायण नारायण’ करत बावळट चेहरा करून फिरू लागले. देवासमक्ष अप्सरा अजून पोहोचली नव्हती. त्यामुळे नारद काय करतो, कोठे जातो याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. अप्सरेबद्दल नारदास विचारणे शक्य नव्हते. देवांनी नारदास बरेच प्रश्न विचारले. सगळीकडे कसे काय चालले आहे? तू दिवसभर काय काय करतोस? असे प्रत्येक देव त्याला विचारू लागले होते. नारदाला पृथ्वीवरील तरुणांसारखे ‘हाय’ म्हणायची इतकी सवय झाली होती की, तो ‘नारायण नारायण’ करताना मधूनच हाय म्हणत असे. देवांना वाटले, आपण त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार केल्याने त्याने हाय खाल्ली आहे की काय म्हणून तो हाय-हाय म्हणतो.
नारद परत जेव्हा पृथ्वीतलावावर गेला तेव्हा गंप्याच्या घराशेजारील घरावर ‘स्वरा’ नृत्य केंद्र – स्वर्गीय नृत्य शिकवले जाईल अशी पाटी होती. तेथे स्वरा मुलींना नृत्य शिकवत होती. गंप्या नारदाला म्हणाला, तूदेखील आता येथेच राहा. तुझ्यामागे काही पाश नाही. तुम्ही दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू शकता.
नारदालादेखील स्वर्गाचा कंटाळा आला होता. गंप्याची गोष्ट त्याने सहर्ष स्वीकारली व देवांना आपला राजीनामा देण्यासाठी स्वर्गात प्रयाण केले.