01-vachak-lekhakभारतीय संस्कृतीत विडय़ाच्या पानाचे महत्त्व आहे. मंगल प्रसंगी पानाचा उपयोग केला जातो. पूजा, अर्चा, विवाह प्रसंग किंवा करमणुकीच्या कार्यक्रम प्रसंगी प्रथम पानसुपारी वाटली जाते. ही पाने ज्या वेलीवर येतात तिला नागवेली म्हणतात. त्यांना चुना लावून त्यात सुपारी, कात, बडीशेप, खोबरे, विलायची, जायफळ टाकले की पानाचा विडा तयार होतो. तो खाल्ल्यानंतर जीभ व ओठ लाल होतात. शिवाय तो वातहारक, जंतुनाशक, कफनाशक असून मुखदरुगधी दूर करतो. विडय़ाला तांबूल असेही म्हणतात. त्याच्या सेवनाने कामाग्नी उद्दीपीत होतो, असे सांगितले जाते. विडय़ाचे तेरा गुण आहेत. त्यावरून त्याला त्रयोदश गुणी तांबूल असेही म्हणतात. पैजेचा विडा, प्रेयसीचा विडा, गोविंद विडा, बाळंत विडा वगैरे प्रकार आहेत. विडा शृंगारप्रधान असल्यामुळे तो ब्रह्मचारी किंवा विरक्त लोक सेवन करीत नाहीत. नागवेलीला फळे येत नाहीत, तरीही ज्ञानेश्वरीनी तिला सफळ म्हटले आहे. म्हणून ते म्हणतात-

कां न फळतांही सार्थका।
जैसिया नागलतिका।
तैसिया करी नित्यादिका।

Kalgitura play selected at Bharangam International Festival in New Delhi
दिल्लीतील भारंगम आंतरराष्ट्रीय महोत्सवात नाशिकचा ‘कलगीतुरा’
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Annual flower exhibition detail update
निसर्गलिपी : फुलांच्या वार्षिक प्रदर्शनांना जाच!
gadhimai festival in nepal animal slaughtered
‘या’ उत्सवात दिला जातो हजारो जनावरांचा बळी; काय आहे गढीमाई उत्सव? याला जगातील सर्वांत रक्तरंजित उत्सव का म्हटले जाते?
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Maharashtra Breaking News Updates
Maharashtra News : “राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया’ निवडणुका जिंकत नसल्याचा शरद पवारांकडून ठपका”, उदय सामंतांचं वक्तव्य
Nagpur dance bar, dance bar customers ,
नागपूर : डान्सबारमध्ये आंबटशौकीन ग्राहकांसमोर अश्लील नृत्य; मुंबई-दिल्लीच्या वारांगना…

पान-सुपारीला मांगल्य व समृद्धीचे प्रतीक मानतात. म्हणून मंगल कार्यात पान-सुपारी वाटतात. पान-सुपारीला पती-पत्नीचे प्रतीक समजले जाते. पुरुष विधुर असेल तर तो उजव्या कनवटीला सुपारी ठेवून मंगलकार्य करू शकतो. अशा प्रसंगी सुपारीला ही त्याची प्रातिनिधिक स्वरूपातील पत्नी समजली जाते. साहित्यकारांमध्ये व कलाकारांमध्ये विडय़ाचा उपयोग आवडीने केला जातो. कारण विडा खाल्ल्यानंतर एकाग्रता वाढते असे समजतात. प्रेमिकांमध्ये विडय़ाला फार महत्त्व आहे. विडय़ात औषधी गुणधर्मही आहेत. तोंड आल्यानंतर, खोकला, त्वचारोगावर याचा हमखास उपयोग होतो. गायक लोक तर विडा नेहमी खातात त्यामुळे घसा साफ होतो असे सांगतात. विडय़ामुळे पचनशक्तीही वाढते. चुन्यामध्ये कॅलशियम असल्यामुळे दात बळकट होतात.

विडय़ात प्रमुख सहा घटक असतात. ते सर्व औषधी आहेत. त्यातील पहिला घटक म्हणजे नागवेलीचे पान, हे पचनास उपयुक्त असते, कफनाशक असते, शरीरातील जंतूंचा नाश करते. दुसरा घटक म्हणजे चुना, याला अग्नीचा प्रतीक मानतात. तो वाताबरोबर कफाचाही नाश करतो. तो शरीरातील अतिरिक्त अग्नी दूर करतो. रक्तातील कॅल्शियम वाढवतो.

तिसरा घटक म्हणजे कात. हाही कफनाशक आहे, कफ झाला तर घसा खवखवतो. मुखशुद्धीही होते. अशा प्रकारे पान, कात व चुना ही त्रिगुणी कफनाशक मानले जाते. चौथा घटक बडीशेप. ही पाचक असते, पोटाचा जडपणा कमी करते, त्यामुळे मन प्रसन्न राहते.

पाचवा घटक सुपारी. ही मुख शुद्धी करते, हिच्यामुळे तोंडात लाळ तयार होते, ती पचनाला मदत करते, त्यात जेष्ठमधाचे प्रमाण असते, हा घसा स्वच्छ करतो, लाळेत टायलीन हा पाचक रस असतो.

सहावा घटक म्हणजे लवंग. वरील पाच घटकांनी विडा बनवल्यानंतर तो लवंग लावून बंद करतात व नंतर तो सेवन करतात. लवंग ही चवीला तिखट, चवदार व पाचक असते. ती मुखशुद्धीही करते. असा पानाचा विडा खाल्ल्यानंतर त्यातील सहा रस यकृतातील स्वादुपिंड रसात मिसळतात, ते अन्नाचे पचन करतात. यकृत चांगले तर प्रकृती चांगली असे म्हटले जाते.

महाराष्ट्र, राजस्थान, बंगाल, गुजरात हे प्रांत पानमळ्याविषयी प्रसिद्ध आहेत. पानांच्या बांगला, कलकत्ता, बनारसी, मद्रासी इत्यादी जाती प्रसिद्ध आहेत. पानमळा जोपासला जातो त्याच्या कुंपणाच्या प्रवेशद्वाराजवळ नागवेलीची मूर्ती ठेवलेली असते. तिच्यामुळे पानमळ्याचे संरक्षण होते, अशी शेतकऱ्यांची श्रद्धा असते. या श्रद्धेमुळे पानमळ्यात प्रवेश करताना पायातील वहाणा बाहेर ठेवायला सांगतात. विडय़ांच्या पानाची परदेशातही मागणी वाढली आहे. पानमळ्याबरोबर त्याला लागणाऱ्या मसाल्याची इंडस्ट्रीही दिवसेंदिवस वाढत आहे.

विडय़ाच्या पानात एक सुगंधी तेल द्रव्य असते, ते मुखशुद्धी करते. दात किडण्यास प्रतिबंध करते. त्यातील पाचक रस उत्तेजित करून पचन कार्यास मदत करतो. पान हे वायुनाशकही असते. विडय़ात घातलेला चुना त्यातील क्लोरोफिलमुळे शोषला जातो. मलबार येथे पानाची पैदास खूप होते. गुजरात, सौराष्ट्र व महाराष्ट्रात पानांचे मळे आहेत. पाकिस्तानातील लोकांना पालघर परिसरातील पाने फार आवडतात.

शरीरात सकाळी कफ, दुपारी पित्त व सायंकाळी वायू वाढत असतो म्हणून पान खाताना सकाळी त्यात सुपारी जादा घालावी. दुपारी कात जादा घालावा तर संध्याकाळी चुना जादा घालावा. अशा पान विडय़ाचे प्रकार त्यात घातल्या जाणाऱ्या पदार्थावरून पडतात. साधे पान, तंबाखूपान, मिठापान, मिंटपान, कोलकत्ता पान, बनारस पान, देशी मधाई, लखनऊ, बंगाली पान तसेच जगन्नाथ पान. समारंभात जेवणानंतर पानाचा विडा दिला तर तो सन्मान समजला जातो.

आजकाल विडय़ाबरोबर तंबाखू खाणे हा प्रघातच पडला आहे. दुर्दैवाने अशा पान विडय़ाबरोबर सुपारी मिश्रित पदार्थ खाऊ लागले आहेत. गुटखा हा पदार्थ पान बाजारात बोकाळला आहे. त्याचबरोबर सुगंधित तंबाखू-सुपारी अपमिश्रिकाचेही फॅड वाढले आहे. अशा अपमिश्रिकात निकोटिन, जडधातू, अवरोधके, चांदीचा वर्ख, बाइंडर्स असे घातक पदार्थ पान मसाल्यात मिसळलेले असतात. सध्या ३५ टक्के प्रौढांना तंबाखूचे व्यसन आहे तर तरुणांना गुटख्याचे व्यसनच आहे.

पान खाणं हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. पान खाणं किंवा विडा खाणं हा कौटुंबिक सोपस्कार समजला जातो. जुन्या काळी ओसरीवर बसून एकत्र पान खायचे. पुरुष मंडळीचं पान खाऊन संपलं की ते पानाचे ताट माजघरात नेलं जायचं. तेथे स्त्रिया या ताटाची वाट पाहात बसलेल्या असायच्या. पूर्वीच्या काळी पान-सुपारी देणं हा सोपस्कार होता. पाहुणे किंवा मित्रमंडळी जमली की पूर्वी त्यांचे पुढय़ात पानपुडा किंवा चंची ठेवली जायची. पान खाल्ल्यानंतर गप्पांना सुरुवात व्हायची. असा हा पानाचा रंगेल विडा.

Story img Loader